आम्ही कोण?-निवडणूक उमेदवाराचे मनोगत (कविश्रेष्ठ केशवसुता॓ची क्षमा मागून)
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता? आम्ही असू लाडके-
"श्रेष्ठींनी" दिधले असे कुरण हे आम्हास पोसावया
पैशाने तुमच्याच आम्ही मिरवू चोहीकडे लीलया
दुष्काळातही अर्थप्राप्ती आमुची पार्टी कराया शके //
सारेही विधी, कायदे, नियम हे आम्हा तृणासारखे
हस्तक्षेपच आमुचा शकतसे राष्ट्राप्रती द्यावया
अस्थैर्यातिशया अशी वसंतसे जादू करा॑माजि या
पोटार्थी प्रति-सूर्य पाळु पदरी - सत्तेपुढे जे फिके //