मुक्त कविता

अंधारलेल्या निशा...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
12 Oct 2016 - 8:30 am

अंधारलेल्या निशा...

पाहून स्वप्ने उद्याची
सोकावली आहे निराशा
आता कोठे जागू लागल्यात
आठवणी जराश्या

का करीशी वणवण
या रखरखलेल्या वाळवंटात
आता कोठे विसावल्यात
उन्हात सावल्या जराश्या

आजूबाजूला कोलाहल किती
कोण ऐकेल माझे
वाचाळ झाली आता कोठे
माझी मौनाची भाषा

ना भिजते मन माझे
या कोसळत्या पावसात
राहतं नाही माझ्या
आठवणी पारोश्या

भरकटत जात आहे मी
दिशाहीन झाल्या या दिशा
दाविती उजेड मज
या अंधारलेल्या निशा

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

मोल...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
10 Oct 2016 - 9:00 am

मोल...

या दुनियेत कोणी कोणाचा नाही
जो तो पैशात तोलुनी पाही

नव्हता मजकडे पैसा
जो आजपण नाही
म्हणून तर आजपण कोणी
मला ओळखत नाही

सारी नाती गोती बेताची
ठेवून अंतरे वितांची
गळाभेट तर नाहीच नाही
साधी विचारपूस पण नाही

या दुनियेत कोणी कोणाचा नाही
मी पैशाचा वा पैसा माझा नाही
राहतील फक्त शब्द माझे
त्याला काही मोल नाही

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

बासरी....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
7 Oct 2016 - 8:31 am

बासरी....

मनमंदिरी वाजू लागली बासरी
मनमोहना लागली तुझीच आस

रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं
घननीळा लागला तुझाच ध्यास

कुंजवनी घुमू लागला पावा
कृष्णा करिते तुझाच रे धावा

हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू
वेड लावलेस या राधेला जणू

शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली
पाहून आता ना जीवनाची आस उरली

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

नवलाई...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
6 Oct 2016 - 10:58 am

नवलाई...

ही सवय तुझी का मला माहीत नाही?
उशीरा येऊन लवकर जाण्याची घाई

अंमळ थांब जराशी मन अजून भरले नाही
नभी चंद्रमा झुलतो, अजून रात सरली नाही

गाली फुलतो गुलाब त्यावर चंद्रकिरणांची झिलई
तुझ्या लडिवाळं बोलण्याची रोज वाटते अपूर्वाई

आपण दोघे जागे जग शांत झोपले
पांघरून स्वप्नांची दुलई

जागेपणी पाहतो आहे आपण
उद्याच्या स्वप्नांची नवलाई

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

गुपित

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
5 Oct 2016 - 8:36 am

गुपित

थांब जरासा अजुनी
अजून समईत वात आहे
थांब जरासा अजुनी
अजून चांदरात आहे

कोमेजून जरी गेला चाफा
कोमेजून जरी गेला गजरा
थांब जरासा अजुनी
रातराणी बहरात आहे

उलटुनी गेला प्रहर
रात्र संभ्रमात आहे
थांब जरासा अजुनी
चाहूल उदरात आहे

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

नव्या युगाची पहाट

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
4 Oct 2016 - 9:02 am

नव्या युगाची पहाट

आल्हाददायक तुझे आगमन
दिनकरा, जसे आमचे बालपण

तळपत असते माध्यान्य
भास्करा, जसे आमचे तरुणपण

मलूल असते संध्याकाळ
दिवाकरा, जसे आमचे म्हातारपण

कापून टाक या किरणांनी
मरिचया, संसाराचे हे मायाजाल

घे कवेत मला हे अग्निरुप
हिरण्यगर्भा, कर पापांचा नायनाट

करून टाक भस्म हा नश्वर देह
अदित्या, उगवू दे नव्या युगाची पहाट

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

झड श्रावणाची

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
3 Oct 2016 - 4:54 pm

झड श्रावणाची

अचानक श्रावणाची झड ती आली
अंग अंग भिजवून गेली
ओल्या केसातून बट ही ओघळली
चिटकून बसली गोऱ्या गाली

मोहक हालचाल सुखावून गेली
नकळत डोळे विस्फारून गेली
कवेत घेता काया ही थरथरली
चित्तवृत्ती मोहरून गेली

त्रेधातिरपीट उडवून गेली
यौवनास माझ्या खिजवून गेली
जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली
श्रावणात होते पापणी ही ओली

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकविताप्रेमकाव्यमुक्तक

श्रावण...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
30 Sep 2016 - 9:16 am

श्रावण...

फेकून चादर काळोखाची
सोनपावली उन्हे उतरली
वारा शीळ घाली
धरती नवचैतन्याने थरथरली

पावसाच्या शिडकाव्याने
हिरवी काचोळी भिजली
लेऊन हार नवकुसुमांचा
नवयोवना जणू हि सजली

घेण्यास बाहुपाशात
नभ टेकले क्षितिजा पलीकडे
उधळीत सप्तरंग आकाशी
इंद्रधनुकली हि अवतरली

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

मनाचा एकांत - काळे पाणी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
30 Sep 2016 - 7:55 am

अंदमानातले काळे पाणी,
कोलूबेड्याहंटरकदान्न
सोबत तीव्र अपमानाचा overtime !
साम्राज्याचा उग्र दर्प अन
देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा.......
असे सगळे, अन वरती थोडी
जयहिंदची जाळी !

या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही,
काही काही रक्तांचे
malnourishment कि काय ते झालेच नाही!
उलट,
तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही
त्यांच्या जहालहळव्या लेखणीने
cultured झाल्या!
मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी,
.
.
.
दुसरं काय होता
एकांत म्हणजे तरी!

- शिवकन्या

अविश्वसनीयकविता माझीकालगंगाभावकवितामुक्त कविताविराणीवीररसधोरणमांडणीवावरसंस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजराजकारण

काजळरेषा

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
29 Sep 2016 - 10:00 am

काजळरेषा

का भिरभिरते नजर तुझी?
ओलांडू नको रेषा काजळाची

वाटत नाही का भीती कोणा रावणाची
ठेव जाणीव लक्ष्मणाच्या वचनांची

नको देऊस कष्ट वनवासी रामाला
नको देऊस प्रश्न या समाजाला

अग्निदिव्य शेवटी तुलाच आहे
भूमीत जन्म अन भूमीतच शेवट आहे

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक