जेथे जातो तेथे....

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
4 Aug 2017 - 7:37 am

जेथे जातो तेथे तो माझा सांगाती
चालतो तयाला हाती धरुनिया

गेलो कोठेही तरी देतो आधार
दाखवितो मार्ग सदैव मजला

सगळे ते नम्बरं ठेवी ध्यानी नीट
कनेक्टेड रात्रंदिन केलो देवा

तयासी मी सदा खेळतो कौतूके
नेट वरी सुखे संचार अंतर्बाही

बॅटरी होता डाऊन जीव कासावीस
धाव घेतो सत्वर चार्जर कडे

इंग्रजी, मराठी टाईपतो वेगे
त्यानेची अंगठे बहाद्दर केलो देवा

जगात नेटवर्क्स विविध अनेक
ड्युएल सिमकार्ड वापरी प्रसंगी

बॅलन्स तो संपतो असा भरभर
रि-फिलचे बळ अंगी देई देवा

रात्री साथ देई माझिया उशाशी
प्रभाते आन्हिकाआधी दर्शन तयाचे

फोन अलार्म संगीत प्रसंगी वाटाड्या
नानाविध रिंग-टोन भुलवी मजला

फोटो, चलतचित्रे ठेवीतो हृदयी
सुखद त्या सगळ्या आठवणी माझ्या

जळी, स्थळी, पाषाणी असे तत्पर
टिपण्या हसरी सेल्फी छबी माझी

न पडे प्रश्न कसा टाइम पास
खेळे गेम खेळीया प्रसंगी माझा

ध्यानी मनी सदैव चिंतन तयाचे
सांगावा इकडून तिकडे क्षणार्धात

जोडुनिया आभासी जगाशी मजला
सर्वज्ञ श्री गोगलदेवा दर्शन घडवी

करणेषु मित्र कार्येषु दास
असा तो प्रियतम् सखा माझा

बरे झाले देवा तू मोबल्या निर्मिला
विसरुनी जगाला स्व मग्न जाहलो

जेथे जातो तेथे तोच माझा सांगाती
तोच माझा सांगाती....

मुक्त कविताविडंबन

प्रतिक्रिया

एस's picture

4 Aug 2017 - 12:58 pm | एस

हा हा हा! एकच नंबर!

चामुंडराय's picture

9 Aug 2017 - 5:24 am | चामुंडराय

.

मलाही आधी ते S भाऊच वाटत होते, पण त्यांच्या ख.व.मध्ये गेल्यावर कळले की ते Ace भाऊ आहेत.

चामुंडराय's picture

9 Aug 2017 - 6:31 am | चामुंडराय

स्वारी बर्का एक्का भाऊ तुमचे नाव चुकल्या बद्दल. तुम्ही कुठला एक्का म्हणायचे - बदाम, किल्वर कि चौकट? एक इस्पीकचे आहेत म्हणे त्यामुळे ते नाही विचारले :)

सौन्दर्य's picture

5 Aug 2017 - 10:25 am | सौन्दर्य

जेथे जातो तेथे मी त्याचा सांगाती
चालवितो मज हाती धरोनिया.

चामुंडराय's picture

16 Aug 2017 - 5:50 am | चामुंडराय

हे छानच आहे. तो माझा सांगाती ऐवजी मीच त्याचा सांगाती :)

आता हि कल्पना धरून आणखी कडवी ऍडवा सौन्दर्य सर !!

पद्मावति's picture

9 Aug 2017 - 1:56 pm | पद्मावति

मस्तच!

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2017 - 10:14 am | धर्मराजमुटके

एकच नंबर!