मुक्त कविता

तुझ्या आठवणीत...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
1 Nov 2016 - 2:47 pm

तुझ्या आठवणीत...

बहरलेल्या वेलीवर
एक कळी खोळंबली
तुझ्या आठवणीत ति
अजून नाही उमलली

गाभाऱ्यातील ज्योत
मंदपणे तेवली
तुझ्या आठवणीत
हळूच लवलवली

आभाळातील चांदणी
रात्रभर गुरफटली
तुझ्या आठवणीत
पहाटे ति चमचमली

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

स्मरशील का?

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
31 Oct 2016 - 11:25 am

स्मरशील का?

सदोदित आईच्या कुशीत
कधी माझ्या कुशीत शिरशील का?

सदोदित आईच्या मागे मागे
कधी माझ्या मागे फिरशील का?

सारे हट्ट आईला सांगतोस
कधी कधी मला मागशील का?

साऱ्या गुजगोष्टी आईला सांगतोस
कधी कधी मला सांगशील का?

पोटासाठी दूरदेशी मी
कधीतरी मला स्मरशील का?

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

क्षणाचे सोबती....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
29 Oct 2016 - 8:28 am

क्षणाचे सोबती....

कशाला हवेत नगारे नौबती
आपण सारे क्षणाचे सोबती

जुळुनी येती जेव्हा प्रेमाची नाती
कशाला हवीत रक्ताची नाती

नुसतेच फोफावती वृक्ष सारे
भगवंताच्या माथी तृणाचीच पाती

वृथा तळपती सूर्याची किरणे
तिमिरात तळपती समईच्याच ज्योती

रोवून दाव एकतरी निशाण
जगात आहेत मोजकेच जगज्जेती

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

स्वप्नातले कोंकण

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
28 Oct 2016 - 8:32 am

स्वप्नातले कोंकण

साधेच घर माझे , छोटेसे अंगण
त्यात अवतरले, सारे वृक्षगण

अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन
माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन

अंगणात माझ्या, कर्दळीचे पान
घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण

नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान
नैवेद्याला सजते, केळीचे पान

परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण
शंकरास वाहते, बेलाचे पान

स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण
त्यात असावे घरकुल माझे छान

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

चारोळी

गौरी कुलकर्णी २३'s picture
गौरी कुलकर्णी २३ in जे न देखे रवी...
28 Oct 2016 - 12:58 am

नजरेलाही नजरकैदेत ठेवले असता
नजरेतही तूच दिसलास ,
स्वतः दुःख देऊन मला
असा दर्दभरा का हसलास ?

कधी व्हावे गुलाब असे मला वाटे
पण नंतर आठवी की जीवनात असती काटे
मग त्या गुलाब प्रमाणे माझाही कंठ दाटे
परंतू सर्वांनाच उमगे या गुलाबाचेच रहस्य मोठे !

मुक्त कविताचारोळ्या

विश्वस्ता...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 8:17 am

विश्वस्ता...

जगावेगळा आहे मी फिरस्ता
चोखाळतो मी अनोळखी रस्ता

लावतो मलम मी परोपरी
घाव घालणे हा तुझा शिरस्ता

राहतो हजर प्रत्येक समारंभास
बांधतो वेदनेचा नेहमी बस्ता

केला गुन्हा, केली प्रीत तुजवरी
आयुष्यात काढल्या अनेक खस्ता

झालो चरणी लीन नियतीच्या
आता तुझाच आहे भरवसा विश्वस्ता

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

शैशव...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
26 Oct 2016 - 8:19 am

शैशव...

जे सुख लाभले शैशवास
पुन्हा ना लाभे मानवास
अन्न वस्त्र अन निवारा
ह्याचाच लागे ध्यास

कोठे हरवले ते निरागस
बालपण अन विश्वास
जसेजसे वाढू लागलो
वाढू लागला अविश्वास

जन्मताच काय तो घेतला
एक मोकळा श्वास
आता मात्र घुसमटतोय
प्रत्येक श्वास प्रत्येक श्वास

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

वाट हरवून गेली...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
25 Oct 2016 - 8:23 am

वाट हरवून गेली...

अशीच ती माझ्या समोरून गेली
जणू नभात वीज चमकून गेली

मिळता नजर डोळे दिपवून गेली
उधळीत गंध उडता पदर सावरून गेली

जाता मागे मागे मने जुळवून गेली
कळलेच नाही कधी वाट हरवून गेली

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

सवाल...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
24 Oct 2016 - 8:58 am

सवाल

लालचुटुक ओठ तिचे
मऊसूत गाल
पापण्यांआड दडलेले
डोळे तिचे कमाल

नजरेत तिच्या तलवार
अन नजरेतच ढाल
तिरपा एक कटाक्ष
होतो मी हलाल

गाली गुलाब फुलतो
उधळीत सुगंधी गुलाल
कुरळ्या केसात फिरतो कर
करी शांतता बहाल

रोज झोपतो मी हि
ओढून स्वप्नाची शाल
सत्यात कधी उतरेल
हाच नशिबाला सवाल

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

सल...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
23 Oct 2016 - 8:54 am

सल

लाव धार माझ्या खंजिरी
घेईन म्हणतो जरा ऊरी
नाही सहन होत आता
तुझ्या आठवणीची मुजोरी

तुझी आठवण आहे काचरी
दिवस रात्र मला जाचरी
नको आता आयुष्याची शंभरी
नको तुझ्या आठवणींची शिदोरी

सांग तुला पण हेच का वाटते
माझी आठवण डोळा दाटते
बुडवून टाक अश्रूच्या सागरी
आयुष्यातील एक सल बोचरी

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक