सत्यमेव जयते.
सत्यमेव जयते.
सत्यमेव जयते.
विजयादशमी...!!
बैलगाडी संथगतीने गावाच्या दिशेने जात होती. सूर्य मावळतीला जात होता. मावळतीची शांतता, सूर्याचा तांबूस प्रकाश आजूबाजूला पसरला होता. सगळे अवतीभोवतीचे वातावरण एका लयीत शांत शांत भासत होते. परतीचे पाखरे अधून मधून नजरेस पडत होते. बैलगाडीचा तो खडs खडss आवाज, या अशा वातावरणात मजेशीर वाटत होता. ते तिघेजण गाडीत शांतपणे बसून, त्या आजूबाजूच्या वातावरणाची शांतता कायम ठेवत होते. गाव साधारणता अजून, सहा मैल बाकी असेल. खरंतर त्यांनी गावात पोहोचायला घाई करायला हवी होती. कारण रात्र लवकर सुरू होणार होती. रात्रीचा तो काळाकुट्ट अंधार, आजूबाजूला पसरणार होता. पण त्यांची ती संथ चाल आहेत तशीच कायम होती.
सीमोल्लंघन..!!
आजकाल बहुतेकजणांच Work from Home जोरात आहे. त्या वर गाजलेला कुकर शिट्टीचा विनोद आपल्या सगळ्यांना माहित आहेच. तुमच्या घरात जर बालमंडळी असतील तर बघायलाच नको. हि बालमंडळी आपल Work कधी, कुठे आणि कस वाढवून ठेवतील ते सांगायलाच नको. वानगी दाखल आमच्या बालाचे काही किस्से इथे नमूद करत आहे.
भिती
आज दुपारपासुनच मळभ दाटून आलय. हवेतला उष्माही वाढलाय. आलोक गेले पाच दिवस ऑफिसच्या टूरवर दिल्लीला गेलाय. अस्मिताला एकटं रहायची खुप भिती वाटते खरंतर, ती कधीच आजवर एकटी राहिलीच नाहीए.
सासुबाई येणार होत्या पण तब्येतीमुळे नाही आल्या.
नाईलाज झाला अस्मिताचा.
त्यात अस्मिता- आलोक या नव्या बिल्डींगमधे नुकतेच रहायला आलेले. इतर दोघे तीघेच रहायला आलेत. पण अजून ओळखी नाही झाल्या.
लॉकडाऊनच्या काळात OTT वर बऱ्याच सिरीज/चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे, यातला काही कन्टेन्ट दर्जेदार होता तर काही अगदीच टाकाऊ. मला भावलेल्या काही सिरीज आणि चित्रपटांची यादी आणि माहिती थोडक्यात देतोय. तुम्हांला आवडल्या तर नक्की पहा. तुमच्याकडेही अजून काही पाहण्याजोग्या सिरीज आणि चित्रपटांची माहिती असल्यास खाली प्रतिसादामध्ये डकवा म्हणजे एक चांगली यादी होईल.
तू पाणी द्यावंस अशी माझी अपेक्षा नव्हतीच कधी..
बाहेर फोफावून वाढणाऱ्या मला तू तुझ्या बागेत रूजवलंस तरी
आभाळातून पाणी येतं आणि त्यावर वाढत राहणं हेच माझ्या जगात मला ठाऊक होतं त्या आधीहि लाखो वर्ष..
पण तू....
माझं एखादं पान जरी वाळलं तरी कोमेजतेस
येता जाता पाहत असतेस मला काही होतंय का
उन्हं उतरतात त्या खिडकीतून माझ्याकडे बघत राहतेस
माझ्या अंगावर फुलणारी फुलं तुझ्या नजरेत हसू फुलवतात
माझ्या पानांवरुन हात फिरवत राहतेस
मला जणू वाटतं कोणीतरी बोलतंय माझ्याशी
खूप काही सांगावं वाटतं
पण नाही सांगू शकत मी
"सम्या, अरे गधड्या ! आवरलं कि नाही अजून तुझं ?" नंदिनीचा आवाज आता आणखीनच वाढला.
एकतर सकाळची धावपळ सुरू होती तीची. आणि समीरचं अगदी हळुहळु रेंगाळत आवरणं चालू होतं. त्याची आज नेमकी शाळेची रिक्षा येणार नव्हती म्हणून त्याला शाळेत सोडून मग परत घरी येऊन बाकी कामं आवरून तीला ही साडेआठला ऑफिसला निघायचं होतं.
*माणुसकी*
बदलापूर स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पहात उभी होते. दादर ला जायचं होतं. एका मैत्रिणीकडे सगळ्याच जमणार होतो, जवळजवळ चार वर्षांनी भेटून अख्खी रात्र गप्पा, गाणी असा बेत होता. एक मैत्रिण दादर स्टेशनवरच भेटणार होती. खुप उत्साही वाटत होतं सगळ्या भेटणार म्हणून.
तेवढ्यात बदलापूर लोकल आलीच. लेडीजच्या मधल्या डब्यातून सगळी बायकांची गर्दी चिवचिवत बडबड करत उतरली. मग चढणा-या बायका, मुली घाई न करता सावकाश चढल्या. मी हल्ली नोकरी सोडल्यापासून प्रवास करत नाही लोकलने. त्यामुळे अशी ही दुपारची वेळ मला फारच आवडली होती प्रवासासाठी.