कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा
कार्तिकस्वामी ची अनेक नावे आहेत - सुब्रह्मण्य, स्कंद, कुमार, गुहा, षडानन वगैरे. त्याची ज्या रुपात जास्त भक्ती होते ते म्हणजे "कुमार" रूप.
आदी शंकराचार्यरचित सुब्रह्मण्य भुजंगाष्टकातही खालील श्लोक येतो -
इहायाहि वत्सेति हस्तान्प्रसार्या-
ह्वयत्यादराच्छङ्करे मातुरङ्कात् |
समुत्पत्य तातं श्रयन्तं कुमारं
हराश्लिष्टगात्रं भजे बालमूर्तिम् || १८||