तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं.
लहानपणी पुस्तकात राजाराणीची गोष्ट असायची. राजकुमार पांढर्या शुभ्र होड्यावरून दौडत कुठेतरी जंगलात निघायचा. तेथे तो रस्ता चुकायचा.
कोण्या जादुगाराने त्याच्या राज्यात जायचा रस्ताच पुसून टाकलेला असायचा. राजकुमार घरी जायचा रस्ता शोधत बसायचा. आणि इकडे घरी त्याची राजकुमारी वाट पहात असायची. कोणीतरी त्याचा परतीचा रस्ताच पुसून टाकला असेल हे तीच्या ध्यानीमनीही यायचे नाही. तीला वाटायचे की राजकुमार हे मुद्दाम करतोय. तीची थट्टा करण्यासाठी. ती रुसून बसायची .राजकुमार बिचारा कसाबसा नवा रस्ता शोधत घरी यायचा.