स्वप्नाला पडली भूल
स्वप्नाला पडली भूल
उन्हाची चूल.
दे चंद्रभाकरी
थकल्या जीवा.
रानीचा वणवा
ताटावर ओणवा….
एकलाच गातो जोगी
थकलेले गूढ मंत्र…
एकटाच चेतवी जाळ
थकल्या सांजवेळी
स्मरणाचे पाप
जाळीतो लावून आग..
स्मरणाचा कचरा होतो
आशेची होते राख.
गुंतून जीव जातो.
मरण भयातच रमतो.
कृष्ण तेथे येतो.
भुईकडे नाळ मागतो.
जाळून इतिहास कंदीलात
आज मी स्वर्ग पाहिला.
काचेवर काजळीने
प्राक्तन उमटवून गेला