मिठी
समोरंच एका मुलीनी मुलाला मारलेली निर्व्याज मिठी बघून वाटलं
"सालं, आपल्यावेळी नव्हतं असं काही"
आताही ती असती अन तिन हे बघितलं असतं तर
हळूच हसंत म्हणाली असती
"आपल्यावेळी नव्हतं बाई असं काही"
मी उगाचंच आठवणींच्या गर्तेत..
दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्या पकडू पाहतोय मनांत
पूर्वीच्याच अल्लडपणे.