तो, ती आणि ते
त्याने म्हटले
'तू वाटशी चंद्र मजला'
तिने ऐकले
'चेहऱ्यावर डाग कसला'
त्यांना वाटले
'आता हा फसला'
तिने म्हटले
'थांब ना जरा'
त्याने ऐकले
'आयता सापडलास बरा'
त्यांना वाटले
'हा नेहमीचाच नखरा'
त्यांनी म्हटले
'आगळी तुमची प्रीत'
त्याने ऐकले
'कोण हार कोण जीत'
तिला वाटले
'वेगळी जगाची रीत'
- सौ. रोहिणी मनसुख