शेवटची चूक.
शेवटची चूक.
शेवटची चूक.
"एका टीमच्या बॅट्समन चा उडालेला कॅच दुसर्या टीमचा फिल्डर पकडायचा. अशा वेळेस औट द्यायचा की नाही हेच समजत नाही.
गावसकरच काय पण टोनी ग्रेक आणि सोबर्स ही असल्या मॅच खेळले नसतील.
इतक्या सगळ्या नियमात बसवून क्रिकेटच्या मॅचेस घ्यायच्या शाळेला अवघड वाटणार नाही तर काय !
येन रुम नपाम्रधु थेये. येन रुक नपाद्यम थेये..
मराठी वाक्य उलटीकडुन वाचत त्याने संस्कृत म्हणून लिहीले होते. अभ्यंकर बाई शब्दार्थ शोधत होत्या.
मागील दुवा http://misalpav.com/node/47052
मेकॅनिकल घड्याळ म्हणजे मोठा कुतूहलाचा विषय.
माझ्या बालजिज्ञासेत भर पडली ती वडिलांना घड्याळाची सर्जरी करताना पाहून. सर्जरीच म्हणावी लागेल त्याला.
डोक शांत ठेवून आयग्लास मधून एकटक पाहत धारदार चिमट्याने घड्याळातील स्प्रिंगच्या डबीतून स्प्रिंग जराही न वाकवता अलगद वेगळी करणे आणि दुरुस्त करून परत जशीच्या तशी ठेवणे ज्याला जमले त्याला कदाचित एखादी मेंदूची शस्त्रक्रियाही लीलया जमून जाईल.
नमस्कार.
कित्येक वेळा छोट्या छोट्या घटना, गोष्टी आपल्याला आपल्या पूर्वायुष्यात नेतात. ह्या घटना एखाद्या दिव्याच्या बटनाप्रमाणे असतात, बटन दाबले की लख्ख प्रकाश पसरतो तसे आपल्याला काहीतरी अचानक आठवते. जीजी म्हणजे माझी आजी, तिच्या विषयीची खालील आठवण ही अशीच एका रेडिओ प्रोग्रॅमवरून जागृत झाली.
जीजी
घरी संस्कृत गोष्टींचे पुस्तक नव्हतेच. आज्जीची पुस्तके होती पण ती देवाची होती. त्यात गोष्टी नव्हत्या. हरिविजय , गोपिकाष्टकम , महाभारत रामकथासार अशी होती. आणि आज्जीला त्या गोष्टी माहीत होत्या आई ती पुस्तके वाचायची पण तीला त्यातील गोष्टी माहीत नव्हत्या. नाही म्हणायला संगीत मंदारमाला नावाचे एक नाटकाचे पुस्तक होते पण ते मराठीत . संस्कृत नाही. कुठेतरी सापडायलाच हवी संस्कृत गोष्ट.
मागील दुवा http://misalpav.com/node/47035
***
अनेक व्यक्तीगत कारणांमुळे पूर्ण करायची राहून गेलेली ही मालिका सर्व वाचकांची माफी मागून पुन्हा सुरु करीत आहे. सर्व रसिक वाचक मोठ्या मनाने मालिकेला पुन्हा प्रतिसाद देतील अशी आशा आहे. या भागात फक्त भाग सोळा आणि पंधराची लिंक देते आहे. पंधराव्या भागात अनुक्रमणिका असल्याने मागचे भाग सहज उपलब्ध होतील. या काळात ही मालिका पूर्ण करावी म्हणून प्रोत्साहन देणार्या सर्व मिपाकरांचे अनेक आभार. :)
***
राजयोग - १७
जाधव मामा म्हणजे एकदम आयडीयाबाज. आरसे पण असे बसवलेत की खुर्चीत बसलेल्या माणसाच्या समोर आणि मागेही आरसा लावलाय. समोरच्या आरशात मागचा आरसा दिसतो. बसलेल्या माणसाला पुर्वी त्याच्या डोक्याची मागची बा़जू दाखवायला हातात वेगळा आरसा धरून दाखवायला लागायचे. आता त्याला समोरच्या आरशात मागचा आरसा दिसातो. जाधव मामांनी मागच्या " दाढी कटींग चे पैसे रोख द्यावेत असे उल्ट्या अक्षरात लिहून घेतले आहे. . खुर्चीत बसलेल्या माणसाला ते सुलटे दिसते
मागील दुवा http://misalpav.com/node/47027
छाती भरून आली . आपण खरेच शिवाजी महाराजांचे कोणीतरी सैनीक आहोत असे वाटत होते. त्याच धुंदीत घरी आलो.
रात्री मामा ,आईला सांगत होता. विन्याला या दिवाळीत किल्ला करता येणार नाही म्हणाला म्हणून मुद्दाम हा किल्ला दाखवला. गण्या एल्प्या टंप्या मी आमच्या मनातली दिवाळी कधीच संपणार नव्हती.
कोण काय म्हणेल त्याला म्हणु देत म्हणत. आपल्या मनातल्या मनात हसण्याने ही ती शांतता मोडायची. ही शांतता डबीत साठवून ठेवता यायला हवी. आपल्याला हवी तेंव्हा बाहेर काढून अत्तरासारखी श्वासात घेता यायला हवी. खूप वेळ गेला सगळे गप्पच होते. कोणालाच ही शांतता मोडावेसे वाटत नव्हते. दरीतून येणार्या वार्यामुळे आमच्या चेहेर्यावर आलेला घामही थंडगार झाला. झेंड्याच्या दगडी बुरुजावरून खाली दरीच्या उतारावर पुढे समोर दरीच्या मधोमध दिसणार जयगड तानुमामाने दाखवला . आम्ही सगळे जयगडच्या दिशेने आपापली पायवाट घेत निघालो.