कथा

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
17 Jul 2020 - 11:17 pm

मौजे केर्ले-मार्गशीर्ष महिन्यातील एक निवांत दुपार. रब्बीची पेरणी होउन गाव तस निवांत झाले होते.गावकर्‍यांशी हवापाण्याच्या गप्पागोष्टी उरकून गावचा पाटील पारावर निवांत पसरला होता. डोक्याशी कुर्‍हाड ठेवून तो निवांत पारावर पसरला होता. भल्या पहाटे थंडीचे श्रम केल्याने त्याचा डोळा लागला इतक्यात गावच्या वेशीतून पोरेटोरे गलका करत चावडीकडे पळत आली. पोरांच्या दंग्याने जागा झालेला पाटील खेकसलाच,"काय कालवा लावला रे?". पोरं घाईघाईने बोलु लागली.पळाल्यामुळे धापा टाकता टाकता त्यांनी सांगितले कि उगवतीकडून एक फौज येत आहे.
फौज ?

कथाप्रतिसाद

खिडकीबाहेरचं जग!

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जनातलं, मनातलं
17 Jul 2020 - 5:45 pm

खिडकीबाहेरचं जग!

ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.

शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं..

ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती. खरं तिला किरणच्या सहवासात स्वतःचा जीव नकोसा होई.

किरणचं तिला नको असताना उगाच जवळ घेणं, बोलतं करायचा प्रयत्न करणं.हे सारं तिला अजिबात आवडत नसे.तरी ती सहन करी.फक्त झोक्यावर बसण्यासाठी.

किरण तिला झोक्यात बसवुन अखंड बडबड करे त्यावेळीही तिचं लक्ष मात्र खिडकीबाहेरच असे.

कथाप्रतिभाविरंगुळा

राजयोग-२१

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
17 Jul 2020 - 11:35 am

राजयोग - २०

***

बिल्वन परत येईपर्यंत राजाने कुकी जमातीच्या सैनिकांना परत जायला सांगितलं होतं. त्यांनी राज्यात मनमानी करायला सुरुवात केली होती. सैनिकांच्या टोळ्या विभागून टाकल्या होत्या. युद्धाची काहीही तयारी केली नव्हती.बिल्वनने परत येताच राजाला अथपासून इतिपर्यंत संपूर्ण प्रसंगाचे वर्णन केले.

राजा म्हणाला, “ठीक आहे ठाकूर, मी आता निघतो.राज्य, धन हे सर्व नक्षत्रसाठी आहे.”

कथाभाषांतर

फाटका ट्रेक ढाकचा...! भाग २... समाप्त

विखि's picture
विखि in जनातलं, मनातलं
14 Jul 2020 - 11:55 pm

मागच्या भागा पासुन पुढं...
गुहेत आल्याव फुल्ल एन्जॉय सुरु झाला.....

कथाअनुभव

फाटका ट्रेक ढाकचा...! भाग १

विखि's picture
विखि in जनातलं, मनातलं
10 Jul 2020 - 12:30 am

दुपारचे चारेक वाजले असतील. आमच्या गाड्या जांबवली गावात शिरल्या. रोड आता बरा झाला होता. कामशेत सोडल्याव तर लय वेळ डांबरी होता, नंतर सगळा फुफाटा. पन तरी पहिल्या मानानी चांगलाच होता.
"अय बारीक शाळेपशी गाड्या लावू" मी मागून आवाज दिला. तशा गाड्या तिकडं वळाल्या. चारी गाड्या शाळेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत शिस्तीत लागल्या. कन्टीन्यु तीन साडे तीन तास, गाडी चालवल्यामुळ मुंग्या आल्यागत झाल होतं. कामशेतला जरा किराना घ्यायला थांबलो तेवढच.
"च्यायला, शिट दुखायला लागलं गाड़ी चालवून चालवून" पुंडल्या गाड़ी लावून बाहेर आला.

कथालेख

पाऊस आणि ती

सहज सिम्प्लि's picture
सहज सिम्प्लि in जनातलं, मनातलं
8 Jul 2020 - 6:10 pm

ऐन जुलै महिना. पावसाने अगदी मनावर घेतलं होतं की ह्या वेळी कोणालाही तक्रार करायची संधी द्यायची नाही. आणि म्हणून तो दररोज मनसोक्त बरसत होता. बिचारे मुंबईकर नेहमीच पावसाचे बळी ठरतात. पण असा एकही मुंबईकर शोधून सापडणार नाही ज्याच्याकडे पावसाची एखादी रंगवून सांगावी अशी गोष्ट नसेल. त्या दिवशीचा तो दिवस हा असाच एक नेहमीसारखा पावसाळी दिवस होता, पण कोणासाठी तरी तो त्यांची पावसाळ्याची गोष्ट ठरला.

कथा

गुरु पूर्णिमा का साजरा केला जातो? (guru purnima marathi mahiti)

ytallfun@gmail.com's picture
ytallfun@gmail.com in जनातलं, मनातलं
5 Jul 2020 - 11:41 am

आज आपण बघणार आहे की गुरु पूर्णिमा का साजरा केला जातो? (guru purnima marathi mahiti), हेचे कारण गुरुची प्रमुख भूमिका भारतात मानली जाते. पण तुम्हाला माहित आहे गुरु पौर्णिमा का साजरा केला जातो? जरी जगभरातील एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला परिष्कृत करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य दिले गेले आहे, परंतु शिक्षण असेल तर भारतात शिक्षणाला महत्त्व दिले गेले आहे. अशी एक म्हण आहे की केवळ गुरुच आपल्या शिष्याला शर्ममार्गाचे दर्शन देतात.

कथामाहिती