पुढील पाच मिनिटात
पुढील पाच मिनिटात, हे मानवते
"अ" अतिरेकी काळिमा फासतील तुझ्या तोंडाला
"ब" बलात्कारी झुकवतील तुझी मान शरमेने खाली
"क" कोवळी बालपणं विकली जातील बाजारात
"ड" डोकी फुटतील धर्ममार्तंडांच्या एका भृकुटीभंगाने तुझ्या डोळ्यादेखत
ई-पेपर्स सांगून थकतील "अ" "ब" "क" "ड" च्या मिनिटागणिक वाढत जाणाऱ्या किंमती
रोम-रोम जळताना तुझ्या जीर्ण-शीर्ण त्वचेच॑
हे उत्सवी फिड्ल कोण वाजवतंय न थांबता?