तर्हेतर्हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते.
मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते.
भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे.
तर असे सांगितले जाते की
या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला.
हे कितपत सत्य आहे ?
विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले.
तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ?
पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ?
विदेशी आक्रमक जे इथल्या जनतेवर जिझिया कर लादत असत. त्यांना समतावादी कसे म्हणायचे.
ज्यांच्यापर्यंत तलवार पोचली नाही त्यांच्या पर्यंत जिझिया कर पोचला. त्या जिझिया कराला कंटाळून देखील धर्मांतरे झाली.
आज भारतात मोठ्या लोकसंख्येने सौदीतील धर्म स्वीकारला आहे.
त्यांचे रहेन सहेन, हुलिया थेट अरबांसारखा आहे. पण एवढे करून अरब लोक इथल्या अनुयायांना समतेची वागणूक देतात का ? आपले म्हणतात का ?
सौदीतील मुलीशी भारतीय अनुयायांना विवाह करायला बंदी आहे. केल्यास देहदंडाची शिक्षा केली जाते.
धर्मांतरे सक्तीने, स्वखुशीने की फसवून
मूळामधे जे विदेशी मोहम्मद बिन कासिम, अल्लाउद्दीन खिलजी, महम्मद गझनी हे भारतावर आक्रमण करीत.
जो जो प्रदेश बळकावीत. तिथली संपत्ती, पशुधन आणि स्त्रिया लुटत.
पुरुषांना गुलाम बनवीत. स्त्रियांना जनानखान्यात ढकलीत.
अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर आलेला मलिक काफूर यासारखे लोक सुंदर स्त्रियांची लूट तर करीतच
पण कोवळ्या पोरांनाही सोडीत नसत.
इतर धर्मीयांचा एवढा तिरस्कार करणारे लोक स्वधर्मीयांवर मात्र प्रेमाचा वर्षाव करीत असतील. हे शक्य वाटते का ?
उदा :
शहाजहान निधन पावल्यावर औरंगझेबाने आपल्या भावांची हत्या केली
आणि एक महत्कार्य सर्वप्रथम केले ते म्हणजे आपल्या भावांचे जनानखाने स्वतःच्या जनानखान्याला जोडून घेतले.
त्याचे भाऊ त्याच्याच धर्माचे होते ना !
तर प्रश्न असा की
धर्मांतरे झाली ती समतेच्या अपेक्षेने झाली का ? तसे असल्यास ती अपेक्षा पूरी झाली का ?
पोर्तुगीझांनी केलेल्या धर्मांतराबद्दलही हेच प्रश्न पडतात.
तळटीपः- अल्लाउद्दीन खिलजी, महंमद घोरी यांच्याबद्दल काहीबाही लिहिल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील
तर त्या भारतीयांनी स्वतःवर इलाज करुन घेण्याची आवश्यकता आहे. आमचा मात्र नाइलाज आहे.
प्रतिक्रिया
31 Mar 2013 - 7:09 pm | वामन देशमुख
हिंदुंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
13 Feb 2015 - 1:43 am | आशु जोग
हो ना इतरांना दोष द्यायला हिम्मत लागते.
स्वतःच स्वतःला दोष दिला की मनाचे औदार्य मिरवता येतं... अशी लोकं समाजाच्या एका विशिष्ट वर्गातली असतात असं आमचा मानसशास्त्राचा अभ्यास सांगतो.
13 Feb 2015 - 1:46 am | सिद्धार्थ ४
आज लैच टैम हाये जणू? खूपच उकरून उकरून काढताया :)
13 Feb 2015 - 2:10 am | आशु जोग
मुद्याबद्दलही बोला
31 Mar 2013 - 7:15 pm | श्री गावसेना प्रमुख
अगोदर पासुनच हिरव्या आक्रमकांनी पहील्याला मारुन सत्ता काबीज केलीय्,आता सुद्धा हिरव्या प्रदेशात काय बदल घडतोय,पाकिस्थानात आतापर्यंत काय झालय.हे कितीही प्रगत झाले तरी एकमेकांना मारणारच व मग सत्ताधीश होनार,
ह्यांचे संस्कारच? तोकडे पडताय,त्यांना कितीही लग्न करण्याची परवानगी आहे,मग ज्या स्त्रीला ती हयात असतांना तिचा नवरा दुसरी करुन आणतांना जे दुख झालेय त्यापासुन ती शहाणी होते का?उलट ती तिच्या मुलाला अशा गोष्टींसाठी प्रोत्साहन देत नसेल कशावरुन,
त्यांनी फक्त आरोळ्या ठोकायच्या खतरेमे म्हणुन्,आपण एक व्हायच सोडुन वांझोट्या चर्चा झोडणार.
31 Mar 2013 - 7:17 pm | चिंतामणी
मोठा विषय आहे. लिहीणे अवघड आहे.
मी सुद्धा तज्ञांची वाट पहातो.
31 Mar 2013 - 7:23 pm | पाषाणभेद
प्रश्न पडतात ते ठिक आहे, त्यासाठी उत्तराची अपेक्षाही ठिकच आहे. पण धाग्याचे शिर्षक बदलावे ही संपादकांना विनंती.
होते काय की प्रश्न विचारणारा प्रश्न विचारतो पण तो खरोखर तितक्या तातडीचा, निकडीचा असतो हा ज्याचा त्याचा समज आहे. असल्या विचारण्याजाणार्या प्रश्नाच्या शिर्षकाबाबत धागालेखकाने जरूर विचार करावा व थेट अर्थबोध होईल असेच शिर्षक धाग्याला द्यावे.
हे याच धाग्याला नाही तर येणार्या असल्या प्रश्नांच्या धाग्याला लागू असावे. वैयक्तिक घेवू नये.
31 Mar 2013 - 7:27 pm | देशपांडे विनायक
Putin's speech on Feb. 04, 2013
Now he is a favourite
On February 4th, 2013, Vladimir Putin, the Russian president, addressed the Duma, (Russian Parliament), and gave a speech about the tensions with minorities in Russia:
"In Russia live Russians. Any minority, from anywhere, if it wants to live
in Russia, to work and eat in Russia, should speak Russian, and should respect
the Russian laws. If they prefer Shari'ya Law, then we advise them to go to those
places where that's the state law. Russia does not need minorities. Minorities need
Russia, and we will not grant them special privileges, or try to change our laws to
fit their desires, no matter how loud they yell 'discrimination'. We better learn from the suicides of America, England, Holland andFrance, if we are to survive as a nation. The Russian customs and traditions are not compatible with the lack of
culture or the primitive ways of most minorities. When this honorable legislative
body thinks of creating new laws, it should have in mind the national interest
first, observing that the minorities are not Russians.”
The politicians in the Duma gave Putin a standing ovation for five minutes! I know I, and most of us, would stand and applaud for a lot longer than that should our Prime Minister address our people this way
IFONLY!!!!!! आजच आलेला हा EMAIL !!! असे घडले पाहिजे का नको ? हे विचार नवे प्रश्न निर्माण करेल का असलेले प्रश्न सोडवेल ?
31 Mar 2013 - 8:15 pm | प्रसाद गोडबोले
वरील स्पीच विषयीची एखादी "ऑथेन्टीक" लिन्क देता का प्लीज ?
31 Mar 2013 - 8:32 pm | विकास
Russian President Vladimir Putin Says No to Sharia-Fiction!
संपूर्ण माहिती तेथे वाचू शकता... येथे फक्त मुद्याची गोष्ट चोप्यपस्ते करतो:
We checked the Russian archives of the speeches by President Vladimir Putin and found that he made no such address to the Russian Parliament on February 4, 2013.
एकंदरीत पुटीन यांच्या म्हणण्याचा आधार घेणे विचित्र वाटले... पुटीनने अजून बरेच काही म्हणले आहे/केले आहे, त्याचा पण आदर्श ठेवायचा असेल तर बघायलाच नको...
त्या व्यतिरीक्त क्रेमलीनच्या अधिकृत संस्थळावरील पुटीन यांच्या भाषणातील खालील भाग पण वाचण्यासारखा आहे:
Vladimir Putin congratulated the Muslim community of the Russian Federation on the Uraza Bayram holiday, which marks the end of Ramadan.
I would like to highlight the significant contribution made by the fruitful and much needed work of Muslim organisations to the preservation and development of the rich ethnic and cultural traditions of the peoples of Russia and its centuries-old spiritual heritage.
1 Apr 2013 - 9:37 am | देशपांडे विनायक
मला आलेला मेल होता हा. या मेलमधील विचार मला आवडले
पुतीनने इतर काय लिहिले आहे ते मला माहीत नाही . त्यामुळे त्याचा आदर्श माझ्यापुढे नाही .
पुतीनच्या आधाराने काही सांगावे इतकी त्याची महती आहे का नाही हे मला माहित नाही
परंतु आपल्या त्वरित लिंक उपलब्ध करून देण्याने माझा फायदा झाला .
त्याबद्दल आभार
31 Mar 2013 - 9:24 pm | मंदार कात्रे
१००% सहमत
;)
31 Mar 2013 - 9:33 pm | नितिन थत्ते
मिपाचे सनातन प्रभात झाले वाट्टं
31 Mar 2013 - 9:48 pm | विकास
वरील शेरेबाजीशी असहतम आहे. मिपावर कुठल्याही विषयावर लिहीण्यास बंदी नाही - गांधीविरोधकांपासून ते हिंदूत्वविरोधकांपर्यंत, कुडमुडे ज्योतिषांपासून ते विज्ञानवाद्यांपर्यंत, सनातन्यांपासून ते नक्षलवाद...वगैरे वगैरे... हा चर्चा प्रस्ताव येथे राहू शकतो याचे उदाहरण आहे. त्यावरून सरसकट विधान करणे म्हणजे one point extrapolation करण्यातला प्रकार आहे. असो.
31 Mar 2013 - 9:44 pm | पिंपातला उंदीर
शहाजहान निधन पावल्यावर औरंगझेबाने आपल्या भावांची हत्या केली
आणि एक महत्कार्य सर्वप्रथम केले ते म्हणजे आपल्या भावांचे जनानखाने स्वतःच्या जनानखान्याला जोडून घेतले.
त्याचे भाऊ त्याच्याच धर्माचे होते ना !
च्यामारी मी उगीचच इतके दिवस राघोबदादा आणि नारायणराव पेशवे याना हिंदू समजत होतो : )
31 Mar 2013 - 10:05 pm | आशु जोग
अमोल उद्गिरकर
विषय काय आहे ते ध्यानात घ्या !
धर्मांतरे का झाली ? याबाबत माहिती हवी आहे.
1 Apr 2013 - 8:28 am | श्री गावसेना प्रमुख
सर्व जग इस्लाममय करण्यासाठीच किंवा इस्लाम च्या अधिपत्याखाली आणण्यासाठीच इतीहासकालीन धर्मांतरण मोठ्या प्रमाणावर झालेले असावे.जग जिंकायला निघाले अन इथेच दफन झाले,
31 Mar 2013 - 9:51 pm | अत्रुप्त आत्मा
@इतर धर्मीयांचा एवढा तिरस्कार करणारे लोक स्वधर्मीयांवर मात्र प्रेमाचा वर्षाव करीत असतील. हे शक्य वाटते का ?
उदा :
शहाजहान निधन पावल्यावर औरंगझेबाने आपल्या भावांची हत्या केली
आणि एक महत्कार्य सर्वप्रथम केले ते म्हणजे आपल्या भावांचे जनानखाने स्वतःच्या जनानखान्याला जोडून घेतले.
त्याचे भाऊ त्याच्याच धर्माचे होते ना !>>>> जसे बीज तसेच रोपटे असते...
31 Mar 2013 - 11:05 pm | प्रचेतस
लेख बराच अर्धवट आहे.
लेखात फक्त इस्लामचाच विचार केला आणि पोर्तुगीजांबद्दल तर फक्त एक ओळच.
इस्लामच्याही कित्येक शतके आधी इथे जैन आणि बौद्ध धर्मांतरे झाली होती. परधर्मसहिष्णुता खूपच होती.
चंद्रगुप्त मौर्य जैन धर्माचा अनुयायी, त्याचा पुत्र बिंदुसार कट्टर वैदिक धर्माचा पालनकर्ता तर त्याचा पुत्र अशोक याने कलिंगयुद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याचा जोरदार प्रसार केला. अशोकानंतर बौद्धांचा धर्मप्रसार करणे हाच धर्म बनला असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म अहिंसेच्या तत्वावर आधारीत असल्याने तलवारीच्या धाकावर धर्मप्रसार होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यातही जैन धर्म मुख्यतः उच्चवर्णियांपुरताच मर्यादित राहिला. त्यामानाने बौद्ध धर्म बराच फोफावला. इतका की इथे आलेले परकीय लोक उदा. ग्रीक मिनेंडर, कुषाणवंशीय कनिष्क तसेच ग्रीक/कुषाणांचे क्षत्रप असलेले मूळ रानटी टोळ्यांचे सिथियन शकसुद्धा बौद्ध धर्मानुयायी झाले.
अर्थात तत्कालिन राजांनी सुद्धा जैन आणि बौद्ध धर्मांना उदार राजाश्रय दिला. गुप्तकाळानंतर हळूहळू बौद्ध धर्माचा र्हास व्हायला सुरुवात झाली. जैन धर्म मात्र उच्च राजाश्रयामुळे जिवंतच होता. राष्ट्रकूट, शिलाहार राजांनी जैन मंदिरे बांधली तसेच जैन स्थानांना दाने दिली.
यानंतर मात्र परकीय आक्रमकांनी इस्लाम येथील जनतेवर लादण्यास सुरुवात केली. पण तरीही सुरुवातीच्या काळातील इस्लामी आक्रमकांचे धर्मप्रसार हे मुख्य लक्ष्य नसून इथे असलेल्या प्रचंड संपत्तीची लूट हे मुख्य आकर्षण होते. मोंगल किंवा बहमनी राजवटीने तलवारीच्या धारेखाली धर्मप्रसार हे लक्ष्य कधीच ठेवले नाही. कदाचित इथे असलेल्या हिंदूच्या प्रचंड संख्येमुळे होणारा भावी उठाव टाळणे हेही कारण असावे. इस्लामचा धर्मप्रसार मुख्यत: औरंगजेबाच्या काळात झाला. ह्याच काळात हिंदूंवर जिझिया लादला गेला जे मूळच्या इस्लामच्या तत्वांच्या विरूद्ध आहे (इस्लामनुसार जिझिया हा फक्त एकेश्वरी/ ग्रंथधारक धर्मांवरच लादता येतो उदा. ज्यू, खिश्चन)
बळजबरीने इस्लामप्रसार मुख्यतः कोकण किनार्यावर सिद्दीच्या अंमलाखाली झाला. इथे सामान्य जनतेचेही मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले गेले.
इस्लामच्या काळात सुलतानांनी हिंदू स्त्रियांची विवाह केल्याने त्यांची मुलेही पुढे गादीवर आलीच. निजामशहा, कुतुबशहापैकी काही शाहांच्या राण्या हिंदू होत्या.
क्रूरपणे धर्मप्रसार मात्र पोर्तुगीज राजवटीत झाला. याचे सविस्तर लेखन टीम गोवा यांच्या लेखमालेत याआधी आले आहेच.
ख्रिश्चन धर्मप्रसार मात्र बळजबरीने न होता मात्र मिशनर्यांकडून गोडीगुलाबीने झाला.
या सर्व धर्मप्रसारात तळागाळातली जनता मात्र सदैव पिचलेलीच राहात असे. तिला मात्र वर आणले ते डॉ. आंबेडकरांनी.
1 Apr 2013 - 7:47 am | पिवळा डांबिस
हे काही कळलं नाही....
ही दोन वाक्यं जरा परस्परविरोधी वाटली. नाही म्हणजे, पोर्तुगीज ख्रिश्चन धर्माचाच प्रसार करत होते ना?
जरा प्लीज स्पष्टीकरण कराल काय?
धन्यवाद.
1 Apr 2013 - 8:24 am | प्रचेतस
इंग्रजांकडून ख्रिश्चन धर्मप्रसार मात्र बळजबरीने न होता मात्र मिशनर्यांकडून गोडीगुलाबीने झाला. असे लिहायचे होते मात्र तो लिहिण्याचा ओघात तो महत्वाचा शब्दच नेमका राहून गेला.
बाकी इंग्रजांनी हिंदुस्थानात धर्मांतरासाठी इन्क्विझिशन्स राबवली असे माझ्या माहितीत तरी नाही. काही अपवाद असतीलही.
1 Apr 2013 - 8:34 am | पिवळा डांबिस
नाऊ इट मेक्स सेन्स....
इंग्रजांनी १८५७ च्या बंडानंतर (काडतुसांना गाईची/ डुकराची चरबी इत्यादि) धडा घेतला आणि फोर्सफुल धर्मांतरांचा मार्ग सोडून छुप्या धर्मांतरांचा आसरा घेतला...
वुई आर ओके!!
:)
1 Apr 2013 - 9:15 am | पिवळा डांबिस
मला १८५७ म्हणायचं होतं....
स्वसंपादनाची चांगली असलेली सोय काढून घेणार्या आणि वरती उर्ध्वश्रेणीकरण केलंय म्हणुन टिमकी गाजवणार्या या मिपाच्या बैलाला घो!!!!!
नीलकान्ता, प्लीज टेक धिस अॅज अ कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक!!!!!
:(
1 Apr 2013 - 9:37 am | पिवळा डांबिस
प्रतिसाद अपडेट केल्याबद्दल ज्याने केलंय त्त्याला/ तिला धन्यवाद!!!
1 Apr 2013 - 12:25 pm | मन१
च्यामारी ह्या धाग्यावर काय किंवा टिपिकल दारुच्या द्विशतकी धाग्यातल्या चर्चेवर काय गप्प रहावं म्हटलं तरी राहवतच नै. असं कुणीतरी लिहून उचकवतच .
परधर्मसहिष्णुता खूपच होती.
वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै ठोकून काढलं पुष्यमित्र शुंगच्या मौर्योत्तर काळात; असे आरोप होतात. ते नाकारण्यातही येतीत. कुठलीही बाजू घेण्याइतका अभ्यास नाही; पण ऐकण्यात आहे; म्हणून बोललो. अधिक डिटेल कुणी देइल का.
कोसंबी वगैरेंची थिअरी वाचली तर नवाच चष्मा मिळतो.
.
पुत्र अशोक याने कलिंगयुद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला
एका जालविदुषींकडून ऐकल्याप्रमाणं कलिंगयुद्धापूर्वीच बौद्ध धर्म स्वीकारण्यात आलेला होता अशोकाकडून. कलिंग युद्धाचा संबंध त्याच्याशी निगडित एक पॉप्युलर गैरसमज्/मिथक आहे.
.
जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म अहिंसेच्या तत्वावर आधारीत असल्याने तलवारीच्या धाकावर धर्मप्रसार होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यातही जैन धर्म मुख्यतः उच्चवर्णियांपुरताच मर्यादित राहिला. त्यामानाने बौद्ध धर्म बराच फोफावला. इतका की इथे आलेले परकीय लोक उदा. ग्रीक मिनेंडर, कुषाणवंशीय कनिष्क तसेच ग्रीक/कुषाणांचे क्षत्रप असलेले मूळ रानटी टोळ्यांचे सिथियन शकसुद्धा बौद्ध धर्मानुयायी झाले.
कनिष्काच्या काळातली बौद्ध धर्माची व्हर्जन तर भन्नाट होती. बौद्ध धर्म स्वीकारूनही त्याच्या वागण्यात वगैरे अज्याबात सौम्यता वगैरे नव्हती.(त्याने पब्लिकचे जबरीने धर्मांतर केले असे म्हणत नाहिये मी. पण त्याची युद्धपिपासा अणि युद्धोत्तर शासने भयंकर कडक असत.)
जैन धर्म मात्र उच्च राजाश्रयामुळे जिवंतच होता.
i guess राजश्रयापेक्षा प्रशासकीय पब्लिकचं फॅन फोलोइंग आणी वैश्य लोक ह्यांच्या आर्थिक ताकदीमुळं तो टिकला असावा.(पाकमधले शिल्लक हिंदू कसे व्यापारी लेअरमधलेच उरले आहेत तसे.)
यानंतर मात्र परकीय आक्रमकांनी इस्लाम येथील जनतेवर लादण्यास सुरुवात केली.
ह्याबद्दल अधिक तपशील जमतील तेवढे पाच मोठ्या प्रतिसादांत http://www.misalpav.com/node/22502 ह्या जकुंच्या विजयनगरवाल्या धाग्यात मी टंकून ठेवलेत. इच्छुकांनी पहावेत असे सुचवतो. लागल्यास दुरुस्त्या सुचवाव्यात.
.
ह्याच काळात हिंदूंवर जिझिया लादला गेला जे मूळच्या इस्लामच्या तत्वांच्या विरूद्ध आहे (इस्लामनुसार जिझिया हा फक्त एकेश्वरी/ ग्रंथधारक धर्मांवरच लादता येतो उदा. ज्यू, खिश्चन)
हयाचा अर्थ "हिंदुवर/ मूर्तीपूजकांवर जिझिया लावला जाउ नये" असा होते हे खरे. पण पुढचा तपशील काय आहे?
"ज्यू आणी ख्रिश्चन हे पुस्तकधारी(people of books) हे जिझिया भरुन इस्लामिक राज्यात(दार उल इस्लाम मध्ये) जिवंत राहिले तर चालतील." जिथे इस्लामचे राज्य नाही ते दार उल हरब(गैरइस्लामी लोकांची भूमी, जिथे संघर्ष करावाव तिथे इस्लामप्रसार करावा. ("तलवारीच्या जोरावर प्रसार" हा क्लॉज लिखित नाही. त्यामुळे मवाळ मुस्लिम म्हणतात; मने वळवण्यासाठी प्रयत्न करावेत असा त्या वचनाचा अर्थ आहे. कट्टरपंथी म्हणतात; इतरांचे गळे चिरण्याची आम्हाला आज्ञा आहे.खरे खोटे अल्ला का देव जाणे .)) "पुस्तकधारींनी जिवंत राहिलेले चालेल" ह्याचा अर्थ "मूर्तीपूजकांना जिझिया घेउनही जिवंत सोडू नये" असा टोकाचाही कित्येक ठिकाणी घेतला जातो. त्यांच्या चष्म्यातून पाहिल्यास "औरंगजेबाने हिंदुंना जिझिया भरुन जगण्याची सवलत उदार मनाने देउ केली. हे(जगू देणे) इस्लाम मध्ये बसत नाही." असे त्यांचे म्हणणे.
.
निजामशहा, कुतुबशहापैकी काही शाहांच्या राण्या हिंदू होत्या.
खुद्द निजामशहा व इमादशहा हे लहानपणी मुंज झालेले बटू होते म्हणे. त्यांच्या पिढ्या पुढे धर्मांतरित झाल्या. त्यातील काहिंनी हिंदु स्त्रियांशी विवाह केला. (सारेच विवाह राजीखुशीने झाले असे नाही; सारेच बळजबरीने झाले असेही नाही.)
.
क्रूरपणे धर्मप्रसार मात्र पोर्तुगीज राजवटीत झाला. याचे सविस्तर लेखन टीम गोवा यांच्या लेखमालेत याआधी आले आहेच.
यप्स. त्याच धाग्यात अजून एक रोचक भाग मी टंकला आहे. पोर्तुगीजांनी इतर ख्रिश्चनांनाही जबरदस्तीने ख्रिश्चन केले; किंवा त्यांची हत्याकांडे केली. ते कसे? तर भारतात केरळ किनारपटीच्या आसपास कित्येक ठिकाणी सिरियन ख्रिश्चानिटी वगैरे गैर -युरोपिअन व्ह्र्जन मागील दोनेक हजारवर्षापासून सुखेनैव नांदत होत्या. त्यांना कसे इतर स्थानिकांनी (हिंदु,बौद्ध, जैन वगैरे) सतावले नाही. पण पोर्तुगिजांनी "तुमचा ख्रिश्चन धर्म खोटा आहे. आमचा खरा आहे" असे म्हणत त्यांच्या कत्तली केल्या!
.
ख्रिश्चन धर्मप्रसार मात्र बळजबरीने न होता मात्र मिशनर्यांकडून गोडीगुलाबीने झाला.
गोडीगुलाबीनेसुद्धा झाला. टिम गोवाच्या धाग्यांप्रमाणेही बळजबरीने झाला आहे.
.
असो.
बाकी धागा अपेक्षित वळणावर जाताना दिसत आहे.
1 Apr 2013 - 12:33 pm | नाना चेंगट
कोणताही विचार करतांना 'का' हा शब्द वापरला तर बरेच प्रश्न सुटतात असा माझा तरी अनुभव आहे.
>>>वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै ठोकून काढलं पुष्यमित्र शुंगच्या मौर्योत्तर काळात
हे वाक्य बोलून झालं की 'का' असं उच्चारून पहावं. शोध घ्यावा. उत्तर मिळालं तर मिळेल. तसेही सर्वच 'का' ची उत्तरे नसतात असे माझे तरी मत आहे. आता यावर 'का' असं विचारू नका ;)
असो.
1 Apr 2013 - 12:47 pm | मन१
तुमच्या "का?" ला आमचे उत्तर "वा".
थोडक्यात पण महत्वाचे. पटले.
1 Apr 2013 - 1:50 pm | पिशी अबोली
+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००
हे मात्र पटले नाही..उत्तरे मिळत नाहीत हे शक्य असेल.
कारणाशिवाय माणूस,समाज कुणीही काहीही करत नाहीत.. (माझ्यासाठी याला पुरावा- स्वतःचा आळशीपणा :D)
त्या टोळ्यांना, धर्मांना सुरस-रम्य कथा नव्हत्या तयार करायच्या. त्यांना आपलं स्वतःचं आयुष्य होतं जगायला. काहीतरी कारण होतं म्हणूनच या गोष्टी घडल्या असल्या पाहिजेत. त्या कारणाचा काही दुरुन-दुरुनही थांगपत्ता लागत नसेल, तर या गोष्टीला सत्य मानणं कठीणच.
1 Apr 2013 - 12:42 pm | बॅटमॅन
बुद्धाने नवा पंथ/धर्म काढल्यापासून तो भारतातून हद्दपार होईपर्यंत बौद्ध लोकांचा छळ करणारे किती राजे होते? बौद्धांचा छळ हा अपवाद होता की नेहमीची गोष्ट होती?
बाकी अहिंसा अन जैन-बौद्ध धर्मीय राजांचे आचरण यात विसंगती दिसली तर ते आश्चर्याचे कारण का व्हावे हे समजत नै.
शिवाय, कितीतरी मुस्लिम राजांनी लिहवलेली क्रॉनिकल्स, शिलालेख इ. मधून धर्माच्या नावावर केलेल्या कत्तलींचे समर्थन मिळते तसे ते अन्य कुठे मिळत नाही. अर्थात पोर्तुगीजांचा अपवाद.
विजयनगरच्या धाग्यावरचे प्रतिसाद मूळ अर्ग्युमेंटचा समाधानकारकपणे प्रतिवाद करू शकत नाही असे मला वाटतेय-पण अजून चर्चा झाल्यास आवडेल.
1 Apr 2013 - 1:07 pm | मन१
(कुणी मिपातज्ञ म्हणून नॉमिनेट करायच्या आत)ह्या विषयावर मी गप्प बसतो.
1 Apr 2013 - 1:13 pm | बॅटमॅन
लोक काही म्हणोत-आपल्याला असलेली माहिती अभिनिवेशरहित पद्धतीने मांडल्यास काही हरकत नसावी.
1 Apr 2013 - 1:45 pm | प्रचेतस
काही अपवाद असणारच ना. पण सरसकटीकरण नव्हतेच. ह्याच शुंगाला समांतर काळातल्या सातवाहनांनी, कलिंगाधिप खारवेलाने तसेच नंतरच्या वाकाटक राजवटीने बौद्धांना राजाश्रय दिलाच होता.
बाकी कोसंबी म्हणालास ते धर्मानंद का दामोदर?
दामोदर कोसंबींच्या विद्वत्तेविषयी आदर ठेऊनही त्यांचे बरेचसे लिखाण एकांगी आहे असे म्हणावेसे वाटते.
स्वतः अशोकानेच गिरनारच्या १३ व्या शिलालेखात कलिंगविजय आणि तदनंतरच्या बौद्ध धर्माविषयी लिहून ठेवले आहे. कदाचित आधी बौद्ध धर्माचा स्वीकार केलाही असावा पण खर्या अर्थाने त्याचे पालन कलिंगविजयानंतरच सुरु केले.
हा तो शिलालेखाचा काही भाग पहा.
The beloved of the gods, king Piyadasi, conquered the Kalingas eight years after his coronation. One hundred and fifty thousand were deported, one hundred thousand were killed and many more died from other causes. After the Kalingas had been conquered, the beloved of the gods came to feel a strong inclination towards the dhamma, a love for the dhamma and for instruction in dhamma. Now the beloved of the gods feels deep remorse for having conquered the Kalingas.
सहमत आहेच पण मुद्दा धर्मांतराविषयी आहे. सत्तेसाठी लढाया, कत्तली सरसकट चालूच होत्या की पण त्या धर्माधारे नव्हे.
पुढचा तपशील भीषण आहे. मूर्तीपूजक हे खिजगणितच नव्हते. धर्मांतर अथवा मृत्युदंड. अर्थात मूर्तीपूजकांना जिझिया देऊन राहण्याची सवलतत इस्लामचे तिसरे खलिफा उस्मान यांच्या कारकिर्दित सुरु झाली (पण ते सर्व अरबभूमीबाहेरच)
1 Apr 2013 - 5:34 pm | प्रसाद गोडबोले
जैनधर्माशी वैदिक धर्माचा संघर्ष झालाचे ऐकीवात नाही ...ह्या विषयी अधिक जाणुन घ्यायला आवडेल. मुखु संघर्श होता तो बौध्दांशी तोही बुध्दाच्या काळापासुन नव्हे तर अशोकाच्या काळापासुन ... आणि तोही तात्विक .
ह्यातील सातवाहनांबद्दल शंका आहे , ऐकीव माहीती नुसार सातवाहन कट्टर वैदीक होते .
बौध्द धर्माचे पालन करणे फार अवघड गोष्ट आहे राव ...बुध्दाच्या नेक्क्ष्ट जनरेशन मधेच मुर्तीपुजा सुरु झाली होती (हीनयान की महायान पंथात ?? )..... कनिष्क फार लांबची गोष्ट आहे
इस्लामचे तिसरे खलिफा उस्मान यांच्या कालखंड कोणता ?
अवांतर : माझा एक कट्टर कम्युनिस्ट मल्लु मित्र म्हणाला होता " अशोकाने बुध्द धर्माच्या प्रसारार्थ लोक पुर्वेला थायलंड , बर्मा , श्रीलंका वगैरे ठिकाणी पाठवण्या ऐवजी पश्चिमेला अरबस्तानाकडे पाठवली असती तर जग खुप सुंदर असतं आज !! "
1 Apr 2013 - 5:40 pm | बॅटमॅन
बौद्ध लोक अरबस्थानातही होते अत्यल्पसंख्य का होईना असे उल्लेख आहेत. बाकी मूर्तिपूजेला अरबी/फार्सीत बुतफरोशी असा शब्द आहे. मूर्ती/पुतळा म्हंजे बुत्, हा शब्द बुद्धावरून आला असे वाचले आहे.
बाकी अरेबियन द्वीपकल्प म्हंजे कडव्या एकेश्वरवाद्यांचे लै जुन्या काळापासूनचे आगार आहे. अरबच तेवढे लै उशिरापर्यंत मूर्तिपूजक राहिले होते-तेही यथावकाश एकेश्वरवादी झाले.
1 Apr 2013 - 5:43 pm | सूड
>>बौध्द धर्माचे पालन करणे फार अवघड गोष्ट आहे राव
आताच्या तथाकथित बौद्ध धर्माच्या अनुयायांकडे पाह्यलं की तसं वाटत नाही. ठराविक तारखांना जोरजोरात गाणी वाजवायची आणि समारंभ भाषणं आयोजित करायची यावर सगळं संपतं म्हणे?
1 Apr 2013 - 8:58 pm | प्रचेतस
माझ्या माहितीत तरी नाही कारण जैन लोक धर्मप्रसाराच्या बाबतीत आग्रही नव्हते. बौद्धाशी संघर्ष मुख्यतः गुप्तकाळातच सुरु झाला. वैदिक धर्माला जास्त ग्लोरीफाय केले गेले. बौद्ध धर्माच्या वाढत्या धर्मप्रसाराला आळा घालण्यासाठी राम, कृष्णांचे दैवतीकरण झाले ते याच काळात. पर्यायाने हिंदू धर्मातील कर्मकांडेही वाढत गेली. पुराणे, उपनिषदे याच काळात लिहिली गेली. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर परत वैदिक धर्माकडे वळू लागले व बौद्ध धर्माचा र्हास होत गेला.
सातवाहन कट्टर वैदिक धर्माभिमानी होतेच पण त्याच बरोबर बौद्ध भिक्खुसंघांना त्यांनी उदार राजाश्रय दिला. नाशिक लेणी, कान्हेरी लेणी, कार्ले लेणी इ. ठिकाणी त्यांचे दानाविषयीचे कित्येक शिलालेख आहेत.
राजाश्रयाचे कारण माझ्या मते बौद्ध श्रमणांच्या हातात असलेल्या व्यापार व्यवसायामुळे असावे. हे लोक पार चीन ते रूमशामपावेतो उत्तरपथ आणि दक्षिणपथावरून व्यापार करत. व्यापारामुळेच सातवाहन साम्राज्य समृद्ध होत गेले आणि या मार्गांवार स्वामित्वासाठीच सातवाहन आणि क्षत्रपांमध्ये युद्धे होऊ लागली.
नाही हो. कनिष्काच्या कालखंडातच महायान पंथ सुरु झाला. कनिष्काच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ४थ्या धम्म परिषदेत बौद्ध संघांना बुद्धाच्या मूर्ती बनवण्याची/कोरण्याची अनुमती देण्यात आली.
उस्मानच्या खिलाफतीचा कालखंड इ.स. ६४४ ते इ.स. ६५६
पहिले चारही खलिफा प्रेषितांचे सहकारी होते. उस्मानच्याच काळात खिलाफतीच्या फुटीची बीजे रोवली जाउन याची परीणती त्याच्या हत्येत झाली.
2 Apr 2013 - 11:37 pm | ५० फक्त
'कनिष्काच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ४थ्या धम्म परिषदेत ' - बाकी सोडा ओ, जेवाखायची काय वेवस्था होती या परिषदेत, म्हंजे पर प्लेट किती खर्च आला, काय काय होतं याचा काही तपशील मिळेल का. ?
3 Apr 2013 - 2:35 pm | बॅटमॅन
अहो राजाने स्पॉन्सर केलेली ती परिषद होती, सर्व खर्च राजालाच. भिख्खूंना काय त्याचे. मेनूबद्दल म्हणाल तर कांदालसूण न घातलेले अहिंसक आणि अनुत्तेजक चिकन-मटन त्यात होते असे परवाच भुवर्लोकात पु ना ओकांनी एक नाडीपट्टी वाचताना सांगितलेले मी सूक्ष्मात जाऊन ऐकल्यावर कळ्ळे.
1 Apr 2013 - 8:32 am | पिंपातला उंदीर
बळजबरीने अनेक धर्मांतर zआलिच मात्र अनेक धर्मांतर राजखुषीने पण झाळी. तत्कालिक धर्मव्यवस्थेने अनेक जातीना त्यांचा नैसर्गिक हक्क नाकारला होता. त्यामुळे त्यांच्यात त्या व्यवस्थेविरुद्ध असंतोष होता. बाबासाहेब आंबेडकर याना आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म का स्वीकारावा वाटला? धर्मांतर होण्याला अनेक बाह्य कारण असली तरी अंतर्गत कारण ही अनेक होती.
1 Apr 2013 - 10:36 am | ५० फक्त
चला निदान, आपलं निदान या निमित्तानं या विषयातले तज्ञ कोण हे तरी कळेल,
1 Apr 2013 - 2:26 pm | मालोजीराव
धर्मांतर के विशेषज्ञ !
1 Apr 2013 - 7:10 pm | विकास
मला वाटते धर्मांतर नाही विषयांतर तज. ;)
1 Apr 2013 - 11:00 am | चौकटराजा
१९२० च्या सुमारास अतिरेकी वगैरे होते काय जगात ? मग ते निर्माण कसे झाले ? त्यांची महत्वकांक्षा जागी झाली की त्या त्या वेळच्या सत्ताधार्यांची काही लोकाना दाबून ठेवण्याची हाव वाढीस लागली ? आपल्या धर्मात आपल्याला नीटसे स्थान नाही असे समजल्यावर आत राहून बंड करीत रहाणे किंवा त्या धर्मातून परागंदा होणे यापेक्षा काय पर्याय असतो सामान्याना ?
1 Apr 2013 - 11:23 am | चिरोटा
ना.स. इनामदारांचा शहेन्शहा वाचल्यावर तसे वाटले नाही. साधी रहाणी,कपटीपणा हे गुण त्याच्यात होते.राजे/शहेनशहांच्या 'त्या' सवयी त्याला नव्हत्या असे वाटते.
1 Apr 2013 - 1:20 pm | आशु जोग
ना सं इनामदार यांचे नाव घेतलेत. धन्य झालो आम्ही. अतिशय विद्वान मनुष्य.
मंत्रावेगळाची प्रस्तावना अफलातून आहे.
पण
ना सं ची लेखणी स्वयंपाकघर, अंत:पुर, पदराचे काठ यातच फार रमते असे वाटते.
1 Apr 2013 - 12:49 pm | मन१
ह्या धाग्यात येणार्यांनी http://www.misalpav.com/node/21659 हा धागा पाहिलाय का?
1 Apr 2013 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार
वरती प्रतिसाद देणार्या सर्वांना ह्यापुढे मिपातज्ञ म्हणून ओळखले जावे काय?
1 Apr 2013 - 12:56 pm | बॅटमॅन
विचारजंत या शब्दाचा ठसका/करंट/तर्रीजनित झटका मिपातज्ञ या बादशाहीछाप शब्दात नै :(
1 Apr 2013 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार
विचारजंत जळी-स्थळी काष्ठी-पाषाणी पडलेले असतात. पण मिपातज्ञांचे तसे नाही. ;)
1 Apr 2013 - 1:01 pm | बॅटमॅन
हा हा हा ओक्के ;)
1 Apr 2013 - 1:06 pm | नाना चेंगट
काय करत पडलेले असतात? उताणे असतात की ... कसे?
1 Apr 2013 - 2:30 pm | मालोजीराव
ह्या क्याटेगरी वर पण सविस्तर पणे लिहावे
1 Apr 2013 - 1:21 pm | आशु जोग
त्या तज्ञांमधे तुमचा नंबर पयला
असे सार्या तज्ञांचे मत आहे.
1 Apr 2013 - 1:31 pm | आशु जोग
बा द वे
छोटीशी शंका ...
विषमतेपोटी धर्मांतरे झाली हे जर खरे असेल तर बाहेरून आलेल्या विदेशी आक्रमकांच्या धर्मात
समता ठासून भरली होती का ?
"म्हणजे हिंदूंनो आमचा तुमच्यावर राग आहे पण एकदा तुम्ही आमच्या धर्मात आलात की आम्ही तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार आहोत "
असे काही या खिलजी, औरंगझेब, तुघलक, घोरी, गझनी(सोमनाथ फेम) इ. फॉरीनर्सचे म्हणणे होते का ?
1 Apr 2013 - 7:24 pm | कंजूस
वाईट वागणूकीला कंटाळून दुसऱ्याधर्मात गेल्यावर पहिल्या जाच करणाऱ्यांच्यातूनतरी सुटले ( उदा: केरळमध्ये ).
1 Apr 2013 - 7:31 pm | विकास
>> वाईट वागणूकीला कंटाळून दुसऱ्याधर्मात गेल्यावर पहिल्या जाच करणाऱ्यांच्यातूनतरी सुटले ( उदा: केरळमध्ये ).
मुद्दा जरी समजू शकत असलो तरी, केरळ मधे नक्की असे झाले आहे का? माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे तसे नव्हते म्हणून माहिती म्हणून विचारत आहे.
1 Apr 2013 - 7:29 pm | कंजूस
वाईट वागणूकीला कंटाळून दुसऱ्याधर्मात गेल्यावर पहिल्या जाच करणाऱ्यांच्यातूनतरी सुटले ( उदा: केरळमध्ये ).
1 Apr 2013 - 1:33 pm | सुहास..
मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे >>>
तज्ञांचे का ? मग सॉरी ;)
1 Apr 2013 - 5:14 pm | प्रसाद गोडबोले
सौदीतील मुलीशी भारतीय अनुयायांना विवाह करायला बंदी आहे. केल्यास देहदंडाची शिक्षा केली जाते.
>>>ह्या वाक्यावर जरा "इल्यॅबोरेट" करणार का ? भारतीय अनुयायी म्हणजे काय ?
1 Apr 2013 - 10:05 pm | निनाद मुक्काम प...
भारतीय अनुयायी
माझ्यामते सौदी येथील अरबांच्या धर्माचे अनुयायी जे भारतीय वंशांचे आहेत ,
1 Apr 2013 - 11:17 pm | गब्रिएल
फक्त मुलिनाच नाही तर कोणत्याही सौदि नाग्रिकाला (पुरुश, स्त्री दोन्ही) जिसिसि देश सोडून इतर देशाच्या नाग्रिकाशी खासतर भारत, पाकिस्तान बान्ग्लादेश च्या मुस्लीम नागरिकाशी लग्न करायला बन्दी आहे. याचे ओफिशियल कारण अरबी रेस व कल्चर खराब होते असे आहे.
25 Aug 2013 - 8:50 pm | आशु जोग
तर मग समानतेचा दावा कितपत खरा...
1 Apr 2013 - 6:35 pm | कंजूस
अगोदर बरेच चांगली मतं लिहिली आहेत .धर्मांतरे धाकाने ,नाईलाजाने अथवा सोईने झाली . प्रत्येक धर्माचा आचरणातला कुरघोडीपणा ,लवचिकपणा अथवा सौम्यपणा त्यातील लोकांनीच वाढवला .प्रत्येक धर्मात एक तरी अनाकलनीय आणि न पटणारी खोच आहेच पण त्यावर निपक्षपातीने विचार मांडलेले अजिबात खपत नाहीत .
6 Apr 2013 - 7:21 pm | आशु जोग
चर्चा खूप झाली, तज्ञांचे मारगदर्शनही झाले
पण
काही शंका राहील्याच
इथल्या हिंदू जनतेने सौदी धर्माचा स्वीकार केल्यानंतर
तिकडच्या धर्मात त्यांना समता पूरेपूर अनुभवायला मिळाली.
थोर प्रवचनकार हभप डॉ झाकीर देखील नेहमी सांगतात
त्यांच्या धर्मामधे विषमता नाही.
त्यामुळेच असेल बहुधा पाकिस्तानमधे लोक गुण्यागोविंदाने राहतात
13 Feb 2015 - 2:03 am | अर्धवटराव
__/\__ __/\__ __/\__
मधेच हा कोणता धागा उचकटला म्हणुन सहज चाळला... आणि वल्लीशेठचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचले. तुस्सी ग्रेट हो वल्लीभाय. लिहीता हो रे आणखी.