' माझ्या सासुबै ! ' -पूढे

जेनी...'s picture
जेनी... in जनातलं, मनातलं
27 Nov 2013 - 12:56 am

' माझ्या सासुबै ! '

____________________________________/\______________________________________

त्या दिवशी मी जाम खुश होते .बामच्या बाटलीचीहि गरज पडली नाहि .. रोजच्या कचकचीवर सुचलेल्या ऊपायांवर एवढी खुश होते कि चिडुन ३६ च्या आकड्यात असणारे आम्ही दोघे ६३ च्या आकड्यात आलो होतो :)

तब्बल आठवडाभर सासुबैंचा जवळुन अभ्भ्यास केला तेव्हा लक्षात आलं कि सासुबै आरामप्रिय आणि स्तुतिप्रिय प्राण्यात मोडतात. अश्या व्यक्तिंना त्यांच्या कलेने घेवुनच आपल्या कलेत आणावं लागतं . मला त्यांना नाराज करायचं नव्हतं. कारण आपल्या नवर्‍याचं आपल्यावर खुप प्रेम असेल तर त्याच्या माणसांची मनं जपायचीच तरच ते प्रेम द्विगुणीत होतं असं एकदा आई दिदिला सांगत असताना मी ऐकलं होतं . सो शक्य तेवढी शांततेत माझी मोहिम मला पार पाडायची होती.

पहाटेच्या चहाचं गणित तर आधीच केव्हातरी सोडवलं होतं त्यामुळे सगळ्यात आधी स्वयंपाकामधली त्यांची ढवळाढवळ बंद करायची होती.
मी स्वयंपाक करायला सुरुवात केल्यानंतर बरोब्बर वीस मीनिटांनी सासुबै किचनमध्ये एन्ट्री मारतात, हे मला माहित होतं. आधीच ठरवल्याप्रमाणे मी फ्रीजमधली शेपूची भाजी काढुन एका साइडला ठेवुन दिली, दुसर्‍या बाजुला कणिक मळुन ठेवली, तीसर्या बाजुला कांदा, टोमॅटो , लसुन , सुरी असं सगळं व्यवस्थित मांडुन ठेवुन दिलं, एवढं करायला २० मिनिट लागले , इतक्यात बामुलायजा होश्शियार करत सासुबै किचन मध्ध्ये घुसल्या मी त्या दिसताच पातेलं गॅसवर ठेवुन दिलं. सवयीप्रमाणे त्यांनी भांड्यात डोकावलं तस्सं मी म्हटलं, " सासुबै तेवढी आम्टी फोडणीला घालता क्का ? मला सॉल्लिड एमर्जन्सी आलिय, सक्काळपासनं पोट गडगडतय हो " तस्श्या त्या " बर , जा जौन ये"म्हणाल्या. आणि मी तिथनं सटकले. मस्तपैकी टोयलेटध्ये मध्ये अर्धा पाउन तास टैम्पास करुन आले . मिपावरच्या तीन चार श्टोर्या वाचुन काढल्या आयफोनवर .

बाहेर येउन बघते तर सासुबैंन्नी भाजी फोडनीला घालुन , शेपू नीट करुन , चपाती लाटायला घेतली होती . मी दिसल्यावर म्हणाल्या " लाट बै त्या चपात्या , थकले गं बै, पडते जरावेळ " म्हणत हाश्श ... हुश्श ... करत बाहेर गेल्या आणि मी शांतपणे एकहि उपदेश न ऐकता चपात्या केल्या .
दुसर्या दिवशी पून्हा व्यवस्थित मांडणी , फक्त डाळ फोडणीला घालुन ठेवली होती , उगी शंका यायला नको :-/.सासुबै आत आल्या , डाळीत वाकुन बघणार तोच " ओह्ह माय गॉड्ड , " असं म्हणत मी कपाळाला हात लावला ,त्यावर त्या काळजीच्या सुरात म्हणाल्या " काय गं , काय झालं ?" .
मग मी चेहेर्यावर खुपच टेन्शन आणत म्हटलं " अहो मॅकचा एक अर्जंट मेल येणार होता , त्याने दुपारपर्यंत येइल , मेलबॉक्स मधुन जाउन घेउन ये असं सांगितलं होतं , तो आता
फोन करेल , आणि माझ्या आत्ता लक्षात आलं , तुम्ही डाळीकडे लक्ष द्याल का , मी घेउन येते "
त्यांच्या रीप्लायची वाट न बघताच मी दाराकडे धाव घेतली , अर्धातास बाहेर टैम्पास केल्यावर घरी आले , बघते तर काय सासुबैंनी भाजी नीट करुन चपात्या लाटायला घेतल्या
होत्या , मी धावतच जौन त्यांना म्हटलं " अहो सासुबै कशाला करत बसलात , मी केलं असतं नं आल्यावर , अहो त्या शेजारच्या विल्सन काकु भेटल्या मग काय सोडायलाच तयार नैत , बसले मग ५ मिन्ट गप्पा मारत त्यांच्याशी "
मी दिसताच सासुबैनी हातातुन हळुच खाली ठेवलेलं लाटनं मी घेतलं न राहिलेल्या चपात्या लाटुन घेतल्या . सासुबै शांतपणे बाहेर सोफ्यावर जाउन बसल्या .

असं आण्खी पाच सहा दिवस कधी टॉयलेटचं तर कधी मॅकच्या न येणार्या मेलचं तर कधी फोनचं तर कधी कायपण कारण देउन मी सटकतेय ते पाहुन सासुबैंचं कीचनमध्ये येनच हळु हळु कमी , मग बंदच झालं , त्यावेळात त्या " मी जरा थोडं चालुन येते गं " असं म्हणु लागल्या .
एका वेळी एकच या नियमानुसार मी आठवडाभर किचन एके किचन हि मोहिम फत्ते केली .

आता माझा मोर्चा मी बाहेर जाताना नेहेमीच त्यांचं सोबत येणं जे मला ज्याम खटकायचं , त्याकडे वळवला . अ‍ॅक्चुली माझं घर शॉपिंग मॉल /सेंटरपासुन जवळजवळ ५ मैल लांब आहे , ५ मैलाच्या आवारात जवळपास एकहि साधं दुकानहि नाहिय , त्यामुळे गाडीशिवाय पर्याय नाहि .
अश्यावेळी एखादी विसरलेली वस्तु आणायच्या बहाण्याने बाहेर पडलेल्या जीवाला पूढे पार्लर मध्ये म्हणा , एखाद्या मैत्रिणीकडे म्हणा ... तसच पूढे जाउन एखाद्या शॉपिंग मॉल मध्ये म्हणा ... असं कुठे तरी भटकावसं वाटतच ना ! पण सासुबैंच्या सारखच सोबत येण्यानं मला पाय साखळ्दोर्‍याने बांधल्यासारखं झालं होतं . यावर काहितरी तोडगा काढायलाच हवा असं ठरवलं .

मग एके दिवशी ह्या मोहिमेला हाती घेउनच टाकलं . त्या म्हणाल्या " थांब गं , मीहि येते " . मी म्हटलं " चला ".
मग आम्ही दोघी एका मॉल मध्ये शिरलो , तिथुन एका कपड्याच्या दुकानात पोहोचलो . तिथे एक टॉप अतिशय आवडला , सासुबैन्नीही त्या टॉपवर पसंतीची मोहोर चिपकवली.
मग आम्हि बिल करन्यासाठी काउंटरवर पोचलो . पर्स उघडली , आणि मी उडालेच . " पून्हा सॉल्लिड टेन्शनमध्ये येत , " ओह्ह म्माय गॉड्ड " करत मी कपाळाला हात लावला!
तश्या त्याहि टरकल्या , अक्शरशा कपाळावर आठ्या आणत त्यांनी " काय गं ? " म्हटलं , तशी चालुच झाले
मी : " अहो सासुबै माझं वालेट घरीच राहिलं बहुतेक ? "
सासुबै : " म्हणजे गं " ?
मी : " अहो म्हणजे माझी छोटी पर्स , त्यात पैसे , डेबिट , क्रेडिट सगळेच कार्डहि आहेत "
सासुबै : " आणि मग ही पर्स? ह्यात काहिच नसतं का ? "
मी : " नाहि कसं , असतं ना "
असं म्हणत मी माझी पर्स त्यांच्या समोर रीकामी केली . एक हेअर ब्रश , नेल्पेंट्स, २/४ लिप्स्टिक्स चे शेड्स , छोट्टासा मेकप बॉक्स , स्कार्फ , गॉगल , क्लिन्झर , सॅनिटरायझर,
एक दोन फेशिअल वाइप्सचे पाउचेस पण होते ... बरच काहि निघालं पर्समधुन .सगळ्या वस्तुंकडे मोट्ठा आ वासुन पहात होत्या , शेवटी बोल्ल्याच
सासुबै : , " आता काय हे सगळं त्या बाइला देउन टॉप विकत घेणारेय्स काय "
मी : " नाहि ओ सासुबै , तुम्हाला दाखवत होते कि हे सग्गळं असतं माझ्याकडे "
सासुबै : " अगं अक्खं कपाट पर्समध्ये घेउन फिरण्यापेक्षा एकच बार्कुशी पर्स त्यात पैसे एवढच वागवावं कि हातात , आमचं बरं बै , दोन चार नोटांची शीगरेटी एवढी सुरळी करुन ब्लाउझमध्ये ठेवुन दिली क्का ना चोराची भिती ना पैसे पडायची ".
एक मात्र होतं सासुबै कुठेहि बोलायचा चांस सोडायच्या नाहित ... कौतुकच वाटायचं मला तर बै .
मी बापूडी त्या टॉपकडेच बघत होती , जणु बिच्चडने का दुख तुम क्या जानो सासुबै . :-/ मी फारच बारीक चेहेरा करुन म्हटलं , " श्श्या , आता परत हाच पिस मिळणं अशक्क्य "
त्यावर अगदि अपेक्षित आणि हेच ... हो हो हेच हवं आसनारं उत्तर शेवटी एकदाचं मिळालच , " अगं आहेत माझ्याकडे पैसे मी देते "
" अहो नको सासुबै , र्हाउद्या हो ... "
" अगं आवडलाय ना तुला , आणि मला काय तुम्हीच तर देणार न पैसे ' परत ' , म्हणजे हवे असतिल तेव्हा " . सासुबै बर्र्याच महत्वाच्या शब्दांवर कम्मालीचा जोर देत बोलत होत्या . झालं बील केलं , टॉप घरी आणला . संध्याकाळी चहा सोबत मस्त कोबीचे भजी केले आणि टॉप घालुन मॅकच्या पूढे येत म्हटलं , " हे बघ सासुबैन्नी माझ्यासाठी नविन टॉप घेतला , त्यांना आवडला , त्यांनी मग माझ्यासाठी घेउनच टाकला " :D

सासुबै शॉक् सुनबै रॉक्

मक्या कसला खुश झाला , आईची चोइस न सुनेबद्दलचं प्रेम दोन्हीनी भरुन आलं होतं त्याला बहुतेक =))

माझे दिवस सॉल्लिड बिज्जी जात होते , आता हे झालं , पूढल्यावेळी काय करायचं ते आधीच ठरवावं लागायचं , ऐनवेळी पचका होता कामा नये म्हणुन खुप काळजीहि घ्यावी लागयची . असच आणखी एकदा त्यांना प्रोड्युस मध्ये घेउन गेले , तिथे कार्ड एक्सेप्ट करत नाहित , कॅशच द्यावी लागते , तेही एक्दम सुट्टेच . मोट्ठि नोट घेत नाहित , हे सगळं माहित असताना देखिल प्रोड्युस वाल्या बयेला मोठी नोट दाखवली , आणि सासुबैन्ना म्हटलं , " सुट्टे आहेत का हो ? " .
त्यानी गप्चुप काढुन दिले . मी मनात म्हटलं , विसरा आता हे सुद्धा :P
एकदा लायब्ररित घेउन गेली , म्हणजे त्याच आल्या होत्या सोबत ,मी तसच पूढे मॉलमध्ये नेलं . त्याना जास्त फिरवलं का त्या कंटाळुन जायच्या , 'घरी चल , घरी चल ' चालु करायच्या , पण मी ' थांबा हे पाहुन जाउ , ते बघुन जाऊ ' करत बसायचे . मी त्यांच्यासाठी एक एक्स्ट्रा पाण्याची बॉटल जवळ ठेवायचे , काळजी तर घ्यावीच लागायची ना .
कधी कधी तर चार पाच टॉप किंवा काहिहि कपडे घेउन ट्रायल रूम मध्ये जाउन टैम्पास करत बसायचे , त्या सारखं दरवाजा ठोकत बसायच्या , " अगं किती वेळ , आम्हाला साडी नेसायलाहि एवढा वेळ लागत नै , "
खरच ज्याम कुचक्यासारखं वागायला लागायचं मला , पण दुसरा पर्याय नव्हता . गोड गोड बोलुन काम्गिरि चालु ठेवली होती मी .
नंतर मग त्यानी सोबत येण्याबद्दल विचारायचच सोडुन दिलं , त्याऐवजी त्यानी टीव्ही वरच्या मालिका पहायला सुरुवात केली . मीच एकदा विचारलं
" सासुबै , येताय का ? " तर म्हणे ," नक्को , मला अमुक अमुक सीरीअल पहायची आहे " .
मी उगाच किंचितच उदास भाव चेहेर्यावर आणत म्हटलं , " ओह्ह "
तर म्हणे " पर्स घेउन जा हं !
मी म्हटलं , " अरे हो , बरी आठवण केलीत , बघितलं आजहि विसरलीच असती "

तर म्हणे , " क्का ? मी येनारच , असं ग्रुहितच धरलं होतस क्का काय . त्यावर मी उगाच हसुन म्हटलं , " नाहि नाहि , तुम्ही बघा तुमची सीरीअल , मी आलेच जाउन " :P

हुश्श......

आता घरचं वातावरण थोडक्यात असं होतं , मी सकाळी जिम वरुन घरी आले कि त्याना चहा द्यायचे मग साधारण ९ वाजता आम्ही दोघी नाश्ता करायचो , मग मी घर आवरुन स्वयंपाकाला लागायचे , त्या बाहेर चालायला जायच्या . सासुबै घरी येइपर्यन्त जेवन टेबलावर हजर असायचं . दुपारी मी माझी बाहेरची कामं करायला बाहेर पडायचे , त्यावेळी त्या थोडा आराम करुन टीवी पहात बसायच्या ... संध्याकाळी मॅक आल्यावर , कधी ते दोघं तर कधी आम्ही तिघहि थोडं फिरुन यायचो .माझं दडपण थोडं कमी
झालं होतं . आमच्यात आता सुसंवादहि होउ लागले होते .

दुपारी असच एकदा जेवताना सासुबैन्ना म्हटलं , " सासुबै तुम्ही कोथिम्बिरिच्या वड्या छान करता म्हणे " . खुश होत म्हणाल्या , " मक्याने सांगितलं ना ? त्याला फार आवडतात माझ्या हातच्या " .
" हो , कालच म्हणत होता , आई छान करते वड्या " . मग मी खाली मुंडी घालुन जेवु लागले तर म्हणे , " कोतिम्बीर आहे ना गं घरात ?"
मी म्हटलं , " हो , आहे कि ".
त्यावर शांतता . आम्हि जेवनं आटोपुन आपापल्या खोलीत गेलो . त्यादिवशी मला कुठेहि जायचं नव्हतं . मस्तपैकि नेटवर उचापात्या करत बसले होते .( मिपावरच्या सासुबैन्ना छळत बसले होते :D)

साधारण चार साडेच्यार च्या सूमारास किचनमध्ये कसला तरी आवाज येउ लागला म्हणुन पहायला गेले तर चक्क सासुबै कोथिम्बिर चिरत बसल्या होत्या , मी म्हटलं ," काय करताय सासुबै ? " तर म्हणे अगं एकहि धड कार्यक्रम नाहिय टिवी वर , म्हणुन म्हटलं चला आज कोतिम्बिर वड्या करुया " . मी जाम खुश झाले . खरतर मलाच खायच्या होत्या . " वॉव , मी काहि मदत करु का , मला सांगा काहि कापाकापीचं करायचं असेल तर " . मी मदतीचा हात पूढे ़करताच सासुबैन्नी तो घट्टच धरुन ठेवला ... मग आम्हि दोघिन्नी मिळुन कोथिम्बिरिच्या वड्या बनवल्या . रात्री जेवताना सासुबै सारख्या मक्याला विचारत होत्या , " काय रेतिखट नैत ना वड्या ? , कश्या झाल्यात रे ? तुला खायच्या होत्या ना ? " हे सगळे प्रश्न ऐकुन मॅकने हळुच माझ्याकडे पाहिलं , " अरे तु म्हणाला होतास ना आई जेवन छान बनवते , त्यात वड्या एकदम भारी बनवते , म्हणुन त्यानी आज तुझ्यासाठी बनवल्यात " मी मॅकच्या न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देउन टाकलं .

मग असच मॅकचं नाव सांगुन मी कधी त्यांच्याकडुन कडी बनवुन घ्यायची तर कधी धपाटे तर कधी रताळ्याच्या घार्या .... त्यांच्या हाताला जब्बर्दस्त चव होती .
आणि मी मला न जमनार्या गोष्टी त्यांच्याकडुन गोड गोड बोलुन करुन घ्यायचे .

एकदा सासुबै दुपार नंतर झोपुन ऊठल्यावर माझ्या खोलीत आल्या , थोड्या अपसेट दिसत होत्या . काहि होतय का ? काहि हवय का ? विचारलं तर म्हणाल्या नाहि ... सहजच . त्यांचा चेहेरा पाहुन म्हटलं , " चला बाहेर जाऊन येऊ " .. तश्या त्या उठल्या , तयारीला लागल्या . त्यांचं आवरेपर्यंत मी थर्मास मध्ये चहा आणि चहाचे मग , एक पाण्याची बॉटल असं सगळं घेउन गाडीत ठेवुन दिलं . जवळच दीड मैलावर एक गोल्फकोर्स चं मैदान आहे , बसायला एक दोन बेन्चेसहि आहेत . मी आणि मॅक कधी कधी चालत तिथे जातो , खुपवेळ तिथे टैम्पास करतो , छान आहे ती जागा .
तिथं गेल्यावर . आम्हि दोघीनी मैदानाच्या कडेने एकदोन राउंड मारले , मग एका बेन्चवर बसलो , दोघिन्साठी दोन मग चहाचे भरले ... त्यांच्या हातात देत म्हटलं ," सासुबै , करमत नाहिय का तुम्हाला ? "
त्या हसल्या , आकाशाकडे बघत म्हणाल्या , " अगदिच तसं काहि नाहि , पण एकटेपण येऊ नये आयुष्यात कधीच कुणाच्या "
माझ्या खुप जिव्हारी लागलं , वाटलं आपल्या अश्या वागण्यामुळेच तर नाहिना त्यांना असं वाटतय? " फार चुकिचं वागले का मी ? "
माझे सासरे ९वर्षांपूरीच गेले , तेव्हापासुन सासुबैन्नी एकट्याने दोन्ही मुलांची जवाबदारी व्यवस्थित पार पाडली .
"सासुबै तुम्ही ंमामंजीना काय हाक मारायचात ?" . मी खुपच धीट होउन संवादाला सुरुवात केली , वाटलं त्या थोड्या मोकळ्या होतील , मनात कधी कधी खुप काहि साठलेलं असतं , फक्त ते रीकामं करायला जागा हवी असते .
त्या खुप उत्साहाने बोलु लागल्या " कधी साहेब तर कधी यजमान म्हणायचे मी , पण एकटे असतानाच , बाकि कुणापूढे बोलणं व्हायचच नाहि " अगदि भरभरुन बोलत होत्या .
मग म्हणाल्या " ए काय गं , तु काय म्हणतेस मक्याला दोघच असता तुम्ही तेव्हा ? "
" इश्श्य , मी तर त्याला गोंंड्या कधी सोंड्या असं काहिहि म्हणते " फारच लाजत उत्तर दिलं , तर म्हणे , " ही कसली गं नावं " ... मग म्हटलं , " आता शोना मोना पिल्लु म्हणायला तो तेवढा नाजुक नैय्ये ना , म्हणुन गोंड्या सोंड्या म्हणते " :P

घरी आल्यावर रात्री मी मॅकला म्हटलं , " मी सासुबैन्ना तुला कोणत्या नावाने हाक मारते ते सांगितलं , तसा तो निदान चार पाच इंच तरी वर उडाला , मग म्हटलं , " अरे हो , हो ... ते ते वालं नाव नाहि सांगितलं ... बाकिचि सांगितली =))

त्या दिवसानंतर सासुबैन्ना मी शक्य तेवढा वेळ देऊ लागले , बाहेर फिरण्यापासुन , जेवण बनवण्यापासुन ते अगदि गप्पा मारण्यापर्यंत ...पण आत्ता जे काहि करत होते ते मात्र अगदी मनापासुन , मारुनमुटकुन नव्हे .

कुठल्याहि नात्यात संवाद हवाच ,त्याशिवाय ते उलगडत नाहि आणि घडतहि नाहि ..

तीन आठवड्या पूर्वी सासुबै भारतात परत गेल्या , जाण्या पूर्वी आम्ही दोघीन्नी मिळुन बॅकयार्ड मध्ये एक पिवळ्या गुलाबाचं झाड लावलं होतं , त्याला पहिली कळी आली की
सगळ्यात पहिलं मलाच सांगायचं हं !असं प्रॉमिस करुन घेतलं माझ्याकडुन .

आणि जेव्हा पहिली कळी आली तेव्हा मी त्यांना फोन करुन सांगितल , तर म्हणाल्या " अगं वेडाबाई , त्या कळीचा फक्त एक बहाणा होता ... त्या आडुन तुला वेगळच काहि सांगण्याचा तो एक प्रयत्न होता ;) " आणि पोटभरुन हसल्या ....

आय रीअली मिस्ड हर ....
_________________

अवांतर : लेख बराच मोठा झालाय , पण काय करणार सासु विषयच असा आहे , कि संपता संपत नै :-/

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

27 Nov 2013 - 1:12 am | बॅटमॅन

ओह्ह माय ग्वाड्ड!!!!!!!! काय त्या कल्पना आणि युक्त्याप्रयुक्त्या!!!! नाना फडणिसांचीच आठवण झाली एकदम ;)

बालिका रॉक्स...सासुबै शॉक्स =))

ते नंतरच इमोषणल एक असो पण आम्हाला मात्र सासू विरुद्ध सून हा सामना रङ्गलेला पाहून लै मज्जा आली.

सासू कुजकेपणे बोलणार | सून आडून प्रतिवार करणार |
बालिका डिट्टेलवारी लिहिणार | मज्जा येणार निश्चित ||

एक्दम गोड शेवट (अजुन जास्त गोड होइलच कालांतरानी)
बादवे, सासुबै मिपावर येतात का ?

जेनी...'s picture

27 Nov 2013 - 3:04 am | जेनी...

नाहिओ ... नाहि येत त्या ..

दोन तलवारी एकाच म्यानात कश्या बरं राहातिल :-/

अगोचर's picture

27 Nov 2013 - 5:59 am | अगोचर

पण दोन गोळ्या दुनळी बंदुकीत एका वेळी बसतात ना !
(ह घ्या ! )

यशोधरा's picture

27 Nov 2013 - 5:28 am | यशोधरा

क्या बात! क्या बात!

पैसा's picture

27 Nov 2013 - 8:19 am | पैसा

गंमतीशीर आणि इमोसनल एकत्र लिहिणार्‍या एका आंतरजालीय मित्राची आठवण झाली. फक्त शुद्धलेखनाची अगदीच काशी घातलीय ते जरा बघा. एरवी चांगल्या झालेल्या भाजीत मिठाचे खडे घातल्यासारखं वाटतंय

स्पंदना's picture

27 Nov 2013 - 8:26 am | स्पंदना

शी बाई पैसाताई!
तुला मित्रच जास्त आहेत. ;)
अग शिकुन घे. अनुभव घेउन शहाणे होण्याऐवजी वाचुन शहाणे झालेले कधीही चांगले.
पूजा देवपूजेचे पुढे काय झाले? माझ्यामते देवांना तसे गोमुत्रात नहाताना पाहुन देवच काय पण दानवपण घरापासुन दुर राहिले असतील.
बाकी हा भाग ते काय म्हणतात ना तसा नॉस्टॅल्जिक वगैरे वाटवणारा झाला. (हो! मला येथे भांडायला, राजकारण करायला कोनी नाही अहे ना म्हणुन.)
बाकी हे मस्ती कम इमोशनल प्रकरण खरच कुणाची तरी आठवण करुन देते.

पैसा's picture

27 Nov 2013 - 9:03 am | पैसा

:)

जेनी...'s picture

27 Nov 2013 - 9:51 am | जेनी...

सासुबै :-/

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2013 - 9:51 am | अत्रुप्त आत्मा

@फक्त शुद्धलेखनाची अगदीच काशी घातलीय ते जरा बघा. एरवी चांगल्या झालेल्या भाजीत मिठाचे खडे घातल्यासारखं वाटतंय>>> =))

बाकी बालिके, या लेखाच्या एंड'वर लक्ष ठेउन आहे! ;)

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2013 - 4:49 pm | टवाळ कार्टा

सासु ती सासु असते हो...दुप्पट पावसाळे बघितलेले असतात ...हि तर आत्ताशी दात दाखवायला लागली आहे ;)

प्रमोद देर्देकर's picture

27 Nov 2013 - 8:59 am | प्रमोद देर्देकर

मग पुजाताई कधी बोलवतेस बारशाला!
आणि तु भारतात आल्यावर सासुबाई बुमरँग सार्ख्या उलट्या नाही फिरल्या म्हंजे झाले.

विटेकर's picture

27 Nov 2013 - 9:07 am | विटेकर

खूपच छान , सुंदर लेखन . खूप आवडले.
असेच लिहित रहा ! ( "बाकी टारगट पणा पुरे करुन" हे न लिहिलेले बिट्विन द लाईन वाचावे )
रच्याकने . घरच्या गुलाबाला कळी आली की नाही ?

जेपी's picture

27 Nov 2013 - 9:23 am | जेपी

आवडल . :-)

रिम झिम's picture

27 Nov 2013 - 9:44 am | रिम झिम

आपल्या नवर्‍याचं आपल्यावर खुप प्रेम असेल तर त्याच्या माणसांची मनं जपायचीच तरच ते प्रेम
द्विगुनित होतं असं एकदा आई दिदिला सांगत असताना मी ऐकलं होतं

मग तुम्हाला काहि वेगळे सांगितले होते कि काय?
(सासुबाईंना कसे जिंकावे वगैरे युक्त्या )

जेनी...'s picture

27 Nov 2013 - 9:50 am | जेनी...

अहो झिमा काकु , आई दिदिला सांगत असताना मी ऐकलं होतं , दिदिचं लग्न माझ्याधी झालय ना
आणि आई मला जास्त काहि सांगत बसत नै , तिला माहितिय मी खुप शानीये ते :P :D

रिम झिम's picture

3 Dec 2013 - 4:36 pm | रिम झिम

लिंग नका हो बदलू Please.... :)

चाणक्य's picture

27 Nov 2013 - 10:15 am | चाणक्य

मजा आली वाचताना.

आदूबाळ's picture

27 Nov 2013 - 11:03 am | आदूबाळ

झकास!

पूजा तै तुम्ही शिरिअलीत का जात न्हाई तिथल्या व्हिलन्सच्या क्लृप्त्यांचा दर्जा तरी वाढंल थोडा!! :P

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2013 - 2:40 pm | अत्रुप्त आत्मा

@ तिथल्या व्हिलन्सच्या क्लृप्त्यांचा दर्जा तरी वाढंल थोडा!! >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

वडापाव's picture

27 Nov 2013 - 2:44 pm | वडापाव

न्हाई ओ पूजा तै चांगल्या हायेत... त्यांना व्हिलन न्हाई म्हटलं मी. :) उगाच आमच्यात भट्टी लावू नका!!! आधीही बराच मार खाऊन झालाय तेंच्या हातून :P तेंच्या आयडिया आवडल्या बास!! :D

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2013 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/ugly-man-laugh-smiley-emoticon.gif

कवितानागेश's picture

27 Nov 2013 - 2:54 pm | कवितानागेश

चो च्वीत. :)

प्यारे१'s picture

27 Nov 2013 - 3:00 pm | प्यारे१

सासुबै ड्यु आयडी घेऊन वाचत असणार पूजाबै, सांभाळून बरं. =))

आणि सुनांना कितीही वाटलं तरी सासूबै पण हुशार असतातच कारण 'साँस भी कभी बहु' असतातच की!

ब़जरबट्टू's picture

27 Nov 2013 - 4:18 pm | ब़जरबट्टू

तुझा पगार किती ?? तू बोलतो किती ?? हेच बेष्ट वाटते... ते वयाचे काढा बघू... :)

प्यारे१'s picture

27 Nov 2013 - 4:31 pm | प्यारे१

असू द्या हो. तेवढीच चार दिवस मजा. नंतर बदलायची/ काढायची आहेच. :)

दिपक.कुवेत's picture

27 Nov 2013 - 3:39 pm | दिपक.कुवेत

मजा आली वाचुन.....

(सॅन्डवीच झालेला) दिपक

युगन्धरा@मिसलपाव's picture

27 Nov 2013 - 4:02 pm | युगन्धरा@मिसलपाव

खरच मजा आली खूप मला माझे लग्न झाल्या वरचे दिवस आटवले.
माझ्या ससुबैन्च्या खुप अटि असत स्वयंपाका बद्द्ल पन मि हि युक्त्या वापरुन सर्वन्चि मने न दुखवता निभावुन नेल.

ब़जरबट्टू's picture

27 Nov 2013 - 4:19 pm | ब़जरबट्टू

मस्त लिव्हलय व ताई.. आता या भारतात.सासूबाई गेम करतात बघा तुमचा... :)

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2013 - 4:50 pm | टवाळ कार्टा

"गेम" पर्फेक्ट =))

मी_आहे_ना's picture

28 Nov 2013 - 1:55 pm | मी_आहे_ना

हाहाहाहा .. मस्त प्रतिसाद

जेनी...'s picture

28 Nov 2013 - 9:30 pm | जेनी...

:-/

मुक्त विहारि's picture

27 Nov 2013 - 4:44 pm | मुक्त विहारि

झक्कास...

तिमा's picture

27 Nov 2013 - 5:29 pm | तिमा

लेखन सत्यावर आधारित असो वा काल्पनिक! मस्तच जमवून आणलंय. शेवट अगदी गोग्गोड केलाय.

च्यायला गेमाडपंथी हैस्की तु.. ;)
शेवट पण आवडेश..

विजुभाऊ's picture

27 Nov 2013 - 6:48 pm | विजुभाऊ

बिच्चारा म्याक....तो बघ कसा हुश्शार.......
दोघींच्यात गप्प रहाण्यात शहाणपणा आहे हे त्याने ओळखलय

मनीषा's picture

27 Nov 2013 - 8:21 pm | मनीषा

सासूबै खूपच चांगल्या आहेत बिचार्‍या ..

आणि शेवट अगदी नारळीपाकाच्या वड्यांसारखा मऊसूत आणि गोग्गोड झाला आहे .
रिअ‍ॅलिस्टिक वाटत नाही. :D

जेनी...'s picture

28 Nov 2013 - 12:22 am | जेनी...

अगं मग काय भांडणं करुन पाठवायला हवं होतं काय सासुबैन्ना भारतात :-/
मग मी परत गेल्यावर मला ठेवतिल का नीट त्या :-/

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2013 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

:) अजून क्रमश: येउदे !
मग मी खाली मुंडी घालुन जेवु लागले हे वाचून "खाली मुंडी, ... .." ही म्हण आठवली.

जेनी...'s picture

28 Nov 2013 - 12:28 am | जेनी...

=)) .....

सगळ्यांना थॅक्स :)

विटु काका इ लोवे टार्गट्पणा :-/

विजुबौ खरय , मॅक शांत व्रुत्तीचा प्राणी आहे , मी काहि बोललेलं सासुबैंच्या कानापर्यंत पोचु देत नाहि कि त्या माझ्याबद्दल काहि बोलतात कि नाहि हे मला आजवर कळलेलं नाहि .
तो म्हणतो सासु सुनेच्या वादात आपले कान बंद करुन ठेवणे हि ख्र्या सुखाची गुरुकिल्लीच :P

लीलाधर's picture

28 Nov 2013 - 12:41 am | लीलाधर

पूजे फारच चौकस लेख लीव लायस बग आवडेश लै भारी :))

का माहित नाही पण सासूबाईनची दया येवू लागली आहे. जपा पुजातै त्यांना… जमल्यास कळीची विच्छा पूर्ण करा.

खट्टु काका .... न जमायला काय झालं :-/

:P

ठीक आहे मग बाराष्याला बोलवा….

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Nov 2013 - 7:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

मलातर मॅकचीच दया येउ लागलीये..बाहेर आहे म्हणुन थोडक्यावर निभावले हो. भारतात परत आल्यावर काय करेल बिचारा? रोजचेच होणार ना सासू-सून प्रकरण?

ऋषिकेश's picture

28 Nov 2013 - 9:51 am | ऋषिकेश

क्लृप्त्या प्रेडिक्टेबल होत्या ;)
पण लिहिलंय इतकं खुसखुशीत की क्या बात!

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Nov 2013 - 12:02 pm | बिपिन कार्यकर्ते

छान लिहिलंय!

मी_आहे_ना's picture

28 Nov 2013 - 2:01 pm | मी_आहे_ना

छान खुसखुशीत लेख, आवडला. मॅकला (समसुखी असल्याने) अनेकानेक रिगार्डस् ;)

भावना कल्लोळ's picture

28 Nov 2013 - 2:45 pm | भावना कल्लोळ

पुजे, मस्त झाला आहे लेख… बाकी नात्यामध्ये संवाद असावा हे पटेश मला. कारण काही अंशी आमचे सासू- सुनेचे नाते मी असेच फुलवले. वादावादी होत्याच पण कालातंराने आल इज वेल.

सोत्रि's picture

28 Nov 2013 - 9:53 pm | सोत्रि

मस्त, अगदी मनापासून.

कुरघोड्या करता करता अचानक घेतलेले नाजूक वळण आवडले.

- (सासू आणि सून ह्यांच्या कात्रीत कातरला गेलेला) सोकाजी

युगन्धरा@मिसलपाव's picture

29 Nov 2013 - 3:08 pm | युगन्धरा@मिसलपाव

पूजा असच विनोदि लिखाण तुझ्या अमेरिका मधल्या काहि अनुभवांवर लिहि ना.
मस्त जमुन आली आहे विनोदाचि भट्टि.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2013 - 7:35 pm | अत्रुप्त आत्मा

+१

सुप्रिया's picture

30 Nov 2013 - 10:39 am | सुप्रिया

मस्त...खुसखुशित झालय लेखन ..

सुहास..'s picture

30 Nov 2013 - 9:14 pm | सुहास..

हा हा हा !!

सत्य असल्यास नाईस ट्रिक्स ;)

बाप्पू's picture

30 Nov 2013 - 10:04 pm | बाप्पू

लेख आवडला

अग्निकोल्हा's picture

30 Nov 2013 - 11:05 pm | अग्निकोल्हा

मिपा शोक्स!

रेवती's picture

2 Dec 2013 - 11:37 pm | रेवती

शेवट आपडला गं पुजू. ;)

स्पंदना's picture

3 Dec 2013 - 12:09 pm | स्पंदना

ए! काय आवडल तुला?
मला सांग हे लेखन तुला पुजाच वाटतय की मॅकच? म्हणजे ते "तुझी आई......" अस पुजा म्हणते तेंव्हा मॅकन मोडता घातला की लगेच ती शब्द बदलते. अस होउ शकतं? शकतं? सांग मला. तुझ्या मनातल्या सूनेला स्मरुन सांग, होउ शकेल अस?
मग त्या क्लुप्त्या. आता या असल्या साध्या साध्या क्लुप्त्यांनी माघार घ्यायला पुजाचे सासू काय कधी सून नव्हती? ती अशी गप्प माघार घेइल?
अन मग पुजा...कोणतीही जातीवंत सून आपल्या सासूबरोबर प्रेमाचे संवाद करणार नाही. इथे ही चक्क करतेय. हे सगळ सुरवात होताना खर लिहीत मग शेवटी पुरुषी गोड शेवट केला गेलाय. एकून हे लिखाण सौ.पुजा यांचे नसुन श्रीयुत मॅक यांचे असावे.

पैसा's picture

3 Dec 2013 - 12:58 pm | पैसा

अपर्णा, माणसाचा स्वभाव या विषयावर तुझी पी यच डी आहे!!

अभ्या..'s picture

3 Dec 2013 - 1:07 pm | अभ्या..

हम्म.
शेवट गोड करावा फ़क्त पुरुषानीच :-D

पैसा's picture

3 Dec 2013 - 1:10 pm | पैसा

अरे, बायको आणि आई सुखाने एकत्र रहात आहेत हे कोणत्याही पुरुषाचं स्वप्न असतं आणि प्रत्यक्षात येणं लै कठीण!! असो. कळेल लौकरच!!

बॅटमॅन's picture

3 Dec 2013 - 3:59 pm | बॅटमॅन

कीती भांडखोर त्या बायका!!! कोण म्हणत होतं रे बायका शांत वैग्रे अस्तात म्हणून? पाशवी हा शब्दही कमी पडेल ;) =)) :yahoo:

स्पंदना's picture

4 Dec 2013 - 3:43 am | स्पंदना

अरे वा! बटु? तू करतोस ते हुच्च वाद अन चर्चा अन आम्ही साध एक रोजच्या जीवनातल निरिक्षण नोंदवल तर तो भांडखोरपणा? हिप्पोक्रॅट म्हणतात ते यालाच का? ऑ?
काय शिव्या दिल्या? काही अपशब्द दिसतोय? नाही! मग ते भांडण कस काय ब्वा?
आम्ही एक निरिक्षण नोंदवल. एक मुद्दा मांडला. क्या बोलता? :)

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 12:05 pm | बॅटमॅन

तू करतोस ते हुच्च वाद अन चर्चा अन आम्ही साध एक रोजच्या जीवनातल निरिक्षण नोंदवल तर तो भांडखोरपणा?

तुम्हाला पाहिजे ते समजा. सासू-सून सुखाने एकत्र न नांदणे याला भांडखोरपणा म्हणू की बेबनाव की अजून काही? लेबल तुम्ही सुचवा.

हिप्पोक्रॅट म्हणतात ते यालाच का? ऑ?

तुम्हीच काय ते समजा :)

काय शिव्या दिल्या? काही अपशब्द दिसतोय? नाही! मग ते भांडण कस काय ब्वा?

भांडणाची व्याख्या भलतीच शाळकरी ब्वॉ तुमची =)) असो.

आम्ही एक निरिक्षण नोंदवल. एक मुद्दा मांडला. क्या बोलता?

मीही त्या निरीक्षणावरून एक निष्कर्ष मांडला तर हमरीतुमरीवर यायचे कारण ते काय? सासू-सुना एकत्र धड नांदत नैत हे तर 'तुमच्या पक्षाचे' वाक्य, त्यावरून जर मी म्हटले की त्या भांडखोर असतील तर व्हाय डू यू गेट वर्क्ड अप? इन अ सेन्स माझा आरोपच खरा करताय की काय असे वाट्टे =)) असो.

पैसा's picture

4 Dec 2013 - 12:50 pm | पैसा

बॅट्या का? जा तिकडे "झेंडू" ची फुले गोळा कर बघू!

बॅटमॅन's picture

4 Dec 2013 - 12:56 pm | बॅटमॅन

लेडीज फर्ष्ट!

यशोधरा's picture

4 Dec 2013 - 1:00 pm | यशोधरा

ओये, जास्त गुडगुडनेका नय! :D
ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!!

ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!!

इथेही पहिले आप (अर्थातच रिशीव्हिंग एंड ला) ;)

(पळा पळा कोण पुढे पळे तो)

बॅटमॅन's picture

3 Dec 2013 - 2:54 pm | बॅटमॅन

अरेरेरेरेरे.............स्त्रीच स्त्रीचा शत्रू असते हे अशा पद्धतीने सिद्ध होईल असं वाटलं नव्हतं.

वाईट वाटल्या गेले आहे ;)

अर्रर्र बॅट्या थांब थांब. एवढेच नै कै. ;)
लै गोष्टी सिध्द झाल्यात. जरा नीट वाच तरी वरचे चार पाच प्रतिसाद. ;)

वाचले आणि लेखनार्थ अवगत जाहला हे विज्ञापना ;)

पैसा's picture

3 Dec 2013 - 3:33 pm | पैसा

आता?

बॅटमॅन's picture

3 Dec 2013 - 3:38 pm | बॅटमॅन

आम्ही जातो आता घरी, वाजण्याआधी बारा!!! :yahoo: =))

अभ्या..'s picture

3 Dec 2013 - 3:42 pm | अभ्या..

आता?

आता काय??
नेहमीचेच. वाचनमात्र करा धागा. :)

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 3:46 pm | प्यारे१

सासूला सारख्या सूचना करु न येत ;)

पूजाने खरोखरच चांगला लेख लिहिला आहे..
अवांतर प्रतिसाद मात्र जरुर उडवावेत, अगदी हा देखील !
पूजा :
हे असं असतं ! म्हणोन ग बाई , आपली पत ठेऊन असावे. त्यातून तु़झी सासू संपादक मंडळात !
जपून असावं ग पोरी .. काऴजी वाटते !

प्यारे१'s picture

3 Dec 2013 - 3:28 pm | प्यारे१

=)) =))

विजुभाऊ's picture

3 Dec 2013 - 8:12 pm | विजुभाऊ

ब्याट्या......... तुला रे अविवाहिताला या गोष्टी ठौक?

अहो जे सभोवती दिसतं ते पहायला कै विवाहित असण्याची गरज नस्ते म्हटलं विजुभौ ;) =))

नै, ते बरोबरे तुमचं अपर्णाताई, पण हे यांचं घर्चं म्याटर आहे आपल्याला पटलं नाही तरी चार शब्द त्यांनी खर्च केलेत तर निदान प्रतिक्रिया द्यावी म्हणून उशिराने दिली.
होऊ दे खर्च,
म्याटर आहे घर्चं.

स्पंदना's picture

4 Dec 2013 - 3:36 am | स्पंदना

___/\___!

अभ्या..'s picture

3 Dec 2013 - 3:10 pm | अभ्या..

आपडला

=)) =)) =)) =))
आपडी पोड पोड पोड.

अस्ति पोडे कैयाले! इपडी पोडे पोडे पोडे, इपडी पोडे कैयाले!
मन्नोरं गणपती गणा मोति यारा इन्न पोह वेंडुमा...
इन्न पोह वेंडुमा टटाटाटाटाटाटा...

रेवती's picture

3 Dec 2013 - 6:56 pm | रेवती

ही ही ही.

रेवती's picture

3 Dec 2013 - 6:56 pm | रेवती

ही ही ही.

पूजा, वाचताना खूप छान वाटले. शेवटी तुम्हाला आपल्या सासूबद्दल उत्पन्न झालेले प्रेम व जिव्हाळा मनाला स्पर्श करून गेला. शेवटी आपण सर्वजन मनातून एकटेच असतो आणि नकळत हि भावना मनाला पोखरून काढत असते. अश्यावेळी जर आपल्याशी दोन शब्द प्रेमाने बोलले तर जगायला उभारी येते. माणसाचा स्वभाव बदलायला वेळ लागत नाही, फक्त आपले म्हणणारे कोणीतरी हवे असते.

पूजादादांचा लेख माझ्याही मनाला स्पर्श करून गेलाय माधवीताई!

पुज्जू दादा तरी म्हणायचंत किमान =)) :yahoo:

ओह्ह्ह म्हणजे मी दादा आहे असं म्हणायचय् का संपादक बाई तुम्हाला ??

बरं बरं ....