वेग
मरण एवढे सोपे झाले
जगणे अवघड झाले आहे
आता यम एकटा नाही
जागोजागी त्याचे चेले आहे
म्हातारे कोतारे मरती
तरुण मरती रस्त्यावरती
मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते
लहानपणीच आयुष्य संपले आहे
सारे ओढवून धेतलेस तू मानवा
वेगाने तुला भारले आहे
आपल्याच भाऊबंदास
तू स्वतः मारले आहे
राजेंद्र देवी
प्रतिक्रिया
22 Oct 2016 - 9:39 am | चांदणे संदीप
एक चांगला टेप घ्या... फुटातला नाही मीटरातला! काय??
Sandy
22 Oct 2016 - 9:54 am | राजेंद्र देवी
धन्यवाद...
22 Oct 2016 - 10:23 am | चांदणे संदीप
धन्यवाद नको रे राज्या माज्या. मीटरात आण रे कविता! :/ :/ :/
Sandy
22 Oct 2016 - 10:25 am | चांदणे संदीप
खाता पिता.... धन्यवाद.... धन्यवाद आणि धन्यवाद.... प्रतिसाद तरी वाचतोस का नाही रे बाबा??
22 Oct 2016 - 10:26 am | राजेंद्र देवी
धन्यवाद...
22 Oct 2016 - 12:32 pm | चांदणे संदीप
ठार मेलो! :(
22 Oct 2016 - 4:52 pm | राजेंद्र देवी
धन्यवाद....