स्वप्नाला पडली भूल

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
10 May 2020 - 8:03 pm

स्वप्नाला पडली भूल
उन्हाची चूल.
दे चंद्रभाकरी
थकल्या जीवा.

रानीचा वणवा
ताटावर ओणवा….
एकलाच गातो जोगी
थकलेले गूढ मंत्र…
एकटाच चेतवी जाळ
थकल्या सांजवेळी

स्मरणाचे पाप
जाळीतो लावून आग..
स्मरणाचा कचरा होतो
आशेची होते राख.

गुंतून जीव जातो.
मरण भयातच रमतो.
कृष्ण तेथे येतो.
भुईकडे नाळ मागतो.

जाळून इतिहास कंदीलात
आज मी स्वर्ग पाहिला.
काचेवर काजळीने
प्राक्तन उमटवून गेला

वाटसरू कोण येवून गेला.
वाटेला फुटले काटे
मोहरली वाटे काया
डोळ्यात काजळमाया.
…………….. चकोर शाह.

कथा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

10 May 2020 - 11:41 pm | गणेशा

छान आहे कविता

कौस्तुभ भोसले's picture

11 May 2020 - 12:23 am | कौस्तुभ भोसले

फारच छान

प्राची अश्विनी's picture

11 May 2020 - 8:15 am | प्राची अश्विनी

सुंदर.

मन्या ऽ's picture

11 May 2020 - 8:23 am | मन्या ऽ

वाह!

प्रचेतस's picture

11 May 2020 - 8:24 am | प्रचेतस

मस्त

विजुभाऊ's picture

11 May 2020 - 7:53 pm | विजुभाऊ

_/\_