सुटकेस ५

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
8 May 2020 - 1:51 am

सुटकेस ४
-----------------------
स्टेशनला गेलो आणि गाडी पार्क केली. मग तोबा गर्दीत सलीमची वाट बघत बसलो. तिकीट काऊंटरच्या आसपास भटकलो. साला नक्की कुठे असेल या विचारात असतानाच तो पुढे येऊन टपकला.
"चलो.." म्हणून मला सोबत येण्याची खूण केली. मी त्याच्या मागे मागे एका उड्डाणपूलाखाली अंधाऱ्या जागेत गेलो. तेथे एक भिकारी भीक मागत बसला होता. त्याच्याकडून कसलीशी पिशवी त्याने उचलली. आणि " ये ले" म्हणून माझ्याकडे दिली.
"क्या है इसमे..?" मी पिशवी चापचत विचारले. आतमध्ये तर जुने फाटके कपडे कोंबून बसवले होते.
"कोकेन.." तो शांतपणे म्हणाला. "ढूंढ मत, काफी मेहनत से छुपाया है."
"अच्छा!"
"लेकीन याद रख, अगर पकडा गया, हममेसे किसीका नाम नही लेनेका.." त्याने मला सक्त ताकिद दिली.
"बिलकुल" मी त्याला भरोसा दिला.
"अब निकल.." त्याने आदेश सोडला.

पिशवी घेऊन मी स्टेशनवर आलो. तिकिट काऊंटरवर तोबा गर्दी. रात्रीचे दहा वाजत आले होते. आणि अहमदाबाद एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर ऊभी होती. मग तसाच आत घुसलो.

स्लीपर कोचात साईड अप्परचं एक बाकडं रिकामं दिसलं. मग पिशव्या ठेवून निवांत पडलो. गाडीने वेग पकडला तसा टिसी येऊन दाखल झाला. बाकिच्यांचे तिकीट चेक करत करत त्याने माझेही तिकीट मागितले. मी दोन हजाराची कडक नोट सारत त्याला म्हटले, " एक अहमदाबाद देदो"
त्यालाही काय ते कळून चुकलं. त्यानं हातानंच एक तिकीट बनवलं आणि मला देत म्हणाला, "सीट रीजर्व्ह हो सकती है. बीच मे बदलनी पडेगी."
मी "ठिक है" म्हणत त्याचे आभार मानले. आणि पुन्हा एकदा आडवा झालो.

विक्याने व्हाटसआप पाठवले होते. चेक केले. बॉसने आज कुठल्याश्या कारणावरून दंगा केला असं काहीसं ते होतं. म्हणजेच कुठल्याश्या फालतू प्राण्याने त्याला जरूर झापलं असणार. हाहा.. पण रिप्लाय द्यायचे मी टाळले. इच्छाच मरून गेली होती कुठेतरी. आपण कुठे चाललो आहोत. कशासाठी. आणि हे थांबणार कुठे? प्रश्न डोळ्यात रुंजी घालायला लागले.

मी शुन्याच्या पार आतवर गेलो
लढलो
झगडलो
आणि केंद्रबिंदू झालो
स्तब्ध
निश्चल
याला अंत नाही
दरवाजा ठोठावतंय कोण?
अनादीकाळची चिरनिद्रा
एक आवाज घुमतो आहे
मी शुन्य आहे

"उठ बे भोसडीके.." गदागदा हलवत एक चांगलाच धिप्पाड माणूस समोर ऊभा होता. त्याचा वैताग मला स्पष्ट दिसत आहे. आपण कुठे आहोत हे क्षणभर मी विसरूनच गेलो. ठार उघड्या डोळ्यांनी विस्फारून भोवताली पाहत राहिलो. गालावर एक थप्पड पडली आणि टक्क जागा झालो.

"अबे ये मेरी सीट है. जल्दी खाली कर" तो बोलला.
"अब बहोत रात हो गयी है. दुसरी देखो यार.." मला कधी एकदा पुन्हा आडवा होईन असे झाले होते.
"તમે ચૂટિયા સમજી ગયા છો? देख तिकट पे सीट नंबर मेरा है. તમે વાહિયાત" मध्येच गुजराती झाडत हा काहीबाही बोलायला लागला.
"अबे नहीं उतरुंगा, जो उखाडना है उखाड ले." मी पार वैतागून गेलो.
"समझ नही आ रहा साले.." त्याने माझ्या पायाला धरून मला जणू काही खाली फेकूनंच दिले. "હું પ્રેમ કાપીશ"
त्याने पिशव्याही खाली फेकल्या.
मी त्या उचलल्या आणि गप तिथून निघून जाऊन संडासाजवळच्या दरवाजापाशी बसलो. बेफाम वारा सुटला होता. मी दोन्ही दरवाजे उघडले. आणि बाहेरच्या ठार अंधाराकडे नजर लावून बसलो. हाडं गोडवणाऱ्या थंडीत थडथड उडत.

जरावेळाने बाथरूमसाठी कोणीतरी आले. मी मागे बघितले तर हा तोच धिप्पाड माणूस होता. माझी लाही लाही झाली.
"अबे, टिसी से बात कर, कोई सीट ले ले. आगे सब खाली पडा है. यहा यहा दरवाजेपे क्यो बैठा है?" तो म्हणाला.
मी मात्र एकटक त्याच्याकडे बघत राहिलो.
"घूर क्या रहा है बे. घर से भाग आया क्या?" तो आता माझ्याकडे येत चालला.
"और इस थैली मे क्या है?" तो पिशवी चापचत म्हणाला.
"मै दिखाता हू.." मी बॅगेत हात घालत त्याला म्हणालो. "तेरेको देखना है ना, ये देख"
'ढिचीक' आवाज झाला. अपेक्षेपेक्षा फारच कमी. पण गोळी त्याच्या छातीत घुसली होती. एक हात छातीवर ठेवून तोंड वाकडं तिकडं करत तो खाली कोसळला. "ઓહ ભગવાન"
मी पायाने लाथा घालत त्याला दरवाजातून बाहेर ढकलले. 'खुबडूक' असा आवाज आला नी माझा राग हळूहळू शांत होत गेला. थोडे रक्त सांडले होते. पाणी ओतून मी ते साफ केले.

पिस्तुल बॅगेत लपवले. आणि मी तीन चार डबे सोडून पुढे एका दरवाज्यापाशी बसलो. बराच वेळ. खूप वेळ. रेल्वेची चटक फटक मनमोहक करून जात होती. पुढे कुठल्यातरी स्टेशनला गाडी थांबली आणि मी खाली उतरलो.

शांत निवांत स्टेशन. कुठल्या आडगावात उतरलो काय माहीत. दोघे चौघे उतारू सोडल्यास तेथे कोणी नव्हते. भोंगा वाजवत रेल्वे निघून गेली. चाळवलेल्या झोपेकडे दुर्लक्ष करत स्टेशन पुन्हा झोपी गेले.

पायऱ्या उतरत असताना एक लाल चुटूक ओठांची, गोबऱ्या गालाची मुलगी आडवी आली. नुकतीच झोपेतून उठल्यासारखी.
"बोलो साब, कुछ मंगता है क्या?" पायात थोडे अंतर ठेवून टंच छाती पुढे करत ती म्हणाली.
"इधर लॉज किधर मिलेगा?" मी बाहेरचा अंदाज घेत बोललो. आता मला कुठेतरी शांत झोपायचे होते.
"लॉज बहोत दूर है यहासे. यहा बाजूमे मेरी खोली है वहा जाते है" तिने सांगितले. मला एकूण प्रकाराचा अंदाज आला आणि म्हणालो, "नही, मै ढूंढ लूंगा"

"अरे क्या हुआ साब, पूरा मजा देगी मै. चलो तो.."
"नही मुझे कोई इंटरेस्ट नही है.." मी पुढे चालत म्हणालो.
"खाली हजार रुपये की बात है. इतना सोच मत.." ती माझ्या पाठिच लागली.
"नही, सॉरी.." मी पटापट पुढे चाललो.
"अच्छा तेरे लिये आठसो. जन्नत दिखाऊंगी... चल ना.."
मग मी थांबलो.
"चल.." मी तिला कोपऱ्यात घेऊन गेलो.
एका हाताने तिचे केस धरले, आणि दुसऱ्या हाताने गळा दाबत म्हणालो, "मैने कहा नहीं. नही मतलब नहीं.."
गळ्यावरची पकड घट्ट करत तिला थोड्या वेळ तडफडू दिले. "घिन आती है मुझे ऐसी गंदगीसे. "

मग तिला अचानक सोडून दिले. जोरजोरात श्वास घेत खोकत ती तिथून पळाली. पुर्ण अंधारात गुडुप होईपर्यंत मी तिच्याकडे पाहत राहिलो.

मग पिशव्या उचलल्या आणि मैल दोन मैल चाललो. एक लॉज दिसला. तिथे काऊंटरवर झोपलेल्या म्हाताऱ्याला जागे केले.
"कब तक?"
"सुबह तक"
त्याने रजिस्टर पुढे केले. त्यात काहिच्या काही नावाने सही मारली. त्याने च्यावी दिली. मी वरती येउन दार उघडले. आणि बेडवर पाठ टेकवली. इतकी शांत आणि गाढ झोप मला यापूर्वी कधीच लागली नाही.

क्रमशः

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

एकदम वेगळेच वळण लागलंय कथेला, मस्त.

जेम्स वांड's picture

8 May 2020 - 7:52 am | जेम्स वांड

पांढरपेशा माणसाचे हे क्रिमिनल मेटामोरफॉसिस लैच झकास चितरताय राजे तुम्ही.

चांदणे संदीप's picture

8 May 2020 - 7:58 am | चांदणे संदीप

इतक्या लवकर सराईत आणि थंड डोक्याच्या गुन्हेगारासारखा वागेल असं वाटलं नव्हतं. पण ठीक आहे, घडामोडी वेगवान घडत असल्याकारणाने वाचायला मजा येत आहे. आता जगदीशला क्राईम जगताचा बादशाह होतानाच बघायचं आहे. ;)

सं - दी - प

सुचिता१'s picture

8 May 2020 - 10:06 am | सुचिता१

मध्यमवर्गीय, सामान्य माणूस इतक्या सहजतेने टोकाला जाईल हे पटत नाही. पण कथेचा वेग, तुमची शैली आणि विषय , मस्त. पुलेशु!!!

राजाभाउ's picture

8 May 2020 - 11:34 am | राजाभाउ

जानवर जाग गया ! मस्त चाललीय
पुभाप्र

अभिजीत अवलिया's picture

8 May 2020 - 11:50 am | अभिजीत अवलिया

कदाचित हा सामान्य माणूसच प्रत्यक्षात मोठा 'भाई' असावा. एक अंदाज.

अनिंद्य's picture

9 May 2020 - 9:54 am | अनिंद्य

... एक अंदाज.....

माझाही. नाहीतर एका पांढरपेशा तरुणाचे सराईत गुन्हेगारात इतके फास्ट पेस परिवर्तन जस्टीफाय होत नाही.

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 10:01 am | चांदणे संदीप

कदाचित त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असावी जी नंतर अचानक कुठल्यातरी धक्कादायक वळणावर समोर येईल.
आपला एक अंदाज. आणि जव्हेरभौच्या डोक्याला शॉट! ;)

सं - दी - प

नावातकायआहे's picture

8 May 2020 - 5:57 pm | नावातकायआहे

पु भा प्र

प्राची अश्विनी's picture

8 May 2020 - 6:34 pm | प्राची अश्विनी

पुभाप्र

जेम्स वांड's picture

9 May 2020 - 11:18 am | जेम्स वांड

गुन्हेगार होणं, ती वृत्ती असणं वगैरे खूप गुंतागुंतीचा अन क्लीष्ट शास्त्रीय विषय असावा ज्याचा संबंध मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानसिक स्वास्थ्य वगैरेंशी जवळून असावा, त्यामुळे सरसकट मध्यमवर्गीय माणूस इतका सहज गुन्हेगारी मार्गावर स्पायरल डाऊन होणार नाही वगैरे अंदाज तितकेसे मला तरी पटत नाही.