"Almost perfect Puppy.You did not cover jojeemojee. By tomorrow some jojeemojee will intervene and she will loose her mojo. Your efforts for 45 minutes will be down the drain. And Hash Band will knock her down for one more within 6 months."
साहेब कधी आले ते कळालेच नाही. जो बद्दल सांगायचे राहुनच गेले. चेस चा डाव होता. चेक मेट ची मूव झाली होती. आता फक्त उद्याची वाट बघणे हातात होते.
पण जो जिंकला. फिलोमिना आली, नुसताच गर्भपात करुन गेली. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेला नाही म्हणाली.
७० च्या दशकातील कहाणी आज ही पुन्हा पुन्हा होते. ़ आजुबाजुचा जो कायम जिंकतो. फिलोमिनाच्या आयुष्याचा पट उधळत. कधी अज्ञान पाजळत, कधी धर्माच्या नावाने, कधी नैतिकतेच्या नावाने.
साहेबांनी आधुनिक तंत्र देशात आणलेले होते. लॅप्रोस्कोपीक ऑप्रेशन. बिन टाक्याची शस्त्रक्रिया. दोन तासात घरी. दुसर्या दिवशी घरकामाला बंधुआ मजदुर हाताशी? आणि १५ दिवसात शेजेला. प्रायवेट क्लिनिक मधे १५०० रुपये. साहेबांच्या हॉस्पिटल मधे मोफत. पण नाही.
फिलोमिना गर्भपात करत राहीली,
५ व्या वेळी एका धंदेवाईक क्लिनिक मधे पीशवी फाटून मेली?
लोकसंख्या फुगत होती.
गर्भपाताचा कायदा झाला होता. सज्ञान स्त्री ला हक्क होता. ़कुमारिका, सौ, गं.भा. असा काही ही भेदभाव नव्हता. ़कसलीही परवानगी, सही लागायची नाही. घेतली जायची पण गरज नसायची.
डी अॅन्ड सी जाउन आधुनिक सक्शन आले होते. कमीत कमी आयुधे, अगदी कमी रक्तस्त्राव, कमी काँप्लिकेशन्स. लोकल अनेस्थेशिया मधे बिनधोक २ तासात घरी.
गर्भपात साधन म्हणुन वापरणार्याची संख्या हळू हळू वाढत होती. नैतिकते चा कंठशोष चाललाच होता. नेमका सुवर्ण मध्य कसा साधावा हे कुणालाही कळत नव्हते. साहेबांची भुमिका एकदम स्पष्ट होती.
I do not care about those stupid males who are interested in act without protection. It is woman who bears it all. So put your best communication and motivate her for pills, Copper T or best for laparoscope. Avoid multiple abortions through complete communication. Stop this country from going to dogs. And do not worry about those early unmarried birds(20 per cent) lesson learnt will do them good in future life. ़जाता जाता: पप्पी- वय २०
To be Continued
प्रतिक्रिया
15 Nov 2013 - 11:23 pm | मन१
अवघड आहे
16 Nov 2013 - 12:07 am | इन्दुसुता
महत्वाचा विषय....
आणि असा विषय पेलायला तेव्हढ्याच ताकदीची व्यक्ति.....
मास्तर, पुलेप्र.
16 Nov 2013 - 12:13 am | रेवती
अहो सर, जरा उलगडून सांगा की! तुमचे कोणतेही लेखन मला पयल्या वाचनात कळत नै.
तुम्ही वर जे लिहिलेय ते समजले पण मग त्याचे काय? कोण साहेब? त्यातून इन्दुसुताताईंनी आणखीनच बुचकळ्यात पाडलय.
16 Nov 2013 - 12:21 am | विनायक प्रभू
२० ते २८ हा टप्पा. World Health Organisation ने सुरु झालेला. माझे साहेब आणि गुरु सोबत कुटंब कल्याण क्षेत्रात घालवलेली वर्षे.
16 Nov 2013 - 2:33 am | रेवती
समजलं.
16 Nov 2013 - 12:24 am | प्यारे१
अवघड आहे.
ह्याला काही उपाय?
16 Nov 2013 - 5:01 am | विनायक प्रभू
आहे. तेंव्हा ही होता. आज ही आहे. उद्या ही तो च असेल.
भाग २ मधे जमतय का ते बघु.
16 Nov 2013 - 3:25 am | स्पंदना
तुमच्या लेखणीतून उतरतोय म्हणुन हा विषय पेलेल अस वाटत्य.
(पण जीवन्रावांच पण लिखाण जाम खतरनाक होतं. इतक की प्रतिसाद द्यायलासुद्धा मन धजावल नाही.)
16 Nov 2013 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो सर येत जा.....आपण हल्ली लिहित का नाही, असं आम्हाला लोक खासगीत विचारतात.
मी म्हणतो त्यांच्या मागे खूप व्याप असतो. अधून मधून हजेरी लावत जा.
बाकी, लेखन पोहचलं.
-दिलीप बिरुटे
18 Nov 2013 - 7:30 pm | मारकुटे
चोथा झालेला विषय
18 Nov 2013 - 7:36 pm | सूड
ह्म्म !!
19 Nov 2013 - 4:04 pm | राजु भारतीय
प्रभु, हा वर लिहीलेला झोल आहे तरी काय ?
20 Nov 2013 - 12:17 pm | नानबा
अर्थ समजून घेण्याचे अनेक प्रयत्न करून करून मेंदूला असलेल्या (थोड्याफार) वळ्यासुद्धा सरळ झाल्यात.... ;)