ते गाव मला माहित नाही, म्हणून बरं आहे.
तिथल्या सावल्या, चांदणे, उन्ह .. सारं काही माझ्याकडे सहज येतं.
कुठल्याही प्रकारच्या नात्याचा अडसर लागत नाही त्यात!
मी ही त्याच्याच सारखा 'सहज' ..,
म्हणून त्याला सहजपणे सामावून घेतो माझ्यात.
एकदा त्या गावाने मला विचारले, "अरे मुला.. , येत का नाहिस इकडे आत.. वेस ऒलांडून!? "
मी म्हटले, "नको रे , कशाला उगाच गावकरी होऊ मी? त्यापेक्षा हेच चांगलं आहे."
गाव म्हणते, " जे तुझ्याकडे न मागता सहज येतय, त्याच्याकडे तू नाही येणारं.. सहज... एकदातरी? "
मग म्हटलं सांगावच याला सर्व, "अरे गावा... " तू ज्या गोष्टिंना 'तुझ्या गावातल्याच' समजतो आहेस.. त्या सावल्यांना, चांदण्याला, उन्हाला.. विचारून तर बघ एकदा.. ते 'तुझ्या गावचे' आहेत तरी काय? "
गाव खट्याळपणे हसले.., म्हणाले, " पक्का लबाड हं तु.. तू बाहेरचा म्हणून फक्त तुझाच! .. ते सगळ्यांचेच.. म्हणून कुणाचेच नाहीत.. अता उमगले मला..
माझिही अवस्था बरिचशी तुमच्यासारखीच आहे! "
-----------------------------------
अतृप्त...
प्रतिक्रिया
24 Nov 2016 - 11:38 am | किसन शिंदे
कळले नाही हो बुवा, जरा विस्कटून सांगता का?
24 Nov 2016 - 12:46 pm | अत्रुप्त आत्मा
इथे. सरांनी (तेच ते आपले पांडुचे लाडके.. ). स्थितीवर भाष्य केलय... मी म्हटलं आपण परि'स्थितीवर करावं! ;)
7 Dec 2016 - 12:59 am | बॅटमॅन
मायला इथेही पांडू आलाच का? =)) =)) =))
25 Nov 2016 - 2:44 pm | कवि मानव
माझी ही जवळपास हीच अवस्था आहे... मलाhi कळले नाही इथे कोणाला काई म्हणायचं आहे ते ??
25 Nov 2016 - 4:49 pm | अत्रुप्त आत्मा
तुम्ही एकदा फक्त कवी होऊन आणी एकदा फक्त मानव होऊन वाचून पहा.. . नक्की कळेल.. काय कळलय ते. ;)
2 Dec 2016 - 4:47 pm | विशाल कुलकर्णी
हा फाऊल आहे हा, असं नसतं कधी. ;)
24 Nov 2016 - 11:50 am | यशोधरा
थोडं थोडं समजलं हो बुवा. ब्येष्ट.
24 Nov 2016 - 11:56 am | मितान
चांगली कविता बुवा !!! आवडली.
24 Nov 2016 - 12:10 pm | चांदणे संदीप
नाही, हेच तुम्ही सिद्ध केले बुवा!
'अता' उमगले मला... असं म्हणणारं गाव विरळाच पण, नाही का?
Sandy
24 Nov 2016 - 12:44 pm | अत्रुप्त आत्मा
@'अता' उमगले मला... असं म्हणणारं गाव विरळाच पण, नाही का? ››› सही पयचान्या. ..
ते सर.. मात्र लोकांना ह्या अवस्थेत "जा" .. असं स्वत: जणू त्यातलेच असल्याचा आव आणत सांगत असतात.
24 Nov 2016 - 1:06 pm | टवाळ कार्टा
यात भरपूर कच्चा माल दिसतो आहे मला =))
24 Nov 2016 - 1:20 pm | अत्रुप्त आत्मा
वत्सा...,
मग कशाला थांबतोस? त्यातला घे की काही तुला! =))
24 Nov 2016 - 2:17 pm | प्रचेतस
सुरेख मुक्तक
25 Nov 2016 - 3:17 pm | सतिश गावडे
सहमत आहे.
24 Nov 2016 - 4:18 pm | सूड
जल्ल्ला काय्येक कल्ला नाय.
24 Nov 2016 - 5:07 pm | नाखु
"कूट"कथा असू शकेल, एक तर टक्याच सांगू शकेल नाही तर डोंबोलीकर !!!
24 Nov 2016 - 5:35 pm | सूड
मुवि?
25 Nov 2016 - 8:54 am | नाखु
बुवांच नाव ज्याच्या प्रतिसादाशिवाय पुर्ण होत नाही तो अद्वैत पांडुरंग!!!
28 Nov 2016 - 5:10 pm | सूड
ओह आय सी!!
24 Nov 2016 - 11:57 pm | एस
हम्म. भारी आहे.
25 Nov 2016 - 6:13 am | चौकटराजा
काही कल्ला नाही यातच याकवितेचे यश आहे. बुवांच्या आयुष्यात एक नवीन गाव आले अतः त्यांंच्या कवितेने एक वळण घेतलेय. ती आता मुक्त होउ लागली आहे अता " बद्ध" कविताना रामराम केलेला दिसत्योय.म्हंजे पहा कवि " बद्ध" झालाआहे पण कविता मुक्त ! असेच असते. कविचे खाजगी आयुष्य व कविता याम्चा सम्बंध असतोच असे नाही ! ( इति पाडगावकर ).
25 Nov 2016 - 7:17 am | अत्रुप्त आत्मा
दुष्ट दुष्ट!
25 Nov 2016 - 3:02 pm | कंजूस
26 Nov 2016 - 3:21 pm | सिरुसेरि
सुरेख आत्मकथन . कुठेतरी या गाण्याच्या अर्थाशी साधर्म्य जाणवले .
" रंगुनी रंगात सा-या , रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सा-या , पाय माझा मोकळा "
26 Nov 2016 - 4:24 pm | अत्रुप्त आत्मा
बरोब्बर.
26 Nov 2016 - 11:42 pm | ज्योति अळवणी
आवडली कविता. प्रत्येकाचा आपलाच असा अर्थ पडतो आपल्या वाचनात.
27 Nov 2016 - 10:11 pm | पैसा
कविता आवडली.
28 Nov 2016 - 11:33 am | अत्रुप्त आत्मा
सर्व वाचक / प्रतिसादकांना मन:पूर्वक धन्यवाद.
2 Dec 2016 - 4:48 pm | विशाल कुलकर्णी
सुरेख जमलय मुक्तक, आवडलं !
5 Dec 2016 - 4:58 pm | रातराणी
+1