मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची. वेदना असलेल्या हृदयातून स्वर जास्त प्रभावीपणे झंकारली जाते असं म्हणतात. त्याचा कॅन्टीन वाला 'खटाना' पण हेच सांगायचा "टुटे हुए दिल से ही संगीत निकलता है" !
त्या वेड्याला पण ते पटलं आणि मग तो वेदना शोधायला निघाला, एका मुलीच्या प्रेमात पडला पण अगदी वरवरचं, त्यात कुठली वेदना असणार ? तिचं आधीच लग्न ठरलेलं त्यामुळे तिने नकार दिला तरी हा स्थिरबुद्धी वेदनाविहीन राहिलेला. तिच्या लग्नात काव्हा पिवून परत त्याच कॅन्टीनमध्ये "इत्तीसी चटनी में दो समोसे खाऊ मैं" म्हणत दुःख शोधत राहिला. तरीही काही केल्या कला मुर्त रूप घेत नव्हती. मग कुठल्याशा बालंटाने घरातून हाकलून लावला घरच्यांनी, डोक्याला छप्पर नाही म्हणून दर्ग्यात राहिला. पण वरवरचे प्रेम आता गंभीर झालं होतं, त्या विरहात जनार्दन पोळला जात असताना त्यातला कलाकार झळकायला लागला.
मला पुढच्या टप्प्यावर तो भेटला तेव्हा फार मोठा स्टार झाला होता तो,पब्लिक वेडं करणारा,नावंही बदललं होतं आता त्याने,जॉर्डन म्हणून चांगलाच प्रसिद्ध झाला होता तो. पण प्रसिद्धी बरोबर प्रेमभंगाची वेदना अधिक ठसठसू लागली होती. त्याच्या पुर्वाश्रमीच्या प्रियसीला कसल्याश्या जीवघेण्या व्याधीने ग्रासलं, ती तीळतीळ मरत असताना जॉर्डनचं आयुष्य वेदनामय होऊ लागलं आणि गायक म्हणून प्रसिद्धीचे नवेनवे विक्रम तो करू लागला. दुःख प्रेमाचा स्थायीभाव आहे. ती गेली तेव्हा प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या एका स्टेडियममध्ये जॉर्डन गात होता, कलेला मुर्त रूप देताना वेदना चिरंजीव झाली होती.
२०११ साली प्रदर्शित रॉकस्टारचा हा प्लॉट. इम्तियाज-रणबीर- इर्शाद कामिल- ए.आर.रहमान आणि मोहित चौहानचा परफॉर्मन्स फारच जबरदस्त होता. रॉकस्टार प्रदर्शित होऊन आज ९ वर्ष झाली. त्यानंतर जॉर्डन अनेकदा भेटला,
सिनेमात भेटला,
खऱ्या आयुष्यात भेटला.
'मुझपे करम सरकार तेरा,
अरज तुझे कर दे मुझे
मुझसे ही रिहा,
अब मुझको भी हो दीदार मेरा
कर दे मुझे, मुझसे ही रिहा' !
म्हणत प्रत्येकात एक रॉकस्टार दडलेला असतो,
हि साठा उत्तराची कहाणी त्यालाच अधोरेखित करणारी....
प्रतिक्रिया
12 Nov 2020 - 9:46 am | ज्ञानोबाचे पैजार
छान लिहीली आहे आठवण,
रॉकस्टार माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक.
पैजारबुवा,
12 Nov 2020 - 9:58 am | संजय क्षीरसागर
लगे रहो !
12 Nov 2020 - 10:36 am | शा वि कु
पण सिनेमा आवडला नव्हता, कुणास ठाऊक का. गाणी बाकी जबराव आहेत, संगीत आणि कविता दोन्ही.
12 Nov 2020 - 10:46 am | शा वि कु
सिनेमात कसब दिसून येते लहान लहान प्रसंगातून...
उदा: जनार्दन/जॉर्डन आणि त्याची बहीण (?) यांचे नाते अत्यंत कमी वेळ आणि केवळ एखादं दुसऱ्या प्रसांगातून, एकाही संवादाशिवाय खूप छान दाखवले आहे.
असे अनेक आहेत. नर्गिस फाख्रिचा अभिनय कमकुवत वाटलेला.
रणबीर रॉकिंग, नेहमीप्रमाणे.
तरी ओव्हरॉल सिनेमा बोअर झालेला असे आठवतंय. बऱ्याच लहानपणी बघितलेला त्यामुळे असू शकते, पुन्हा पाहायला हवा.
12 Nov 2020 - 1:42 pm | महासंग्राम
+१
12 Nov 2020 - 3:18 pm | टर्मीनेटर
हा चित्रपट पहिला नाहीये पण त्यातले 'कून फाया' गाणे मात्र फार आवडते!
छान लिहिलंय...👍
12 Nov 2020 - 6:44 pm | उगा काहितरीच
रॉकस्टार ! माझा एक अत्यंत आवडता चित्रपट... Znmd , हेरा फेरी, बनवा बनवी , असे काही मोजके चित्रपट आहेत ते कितीदाही पाहिले तरी कंटाळवाणे होत नाहीत.
13 Nov 2020 - 9:41 am | महासंग्राम
ज्ञानोबाचे पैजार, संक्षी, शा वि कु, टर्मिनेटर, उ का धन्यवाद मंडळी