“आबा, अत्ता गणपतीच्या जवळ का जायचं नाही?”
“अत्ताच त्याला आणलंय ना घरी, जरा बसू दे त्याला!”
“मग उद्या सकाळी उठल्या उठल्या जायचं ना गं आजी?”
“अंघोळ करून मग ! गुरुजी येतील, ते पूजा करतील आणि मग आपण जायचं.”
“पण गुरुजी आपल्या आधी त्याच्याजवळ का जाणार आहेत?”
“अगं, गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायला म्हणून.”
“प्राणप्रतिष्ठा म्हणजे?” हे कुतुहल ओठांशी यायच्या आतच आम्ही झोपायचो.
उद्याची वाट बघत. त्या दिवशीची झोप अर्धवट असायची आणि झोपेत पडलेली स्वप्नही! बाहेरच्या खोलीतले दिवे अजूनही मालवलेले नाहीत, दबलेल्या आवाजात तिथून हसण्याचे, गप्पांचे आवाज कानावर येत आहेत.