मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
8 Mar 2017 - 6:23 pm

सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो
मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो

वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर
नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो

वाटते आता भिती या चांदताऱ्यांची
मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो

शांततेवरची जरा रेषा हलत नाही
मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो

चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो
आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalहे ठिकाणकवितागझल

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2017 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा

छान.

अनन्त्_यात्री's picture

9 Mar 2017 - 10:13 am | अनन्त्_यात्री

सुन्दर कविता ! लागी कलेजवा कटार !!!

क्या बात है सर.. अहाहा...

वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर
नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो

चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो
आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो

केवळ अप्रतिम...

शब्दबम्बाळ's picture

9 Mar 2017 - 1:16 pm | शब्दबम्बाळ

सुंदर!
"वाटते आता भिती या चांदताऱ्यांची
मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो"

चांदणे संदीप's picture

9 Mar 2017 - 1:58 pm | चांदणे संदीप

वाह! अप्रतिम!

डॉक्टरसाहेब एकदा थोडासा वेळ मिळेल का तुमचा? निवांतपणे...
तुमच्या गजला आणि कविता प्रत्यक्ष तुमच्या कडून ऐकण्याची इछा आहे! ___/\___

Sandy

नक्कीच संदीप, तुमचा मोबाईल नंबर द्या.
aaskmed@gmail.com

अनुप ढेरे's picture

9 Mar 2017 - 2:39 pm | अनुप ढेरे

खूप छान!

संदीप-लेले's picture

9 Mar 2017 - 4:40 pm | संदीप-लेले

व्वा व्वा, क्या बात है !

चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो
आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो

drsunilahirrao's picture

11 Mar 2017 - 8:20 am | drsunilahirrao

___/\__

आत्मबंध, अनंतयात्री, गवि,
शब्दबम्बाळ, चांदणे संदीप, अनुप ढेरे फुत्कार

सत्यजित...'s picture

11 Mar 2017 - 12:57 pm | सत्यजित...

शेर क्र.२,३,४ विशेष!

पैसा's picture

11 Mar 2017 - 1:58 pm | पैसा

सुरेख कविता!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2017 - 1:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 12:09 am | संजय क्षीरसागर

वाटते आता भिती या चांदताऱ्यांची
मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो

हे खास ! आणि हे तर,

शांततेवरची जरा रेषा हलत नाही
मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो

त्याहून खास !

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 12:15 am | संजय क्षीरसागर

तुमच्या लयकारीची एक खासियत आहे. तोल जाईल असं वाटतं आणि.... तेवढ्यात कविता स्वतःला सावरते !

drsunilahirrao's picture

14 Mar 2017 - 6:55 pm | drsunilahirrao

thanks :)

drsunilahirrao's picture

14 Mar 2017 - 6:54 pm | drsunilahirrao

धन्यवाद
सत्यजित, पैसा, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सर, संजय क्षीरसागर

शाली's picture

14 Mar 2017 - 7:37 pm | शाली

मस्तच!!!