राजकारण

पाकिस्तानात लोकशाही?

सचिन कुलकर्णी's picture
सचिन कुलकर्णी in काथ्याकूट
13 May 2013 - 4:30 pm

अंतिमत: पाकिस्तान मधल्या निवडणूक निकालांचे सूप वाजले आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज ही पार्टी छोट्या पक्षांसामावेत आघाडी करून १३७ हा बहुमताचा जादुई आकडा गाठणार असे दिसतेय. पण लाख टके का सवाल है कि -नवाज शरीफ किती दिवस टिकणार ?
मुशरर्फ प्रणीत लष्कर (मिलित्रि)त्यांना जास्त दिवस टिकू देईल असे वाटत नाही.

कार्यकर्ते येती घरा...

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
9 May 2013 - 8:40 am

लेखाला शीर्षक काय द्यावं हा प्रश्न अनेकदा आ वासून उभा रहातो. हा लेख लिहिताना देखील त्याने तेच केलं. मग त्याने उघडलेल्या मोठ्ठ्या तोंडात 'माझ्या तोंडात कचरा टाका' असं म्हणत चोच वासून बागांमध्ये उभे राहिलेल्या पेंग्विनांच्या पुतळारूपी कचरापेटीच्या आजूबाजूला जितक्या सहजतेने आपण कचरा टाकतो तशी काही नावं भिरकावून बघितली. 'बिपिन कार्यकर्तेंनी अमेरिका प्रवास केला हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न', 'आंगतुक पाव्हण्याचं मोठ्या मनाने आदरातिथ्य करून अमेरिकेत जपलेली भारतीय संस्कृती', 'कार्यकर्तेंचं राजपण, आजपण, उद्यापण' वगैरे अनेक नावं लिहिली.

हे ठिकाणमुक्तकराजकारणमौजमजाप्रकटनवादविरंगुळा

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल.

मनोज श्रीनिवास जोशी's picture
मनोज श्रीनिवास जोशी in काथ्याकूट
8 May 2013 - 9:12 pm

कर्नाटक च्या जनतेने कोंग्रेस ला स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्ताधारी भा.ज.प. आणि दोन प्रादेशिक पक्ष सत्ते पासून संपूर्ण बाजूला राहणार आहेत. भाजप चे दक्षिणायन रोखले गेले आहे की संपुष्टात आहे आहे ते पुढच्या ५ वर्षात स्पष्ट होईल. कुमारस्वामी हया अत्यंत संधीसाधू नेत्याला सत्ता स्थापनेमध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही हे चांगले झाले. येडडीच्या गर्वाचे घर बेचिराख झाले आहे. निर्नायकी कॉंग्रेसचे विजयाबद्दल आणि येडडीचे भाजपा ला कर्नाटकात कमकुवत करण्याबद्दल अभिनंदन.
ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढवली गेली होती असे म्हणतात. तसे असते तर काँगेस चा विजय अशक्य होता.

राजकारण्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का?

NiluMP's picture
NiluMP in काथ्याकूट
18 Apr 2013 - 10:46 am

अनधिकृत इमारतीच्या कार्यवाही विरोधी सर्वपक्षीय राजकारण्यांचा (काही नसतील)ठाणे बंद ही बातमी वाचून डोक्यात एक सनक गेली आणि वाटले या राजकारण्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का?

मग पोलिसांच्या घरांसाठी, गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि सर्वसामान्य भुमी पुत्राला स्वस्तात फुकटात नव्हे घरे उपलब्ध करून देण्यासाठी हे नेते कधी एकत्र आले नाहीत (ULC) urban land ceiling act सारखा कायदा रदद करून सरकाच्या ताव्यात असलेली जमीन विल्डरांच्या घशात घातली.

हे जे नाटक चालू आहे ते कोणत्याही माणूसकीच्या भावनेतून आलेले नाही तर एक गठठा मतदार आपल्या हातून जातील ही भिती त्यांना वाटते.

तारे तोडण्याची स्पर्धा

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
9 Apr 2013 - 6:03 pm

नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले .

एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे .

असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन !

कलासुभाषितेविनोदराजकारणविचारप्रतिक्रियाबातमीमतवादप्रतिभा

मत आणि मु*

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
8 Apr 2013 - 2:12 pm

आमची प्रेरणा
http://www.misalpav.com/node/24432

मत आणि मु* दोन्ही नव्हे हो समान

मत मिळताच नेते टांग वरती करीती
खाल मानेने मेंढरे त्यांना पुन्हा मत देती

पाण्यातुन पैसा नेता भारंभार काढी
कापलेली करंगळी धरे त्याच धारे खाली

मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही
की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही

मत मागायाला येता, मु* द्यावे आपणही
असे केल्या वीना मूजोरी, यांची संपायची नाही

पैजार ठाकरे

कोडाईकनालभूछत्रीहास्यप्रेमकाव्यबालगीतऔषधोपचारराजकारण

राहुल गांधी : दुसरा राजीव गांधी !

तर्री's picture
तर्री in काथ्याकूट
5 Apr 2013 - 10:17 am

काल राहुल गांधी यांनी सी.आय आय च्या सभेमध्ये भाषण केले. केवळ भाषण म्हणून मूल्यमापन करायचे तर ते एक प्रांजळ प्रकटन होते. त्यामध्ये नव्या कल्पना , नवी प्रतिभा यांचा सुरेख संगम होता. चप्पल नेमकी कुठे लागते आहे ? हे त्यांना आता समजते आहे. समस्या समाधानाची पहिली पायरी म्हणजे समस्या नेमकी समजणे , आणि ते त्यांना जमले आहे असे वाटते. समस्या समाधानाची दुसरी पायरी म्हणजे उपाय योजना करणे. येथे मात्र राहुल गांधीचा अननुभव स्पष्ट दिसून येतो आहे.

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 4:17 pm

आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.

या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.

(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)

(ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्‍यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)

कॉकटेल रेसिपीकोडाईकनालभूछत्रीमराठीचे श्लोकशृंगारभयानकहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

राजकीय पक्ष आणि संरचना

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
1 Apr 2013 - 4:12 pm

काल भाजपामधील नव्या अध्यक्षांनी आपली नवी 'टीम' घोषित केली. या निमित्ताने प्रत्येक पक्षातील अंतर्गत संरचना कशी असेल असे कुतूहल होते. थोडी शोधाशोध केल्यावर भाजपा, काँग्रेस आणि डाव्यांमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची रचना जशी माझ्या लक्षात आली तशी येथे देत आहे.

राजकारणमाहितीसंदर्भचौकशी

गृहखात्याची खराब इमेज

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
30 Mar 2013 - 12:38 am

महाराष्ट्रातील राजकारणी लोक नवनव्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या घडवत आहेत. नुकतेच विधानसभेच्या पवित्र स्थळी राजकारण्यांनी कायदा हातात घेऊन एका पोलिस अधिकार्‍याला बुकलून काढले. दुर्दैवाने तिथे सीसीटीव्ही क्यामेरे असल्यामुळे ह्या प्रकरणाचा हा सूर्य आणि हा जयद्रथ असा निकाल लागेल असे वाटले.
पण आपले लाज कोळून प्यालेले राजकारणी तिथेही पळवाट काढणार असे दिसते.