https://misalpav.com/node/48045(भाग -१)
मग काही दिवस माहेरी राहून रमा पुन्हा त्याच घरी आली.आजूबाजूच्या बायका भेटायला आल्या.त्यातला एक म्हणाल्या “ही जागा भाड्याने गेली तेव्हाच आम्हांला आश्चर्य वाटलं...”
“का?” रमाने प्रतीप्रश्न केला.
“अग इथे एक जोडप राहायचं तुमच्यासारखच ..चांगल चालल होत. पण एके दिवशी त्या बाईचा पदर चालत्या शेगडीने पेटला साडी ही भरभर पेटली ..ही बाथरुममध्ये धावली ..पण पाणीच नव्हत टाकीत..सैरावैरा धावत आली बाहेर...सगळ्यांनी वाचवायचं प्रयत्न केला पण नाही वाचली ती...बिचारी २ महिन्यांची गर्भवती होती.”
रमाला हे सगळ ऐकून पायाखालची जमीन सरकली असे वाटलं.श्रीच्या मागे तगादा लावत तिनेव जागा लवकर सोडायला सांगितले.
श्री नवीन जागा पाहत होता.पण तो पर्यंत रमा जीव मुठीत ठेवूनच होती.दोन दिवस हवापालट म्हणून दोघे फिरायला गेले.
परत आले तर स्वयंपाक घरात कोपऱ्यात तीन मांजरीचे २-३ दिवसांची पिल्ले होती.रमाची कळी त्या गोंडस पिल्लांना पाहून खुलली.जातांना खिडकी बंद करायचे ते विसरले होते...तेव्हा एक मांजरीन या शांत मांस नसलेल्या जागी व्याली होती.ती नंतर हे दोघे आल्याने परत काही फिरकली नाही. त्यामुळे बिचारी पिल्ले भुकेने व्याकुळ झाली होती.तिने कापसाच्या बोळ्याने त्या पिल्लांना दुध पाजले.हळू हळू पिल्ले बाळास धरू लागली होती.रमा खुश होती.त्या दिवशी रमा पहाटे लवकर उठली.पिल्लांची म्योऊ म्योऊ नाही..तिने पाहील तर रमा चक्कर येऊन खाली कोसळली...पिल्ल मारून पडली होती.रमा शुद्धीत आली “श्री तिने तिने ..त्या चेटकीणीने मारलं त्या पिल्लांना...आणि ..आणि ..आपल्या बाळालापण रे...”ती धाय मोकलून रडत होती.जागा बदलू पर्यंत रमाला त्याने माहेरी पाठवले.
त्या दिवशी अमावस्येचा काळोख किरर्र पसरला होता...रात्रीचे दोन वाजले..रमा ताडकन झोपेतून उठली ..मोठ्या मोठ्याने किंचाळू लागलि ...असंबंध बडबडून हातवारे करू लागली...आई घाबरली “रमा रमा शुद्धीत ये ..”रमाच तसं वागण चालूच होती.तिचा चेहरा ,डोळे लालबुंद झाले होते.शरीर थरथर कापत होते.बडबड करून रमा धाडकन जमिनीवार कोसळली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती आईला शोधत अंगणात आली...आई कडूलिंबाच झाड पाहत होती.रात्री घडलेला प्रसंग तिने रमाला सांगितला..रमाला यातलं काहीच आठवत नव्हत.... आणि झाडाकडे बोट दाखविले.. हिरवेगार झाड एका रात्री अख्ख उभच्या उभ जळाल होत. “रमा तुझ्यावरच संकट आजीने लावलेल्या झाडाने स्वत:वर घेतलंय..आता मी तुला नाही जाऊ देणार तुला तिथे.” आई म्हणाली.
श्री आणि रमा नवीन जागेत रहायला गेले..जुन्या जागेच्या विरुद्ध सुंदर मोकळे ,भरपूर सूर्यप्रकाशाने भरलेले.काही दिवसांत रमाची कूस पुन्हा भरली होती...९ महिन्यात तिने गोंडस मुलाला जन्म दिला होता...आणि तिच्या कुंडीतली तुळस आता पूर्ण हिरवाईने बहारदार नटली होती...
..त्या जुन्या जागेत पुन्हा एक जोडप राहायला आलं होत...मेघना आणि सुजय ...
“सुजय लाईट गेले का रे ?”मेघना बाथरुममधून सुजायला विचारत होती...
समाप्त
-भक्ती
प्रतिक्रिया
5 Jan 2021 - 4:15 pm | ज्योति अळवणी
आवडली
6 Jan 2021 - 2:27 pm | Bhakti
धन्यवाद
5 Jan 2021 - 4:24 pm | प्रचेतस
शब्दयोजना अजून चांगली हवी होती.
6 Jan 2021 - 2:30 pm | Bhakti
हो अगदी....यावर काम चालू आहे.नक्की प्रयत्न करीत राहते.
8 Jan 2021 - 12:22 pm | टर्मीनेटर
कथा आवडली 👍
8 Jan 2021 - 8:42 pm | Bhakti
धन्यवाद!