मुक्तक

जिव्हाळघरटी

समयांत's picture
समयांत in जनातलं, मनातलं
2 Dec 2017 - 4:04 pm

मनाच्या काचेवर कापरासारखे आपले बालपण ठेवले तर ते भुर्र उडून जाते, ते उडूच नये असे वाटते, हसरे मन लेऊन जन्मतो आपण प्रत्येक जण मात्र इथूनच ते हरवून द्यायला..

पण नेहमी रडतोसुद्धा आपण तरी दिवसेंदिवस लागतात आपले हसू विरायला, पहिला दिवस खळाळून जातो हसण्या-रडण्यात, नंतर नंतर तर हसण्याला स्मृतीभ्रंश होतो आणि रडण्याला पेव फुटते.

नातं व्हावं कसं.. जराही उत्तम नको, तर मनावर काच ठेवून दिसत राहिलं नुसतं तरी निखळ..

ते नको नातं ज्यात नावाचे रकाने भरावेत, वंशाची जबाबदारी घेत.

छंदबद्ध तारे खुणावत राहावेत नात्यात, फुलांचा देठापर्यंतचा मागोसा जाणवत-घेत-शेवटत जाणारे.

मुक्तकप्रकटनप्रतिभा

मी...एक अ(न)र्थतज्ञ !!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
2 Dec 2017 - 3:18 pm

कालपरवा रिझर्व्ह बँकेचा एक लक्षवेधी अहवाल जाहीर झाला. आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. गेले काही दिवस जरा भविष्याच्या चिंतेतच होतो. या आर्थिक मंदीमध्ये आपली नोकरी टिकेल का? समजा नोकरी गेली तर दुसरी मिळेल का? पगार वगैरे कसा असेल? असे बरेच प्रश्न पडत होते. पण त्यादिवशी आरबीआयच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांनी माझ्यावर उपकारच केले म्हणायचे. आता मला ओळखणाऱ्या लोकांना वाटेल की, माझ्या टीचभर ज्ञानाचा, चिमूटभर कौशल्याचा, वेळकाढू नोकरीचा आणि तुटपुंज्या उत्पन्नाचा रिझर्व्ह बँकेच्या अहवालाशी काय संबंध? मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची शप्पथ घेऊन सांगतो, त्या अहवालाशी माझा काहीही संबंध नाही.

मुक्तकविरंगुळा

नजरेतच सारे..

समयांत's picture
समयांत in जे न देखे रवी...
1 Dec 2017 - 2:34 pm

तुझ्या डोळ्यांत पाहिले असता कसले नाते समोर कधीच आले नाही.
तुझी पापणी, आणि त्यावरचे रूंद लव झोक देऊन उघडझाप करतात, तेव्हा माझाही श्वास त्याच लयीत धपापायला लागतो.
तुझे तुझ्या भावनांचे डोळ्यांतून व्यक्त होतांनाचे प्रमाण केव्हाच कमी होत नाही.
कितीतरी क्षणांना काबीज करणारे, कितीतरी क्षणांमध्ये ओघळून जात असलेले तुझे डोळे मला हलकेच जपून ठेवायचे आहेत.
तुझी डोळ्यांतली न हरवणारी चमक मला कुठेतरी नक्कीच हरवून जाते.
माझ्याच नजरेत तुझी नजर एकत्र मिळते तेव्हाच का हे सारे घडत असते खास..

प्रेम कविताफ्री स्टाइलमुक्त कवितामुक्तक

ती त्सुनामी...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 Nov 2017 - 10:13 am

सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते
मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते
वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते
गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते
गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते
व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते
आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते

प्रलयतांडव ती त्सुनामी
आतले उधळून जाते
साचले सांडून जाते
घडविले उखडून जाते
वेचले विखरून जाते
मांडले मोडून जाते

....ती त्सुनामी विप्लवी
पण केवढे शिकवून जाते !

माझी कविताकवितामुक्तक

फुलपाखरा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
23 Nov 2017 - 4:36 am

का जागतेस तू शोना?
काय विचार करत असतेस तू?
का झोप येत नाही?
कोण? मी? 
तू जागी आहेस ना म्हणून, 
मी पण जागतोय
.
चमचम चांदणीसारखी टिमटिमत राहतेस
कधी कधी वाटतं
दिवसभर 
थोडा थोडा मी 
जमा होत जातो
तुझ्या डोळ्यात
आणि मग रात्री
झोपेला तुझ्या डोळ्यात
उतरायला जागाच उरत नाही
.
असं होतय का रे फुलपाखरा?
त्रास देतो ना बाबा असा?
दूर निघून जातो
आणि लेकरु बाबाला शोधत राहतं!
.
एक गंमत करुया
आज झोपलीस ना की
बाबाला तुझ्या स्वप्नात बोलावं

कवितामुक्तक

उठ मावळ्या ...

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
22 Nov 2017 - 11:13 pm

आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.

उठ मावळ्या फोडू चल नळ्या
कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या
चल मदिरालयी तु घुस
ये सोडूनि घास फूस

कोंबड्यासम केस रंगविसी
कोंबडीस मग का तू वर्जिशी
६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस
ये सोडूनि घास फूस

मुक्त कवितावीररसमुक्तकशब्दक्रीडाविनोदसमाजमत्स्याहारीमांसाहारीशाकाहारीमौजमजा

आता फक्त घासफूस ...

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
22 Nov 2017 - 2:54 pm

माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी.

केल्या रित्या बाटल्या
चकण्यांच्या ताटल्या
पडे बिअरचाच पाऊस
पण आता...
आता फक्त घास फुस

चापिल्या बोट्या
फोडिल्या नळ्या
ढेरी तुडुंब करी मन खुश
पण आता...
आता फक्त घास फुस

दिन ते गेले
वय ही झाले
झाली शरीराची नासधूस
अन आता ...
आता फक्त घास फुस

हास्यमुक्तकशब्दक्रीडाजीवनमानआरोग्यपौष्टिक पदार्थमांसाहारीराहणीवाईनशाकाहारीमौजमजा

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
20 Nov 2017 - 3:12 pm

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

....रंग-रेषा लांघणारे चित्र आहे
….वाचण्याला चांगदेवी पत्र आहे
….तप्तसूर्यावर उन्हाचे छत्र आहे
….सावळी आदित्यगर्भी रात्र आहे
...मुक्तीच्या पाशात वेडे गात्र आहे
…शत्रूला भुलवेल इतके मैत्र आहे
…फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे
…वास्तवाला तोलणारे यंत्र आहे
… प्राणफुंकर घालणारा मंत्र आहे
…अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे
....अंत ना आदि असे घटिपात्र आहे ...

....बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

.....बघ जरा कवितेत माझ्या काय आहे

माझी कविताकवितामुक्तक

चंद्रमण्यांचे पाझर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
15 Nov 2017 - 3:40 pm

आज माझ्या ओंजळीत
चंद्रमण्यांचे पाझर
भले विझून जाऊदे
माथ्यावर चंद्रकोर

पायतळी आज माझ्या
अब्ज-रंगी पखरण
भले अंधुक होउदे
इंद्रधनूची कमान

आज माझ्या रोमरोमी
ब्रह्मकमळ फुलेल
कोडे गहन कधीचे
विनासायास सुटेल

मुक्त कविताकवितामुक्तक