मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !
तर्हेतर्हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते.
मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते.
भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे.
तर असे सांगितले जाते की
या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला.
हे कितपत सत्य आहे ?
विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले.
तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ?
पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ?