रॉकस्टार

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
11 Nov 2020 - 10:06 pm

मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.

संस्कृतीकलानाट्यसंगीतजीवनमानआस्वादविरंगुळा

शिकण्याचे मानसशास्त्र — वर्ड प्रॉब्लेमस्

राजा वळसंगकर's picture
राजा वळसंगकर in जनातलं, मनातलं
11 Nov 2020 - 8:18 pm

“The twin goal of mathematics education is the development of critical thinking and problem-solving skills and abilities.”

एका अभ्यासलेखामधे हे वाक्य वाचले आणि थबकलो. मार्कांच्या रस्त्यावर झापड लावून धावणाऱ्यांचा मागे कळपवृत्तीमुळे धावताना आपण काहीतरी विसरलो आहोत हे जाणवत होते, काहीतरी मागे ओढत होत आणि थांब, प्लीज थांब म्हणत होत... हाच का तो विचार ... ?

मागच्या अनेक FB पोस्ट मधून शिकण्याचे मानसशास्त्र आणि त्यातून डोकावणाऱ्या साहित्याच्या घटकांची "थिअरी" वर लिहिले, आता "प्रॅक्टिकल"! यासाठी वर्ड प्रॉब्लेम हा एक मोठा घटक आहे.

शिक्षणलेख

मी पाहिलेला एक चांगला मराठी चित्रपट

रोहित रामचंद्रय्या's picture
रोहित रामचंद्रय्या in जनातलं, मनातलं
11 Nov 2020 - 4:06 pm

नमस्कार मित्रानो.

डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा.

मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट.

हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो.

१. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे.

२. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला.

दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव.

धन्यवाद

चित्रपटअनुभव

स्मृतींची चाळता पाने --अनगाव

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
11 Nov 2020 - 1:43 pm

आधीचा भाग-- स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग

१९४५ हे वर्ष आमच्यासाठी फार वाईट गेले. मी १९४५ मध्ये माझे वडील अल्पशा आजाराने वारले. मी तेव्हा फक्त ६ वर्षांची होते.मला माझे वडील नीटसे आठवतही नाहीत.माझी मोठी बहीण विमल तेव्हा ९ वर्षांची होती तर आई सुशिलाबाई ३० वर्षांची. माझे धाकटे काका तेव्हा नुकतेच ६० रुपये पगारावर सचिवालयात नोकरीस लागले होते व त्यांचे लग्न झाले नव्हते.आम्ही सगळे एकत्रच राहत होतो.

जीवनमानप्रकटन

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसींगची खोड मोडली

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
10 Nov 2020 - 6:22 pm

(पार्श्वभूमी: मिपासदस्य अतृप्त आत्मा यांनी नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्यांना ऐकवावी असे वाटले. )

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली

खुंखार खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता.

कथाव्याकरणशिक्षणमौजमजाप्रकटनप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

बेडसे लेणी व पवना जलाशय परिसर २०१७

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
10 Nov 2020 - 3:02 pm

कार्ले, भाजे, बेडसे या लेण्यांच्या त्रिकुटापैकी बेडसे लेणी बघायची बाकी होती. ही लेणी बघूनच २०१७ च्या नववर्षाच्या भटकंतीची सुरुवात करायचे ठरविले. गुगलवर थोडासा शोध घेतला आणि दिवसभराचा कार्यक्रम निश्चित केला. बेडसे लेणी पुर्वाभिमुख आहेत त्यामुळे सकाळच्या वेळी लेण्यांत चांगला प्रकाश असतो व लेणी बघण्यास चांगले पडते असे वाचल्याने आधी लेणी पाहून नंतर वेळ मिळेल त्याप्रमाणे बाकीची भटकंती करण्याचे ठरवले.
दोन्ही मुली व आम्ही दोघे सकाळी नऊला नवी मुंबईहून निघालो. लोणावळ्यात एका ठिकाणी नाश्टा केला

मनाचिये गुंती

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
9 Nov 2020 - 6:27 pm

नमस्कार मागील काही महिन्यात जी उलथापालथ माझ्या जीवनात झाली,ती या चार छोट्या लेखात मांडली. त्यामालिकेतील हा शेवटचा भाग.
आपल्या प्रतिक्रिया वरून आपल्या ला हे लिखाण भावले आवडले असे दिसते.छान वाटले.धन्यवाद.हा भाग कसा वाटला कळवावे.

मनाचिये गुंती..

मुक्तकअनुभव