Night Out...! Part-2 (Last Part)
पाटीलने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तिथे आधी पासूनच दोन कॉन्स्टेबल उभे होते. "काय रे, कश्याला हात तर नाही लावला ना?" घोरपडे ने गाडीत बसूनच विचारले. "नाय sir" कॉन्स्टेबल ने उत्तर दिले. पाटील आणि घोरपडे गाडीतून उतरले. "कुठेय?" घोरपडे ने रस्त्याच्या कडेला थुंकत विचारले. "त्या झाडाकडे..." कॉन्स्टेबल ने झाडाकडे खुणावत सांगितले. "पाटील, बघा जरा जाऊन" पाटील, रस्त्या शेजारील झुडपे ओलांडत झाडाकडे जाऊ लागला. "अजुन काय काय सापडलं?" घोरपडे विचारपूस करू लागला. "ही एक अॅक्टिवा आणि purse. हे लायसेन्स आणि आधार कार्ड मिळालं त्यातून" एका कॉन्स्टेबल ने लायसेन्स आणि आधार कार्ड घोरपडे ला दिलं.