तुम्हाला तर माहितीच आहे ... कथा पूर्णपणे काल्पनिकच आहे. वस्तुस्थितीशी ह्याचा अजिबात काहीही संबंध नाही ... आणि देव करो, आणि कधीच काही संबंध येऊ पण नये ... बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहातच ...
–---------------------------------------------
"सर, एकदा बघून घ्या, प्लीज"
"तुम्हाला कितीवेळा सांगितलं, आपण अशा डिझाईनवर काम करणं खूप पूर्वी सोडलं आहे.
ह्या प्रकारचं डिझाईन तितकंसं परिणामकारक होत नाही. एकदा झालं आहे ना बघून आपलं !"
"हो सर. तुम्ही सोडलं असेल, पण मी नाही ! गेली अठरा वर्षे ह्या डिझाईनवर काम करतो आहे मी ..."
"हे बघा डॉक्टर, तुम्ही तुमचा आणि माझा, दोघांचाही वेळ वाया घालवत आहात."
"ठीक आहे, तुमचा नाही ना विश्वास ! एक दिवस दाखवून देईन मी तुम्हाला माझं डिझाईन काय करू शकतं ते !"
---
वृत्तनिवेदिका : "गेले ५ महिने चाललेल्या जागतिक महामारीमध्ये ३२लाख लोकांना ह्याची बाधा झाली असून २.५लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कित्येक देशांची अर्थव्यवस्था डबघाईच्या मार्गावर आहे."
प्रतिक्रिया
6 May 2020 - 10:50 pm | जव्हेरगंज
चांगली कल्पना!
पूर्वाधात डिझाईनची दाहकता जरा जास्त हवी होती!!
9 May 2020 - 12:37 pm | सौंदाळा
जबरदस्त
भयावह
9 May 2020 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम कथा आहे, लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे