तपश्चर्या
इथे कोणी गिरिजा राजवाडे रहायच्या का?
असे विचारणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे दीपाने वळून पाहिले. गाडी स्टँडवर लावत ती मागे आली. काय काम आहे त्यांच्याकडे? असे तिने जरा रागातच विचारले.
त्या कुठे आहेत, मला त्यांना पहायचंय एकदा, अजीजीने ते उत्तरले. हे असलं विचित्र उत्तर ऎकून दीपा आत गेली, आणि ८० वर्षाच्या सासूबाईंना घेऊन बाहेर आली.
ओळख पटली नि गिरिजाबाईंना हे घर ना सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा आनंद झाला.