!! आता !!

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
4 Nov 2016 - 5:36 pm

आता माझी कोणाला तमा होतच नाही
प्रियजन म्हणून मी "त्यांना"...केली थोडीशी घाई,
मी जगलो ज्यांच्यासाठी ते दूरवर निघून गेले,
आता खांद्यांवर घेउनी ओझे, घरट्यात एकटा राही !!

इमारतीच्या माडीमध्ये कधी तरी दरवळतो ही गंध ,
तिथल्या भिंती ही साक्षी, मी कैसा होतो बेधुंद,
पण जसे पावसात गज गंजावे तश्या गांजल्या सऱ्या नाती,
पडक्या इमारतीला आता परत दुरुस्ती होणे नाही !!

पारिजात होऊन दारी, मी घातला सडा फुलांचा,
घेऊन आश्रय माझा, काही पिल्ले मोठी होत होती,
जे बळ आले त्या पंखांना, खग होऊन ते ही उडाले,
सारे तसेच होते नंतर ही तरी पारिजात पुन्हा मोहरले नाही !!

आयुष्याच्या या वळणावरती आता हा एकटेपण छळतो,
"माणूस एकटा येई नी जाई" हा सिद्धांत बरोबर कळतो,
एकटा या मनाला भूतकाळाची ओढ भारी,
आता घरात थोड्या आठवणी न विखुरलेल्या भिंती काही !!

मुक्त कवितामांडणी