धग
" संपूर्ण मानवजातीसमोर न भूतो न भविष्यती असे संकट उभे ठाकले असताना आपल्या देशातील सरकार आपल्याच देशबांधवांबाबत इतके निष्काळजी कसे असू शकते? फक्त ते गरीब आहेत म्हणून? त्यांच्या राहण्याचा तसाही काही ठावठिकाणा नव्हताच मग आता तरी त्यांची चिंता कशाला करा? की मग जातायत तर जाईनात का...उद्या त्यांच्या ओस पडलेल्या वस्त्यांवर टोलेजंग इमारती बांधून आपले तळवे चाटणाऱ्या अधिकारी, मंत्र्यांच्या पुढच्या पिढीची सोय करायची आहे? मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं. मग आजचे राजकारणी नक्कीच मनुष्य नाहीत. एक सत्ता सोडली तर इतर काहीही त्यांना प्रिय नाही.