गझल

घे भरारी..मन म्हणाले...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
12 Mar 2017 - 7:38 am

घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो...
सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो!

जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती...
वाटले की..वाट चुकले कोकरु झालो!

राजरस्त्याची तमा ना आडवाटेची...
मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो!

गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले...
धन्य झाला जन्म की मी वासरु झालो!

बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!

हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!

घेतली हाती कलम बहुधा बरे झाले...
मी मुक्या संवेदनांची आबरु झालो!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

तिचे हासणे चांदण्याचा चुरा...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
10 Mar 2017 - 7:30 pm

जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा!

तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी...
तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा!

चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती...
तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!

कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा...
तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!

मराठी गझलशृंगारकवितागझल

अंदाजे-गालिब

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
9 Mar 2017 - 9:02 pm

शायरी म्हटलं कि गालिबचं नाव पहिलं ओठांवर येतं. आणि त्याच्यात प्रेमभंग वगैरे असेल तर गालिबला पर्याय नाही. त्या गालिबच्या काही शेरांचा मज पामराने लावलेला अर्थ.

संगीतगझलआस्वादलेखभाषांतर

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
8 Mar 2017 - 6:23 pm

सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो
मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो

वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर
नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो

वाटते आता भिती या चांदताऱ्यांची
मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो

शांततेवरची जरा रेषा हलत नाही
मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो

चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो
आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalहे ठिकाणकवितागझल

राउळी या मनाच्या

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
2 Mar 2017 - 2:28 pm

ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html

a

राऊळी या मनाच्या
वृत्तः भुजंगप्रयात

जसा चंद्र हा या महाली नभाच्या
तशी ती वसे राऊळी या मनाच्या

तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या

मराठी गझलशांतरसकवितागझल

गजलांकित प्रतिष्ठान

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
15 Feb 2017 - 12:07 pm

जनार्दन केशव म्हात्रे आणि त्यांच्या गजलांकित प्रतिष्ठान बद्दल (आंतरजालावर स्वतंत्र स्रोतातून पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे माहितीची खात्री करुन हवी अथवा दुजोरा हवा आहे.

गजलांकित प्रतिष्ठान
https://mr.wikipedia.org/s/30r3
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गझल

जनार्दन केशव म्हात्रे -व्यक्ति परिचय

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
14 Feb 2017 - 2:38 pm

विकिपीडियाचे माध्यम गवसल्याच्या उत्साहात अनवधानाने काही विकिपीडियन्सकडून स्वतः बद्दल लेखन होत असते. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची निश्चिती असेल तर ते ठेवले जाते. मराठी भाषेत विवीध क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेण्या जोग्या पुरेशा नोंदींच्या अभावी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे अवघड होते. किंवा सर्व व्यक्ति / विषय मराठी विकिपीडियनना परिचीत असतातच असे नाही.

गझलसाहित्यिकसमीक्षा

शांत अता या गाजा होणे नाही ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
8 Feb 2017 - 9:53 am

रंक कधीही राजा होणे नाही
(त्याचा गाजावाजा होणे नाही)

तू राणी आहेस चार भिंतीतच
खुला अता दरवाजा होणे नाही

तू तेथे मीही येथे आहे पण
मला तुझा अंदाजा होणे नाही

मी सारे विसरुन चाललो आहे
घाव नव्याने ताजा होणे नाही

मी नेकी दर्यात टाकली आहे
(शांत अता या गाजा होणे नाही)

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalमराठी गझलहे ठिकाणगझल

दु:ख अवघा धृवतारा मागते

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
6 Feb 2017 - 11:56 am

मागचा सारा चुकारा मागते
दु: ख अवघा धृवतारा मागते

थेंबही नाही उभ्या रानात अन
जिंदगानी शेतसारा मागते

केवढे जहरुन हे गेले शहर
वीषही आता उतारा मागते

वेदना ओथंबुनी येतात अन
सूख मोराचा पिसारा मागते

जो कधी उधळून ती जाते स्वत:
प्रीत तो सारा पसारा मागते

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalहे ठिकाणकवितागझल

माणूस

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Feb 2017 - 8:16 pm

(हि गझल मला पूर्वी डिसेंबरच्या महिन्यात इथे टाकल्यासारखी वाटतेय. पण आता कुठेच सापडत नाहीये मिपावर त्यामुळे गोंधळलोय. पुनरावृत्ती होत असल्यास कृपया कुठली तरी एकच प्रत ठेवावी ही संपादक मंडळाला विनंती.)

माणसांना बदलण्याला वेळ कोठे लागतो ?
बदलण्याने काळ ही माणूस कोठे बदलतो?

नित्य येथे हातघाई अन लढाई प्राक्तनी
हारण्याचे लाख रस्ते, रोज आता शोधतो

भाकरीचे शोधताना चंद्र रस्ता हरवला
वाटमारी जीवनाची कोण येथे टाळतो ?

पोर कोणाची गुलाबी स्वप्न विकते हासुनी
नजर चुकवुन रोज मी ही काच का हो चढवतो?

मराठी गझलगझल