बियर

Primary tabs

सोन्या बागलाणकर's picture
सोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...
23 Apr 2019 - 4:28 am

मूळ प्रेरणा: पाणी

इतक्या बियरचे पेग बनवताना
विचार करायचा भावा,

शरीराला इतके झोके देताना
उसंत घ्यायची भावा....

उसळून पुन्हा फेसाळते बियर
बर्फ द्यायचा भावा...

दोन पाय पुरत नाहीत
बॉडीचा भार पेलताना...

भावा, आता बार बंद करा
अन् पिण्यातून मुक्ती द्या....

कविता माझीमुक्त कविताविडम्बनहास्यकविताविडंबनआरोग्यथंड पेय

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

23 Apr 2019 - 12:02 pm | जयंत कुलकर्णी

फेसाळलेल्या
मधाळी पेयात
तुटती असंख्य तारे.
असे पेले करतो मी रिकामे.
मेंदूत फुटती आनंदाचे बुडबुडे,
क्वचित दुखःचे कढ ही.
चित्रविचित्र विचार व आभास
येती आणि विरती
वेळेचे भान नाही
बेफिकिर मी... पण
आज माझ्या पेल्यातील
बियर काही सरत नाही
- पो

सोन्या बागलाणकर's picture

24 Apr 2019 - 3:06 am | सोन्या बागलाणकर

वाह वाह जयंतराव,

क्या बात है!

पाषाणभेद's picture

23 Apr 2019 - 12:13 pm | पाषाणभेद

हे मात्र बरीक हो.

खिलजि's picture

23 Apr 2019 - 3:30 pm | खिलजि

एकच प्याला करताकरता

रिचवली बाटलीवर बाटली

बिलावरची किंमत बघुनी

आरपार फाटली

खिसा रिकामा करिते तरीही

दूर नाही ती जात

काचेमध्येच बघुनी वाटते

ढकलाविशी आत

सोन्या बागलाणकर's picture

24 Apr 2019 - 3:07 am | सोन्या बागलाणकर

पीनेवाले को पीने का बहाना चाहिये!

धन्यवाद खिलजी साहेब!

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Apr 2019 - 9:52 am | ज्ञानोबाचे पैजार

ह्या फेसाळत्या उन्मनी द्रवाने अनेकांना वेड लावले आहे.

पॄर्वी मद्यालयात फक्त राजा मासेमार प्रसिध्द होता. पण आता सत्यबोर्ग, कळीशहाणे, कार्लचाहिमनग, पालक इत्यादी पर्याय देखिल तितकेच लोकप्रिय आहेत.

पैजारबुवा,

सोन्या बागलाणकर's picture

24 Apr 2019 - 1:16 pm | सोन्या बागलाणकर

वाह पैजारबुवा!

राजा मासेमार,सत्यबोर्ग, कळीशहाणे, कार्लचाहिमनग, पालक भारी मराठी प्रतिनावे!
हिनीकनै विसरलात काय?

सोत्रि's picture

24 Apr 2019 - 12:35 pm | सोत्रि

बीयरचा पेग, बीयरमधे बर्फ...

अब्रह्मण्यम!

- (एकेकाळचा साकिया) सोकाजी

सोन्या बागलाणकर's picture

24 Apr 2019 - 1:13 pm | सोन्या बागलाणकर

दोन आचमने घ्या आणि सगळी पापे धुवून काढा! =))

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2019 - 9:31 pm | चौथा कोनाडा

चियर्स !

या "आगळ्या" विषयावर कविता स्पर्धा आयोजित करण्याची गरज आहे !
:-))

सोन्या बागलाणकर's picture

25 Apr 2019 - 6:10 am | सोन्या बागलाणकर

तीव्र सहमती! *झिंगलेली स्मायली*