ती जागा (भाग -१)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
2 Jan 2021 - 6:23 pm

लग्नानंतरच्या गोडगुलाबी दिवसांची मजा घेऊन रमा आणि श्री आपल्या कामाच्या शहरात पोहचले.आटोपशीर संसार म्हणून लहानच जुनी जागा त्यांनी भाड्याने घेतली .जागा अंधारी आणि बंदिस्त होती रमाला फारशी रुचली नाही ..पण संसारात नवरा-बायको एकमेकांसोबत असले तर बंदिस्त जागाही नंदनवन होत असते.
तिथे राहायला येऊन दोनच दिवस झाले होते.रमाला स्वयंपाक घरात ओट्यासमोर उभी असतांना पाठीमागे तिच्या केसांना कोणीतरी फुंकरीने उडवल्यासारख वाटलं “काय रे श्री ,बस कर की चेष्टा ..”लाडात रमा बोलली. पुन्हा तोच प्रकार घडला..रमा मागे वळून पाहायला लागली तर कोणीच नाही.”श्री ?” ..तो बाहेर मित्रांशी गप्पा मारत उभा होता. “काय “त्याचा प्रश्नार्थक चेहरा .नकाराने मान हलवत ती पुन्हा आत आली.
श्री लवकर कामाला गेला.सगळ आटोपुन रमा आंघोळीला गेली.पाणी चालूच होती ...बाथरूमचा बल्ब लावला ..जरा खाली वाकली तोच बल्ब आपोआप विझला तिला वाटलं लाईट गेले असेल..हळूच दार उघडून बाहेर पाहील ..अरेच्चा लाईट तर आहे.बटन २-३ वेळा चालू बंद केलं.तेव्हा बल्ब पुन्हा चालू झाला .पुन्हा पाठमोरी झाली तर तोच प्रकार बल्ब पुन्हा विझला.आता मात्र रमा घाबरली ..तिने दार उघड ठेवतच आंघोळ आटोपली.
त्या दिवशी अमावास्या होती...श्रीच्या मिठीत रमा गाठ झोपली होती. ‘’रमा..”तिला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला.पांघरूण बाजूला करत रमा स्वयंपाक घरात गेली.घरातली शेगडी चालूच होती.रमाला दरदरून घाम फुटला .... “पळत जाऊन तिने श्रीला उठवले.ओढतच जळती शेगडी दाखवायला आणले...तर शेगडी बंदच होती.श्रीने नॉब बंदच आहे ते दाखविले.”वेडी चाल झोप” श्री म्हणाला.
रमाला कालच्या घटनेने खूपच अस्वस्थ वाटलं.आईला फोन केला प्रसंग सांगितला..आई म्हणाली “एव्हढी शिकलेली तू...काहींही योगायोग जोडतेस..एक काम कर तुझा बागकामाचा छंद पुन्हा सुरु कर.”रमाला पटल तिने कुंड्या आणल्या मोगरा ,झेंडू ,गुलाब,तुळस छान रोपं लावली तिला मस्त टवटवीत वाटू लागलं.रमा रोज झाडांना पाणी घालायची .फुलं छान येऊ लागली.पण तुळस...ती मात्र हळूहळू सुकत चालली होती.पान गळू लागली होती.त्याला खत टाका,निगा राखा पण ती कोमेजुनच चालली होती..रमाच मन तिला खाऊ लागल ..एक तुळस आपल्याला जपता येऊ नये...
रमाच्या पोटात एक नवा जीव आकार घेत होता.रमा आणि श्री खूपच खुश होते.रमा भांडे घेऊन पायऱ्या उतरत होती.अगदी कोरडी स्वच्छ पायऱ्या होत्या.पण रमाला कोणीतरी जणू ढकलले अशा पद्धतीने ती जोरात पोटावर पडली.रमाला चांगलाच ताप आला.तपासण्या केल्या सर्व ठीक होते.बाळाला काही झाले नव्हते.रमा स्वत:ला जपू लागली.
रमा बाथरूममध्ये गेली.पुन्हा तसेच घडल ..कोणीतरी तिला धक्का दिला.रमा जोरात पडली.पण यावेळी मात्र सगळीकडे लाल लाल रक्ताचे थारोळे झाले होत्ते....रमा समजून गेली अघटीत घडल आहे.तिला ताबोडतोब दवाखान्यात नेण्यात आलं ..पण यावेळी तिने आपल्या बाळाला खरोखरी गमावलं होत.रडून रडून रमाचे डोळे सुकून गेले होते.
क्रमशः
-भक्ती

कथा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Jan 2021 - 6:34 am | प्रचेतस

उत्तम सुरुवात

Bhakti's picture

3 Jan 2021 - 10:16 am | Bhakti

धन्यवाद!