गाभा:
अनधिकृत इमारतीच्या कार्यवाही विरोधी सर्वपक्षीय राजकारण्यांचा (काही नसतील)ठाणे बंद ही बातमी वाचून डोक्यात एक सनक गेली आणि वाटले या राजकारण्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का?
मग पोलिसांच्या घरांसाठी, गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि सर्वसामान्य भुमी पुत्राला स्वस्तात फुकटात नव्हे घरे उपलब्ध करून देण्यासाठी हे नेते कधी एकत्र आले नाहीत (ULC) urban land ceiling act सारखा कायदा रदद करून सरकाच्या ताव्यात असलेली जमीन विल्डरांच्या घशात घातली.
हे जे नाटक चालू आहे ते कोणत्याही माणूसकीच्या भावनेतून आलेले नाही तर एक गठठा मतदार आपल्या हातून जातील ही भिती त्यांना वाटते.
तुम्हाला काय वाटते.
प्रतिक्रिया
18 Apr 2013 - 11:00 am | इरसाल
विजय असो.
18 Apr 2013 - 11:09 am | श्री गावसेना प्रमुख
लोकमान्य म्हणजे लोकांनी निवडुन दिलेले का?
18 Apr 2013 - 11:41 am | इरसाल
नाही(हे गटणे स्टाईलने).
लोकमान्य म्हणजे लोकांकडुन मान्य करुन घेतलेले (साम दाम दंड भेद इ.इ. प्रकारे)
18 Apr 2013 - 11:49 am | NiluMP
हा हा हा
19 Apr 2013 - 1:55 am | प्रसाद गोडबोले
लोकमान्य नाही हो आजकाल 'भटमान्य' म्हणतात त्यांना .
अन त्यांचाही सिंहगडावरचा बंगला पाडायच्या वाटचाली सुरु आहेत म्हणे मग इतर आम्हा सामान्य ठाणेकरांना कोण पुसतो ?? :)
19 Apr 2013 - 5:04 pm | बॅटमॅन
लोकमान्यांचा सिंहगडावरचा बंगला पाडणार???????????
हरामखोर साले.
18 Apr 2013 - 11:05 am | कापूसकोन्ड्या
उगीचच काहीतरी लिहायचे म्हणून लिहीत रहा.
18 Apr 2013 - 11:32 am | NiluMP
तुम्ही घुसखोर आहात का? की तुमचा कोणी नातेवाईक राजकरणात आहे.
18 Apr 2013 - 1:39 pm | कापूसकोन्ड्या
अहो आम्ही बांगला देशातले.खुप वर्षापूर्वी अत्यंत कष्ट करून हालअपेष्टा काढत कसे तरी इथे पोचलो. रहायला जागा काय फुकट मिळते होय? काबाड कष्ट करून रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, रहायची जागा विज पाण्याचे कनेक्शन सगळा हप्ता तर ब्लॅक मध्ये दिला.
आता केवळ मतांसठी आमची कष्टाची घरे पाडणार काय?
आम्हाला सहानुभुती दाखवली नाही तर राजकारण्यांना आम्ही पळता भुई थोडी करू. बॉम्ब स्फोट फक्त धर्माच्या नावा वर होतात असे समजू नका.
आम्हाला सगळे पक्ष सारखे मला योग्य वेळी घर देणारा तो आमचा अल्ला किंवा देव. बाकी कायदेशीर आणि गप्पा तुम्हाला पोट भरल्यावर किंवा भरेल याची खात्री असल्यावरच सुचतात.
सो कॉल्ड मध्यमवर्गीय (बुर्झ्वा) हे रियालिटि पेक्षा चार हात वरच असतात हेच खरे.
18 Apr 2013 - 11:42 am | शिद
जेव्हा अनधिकृत बांधकाम सुरु होते तेव्हा ह्याच सगळ्या राजकारणी लोकांनी पैसे घेऊन बेकायदा बांधकामांना संरक्षण दिले मग असे असताना ह़ा बंद कशाला? आमचा जीव कशाला धोक्यात घालता? नाहक सामान्य माणसांना त्रास कशाला?
जितेन्द्र आव्हाड आहेच लोचट पण ठाणे मनपामध्ये तर शिवसेनेची सत्ता असुन देखील त्यांनीसुद्धा ह्या "बेकायदा" बंद ला पांठीबा दिला आहे त्यामुळे सर्वपक्षीय राजकारण्यांचा निषेध (भाजप व मनसे सोडुन).
18 Apr 2013 - 1:28 pm | NiluMP
निषेध करून किती राजकरणी सुधारलेत अहो ही गंडयाच्या कातडीची माणसे आहेत. बहिष्कार हा एकमेव उपाय आहे
18 Apr 2013 - 1:44 pm | दादा कोंडके
शी शी.. :))
20 Apr 2013 - 12:04 am | NiluMP
धन्य आहात तुम्ही एवढया महत्वाच्या विषयावर चर्चा होत असताना तुम्ही व्याकरण्याचा चुका काढत बसलात.
18 Apr 2013 - 3:48 pm | शिद
तुमचेही बरोबर आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बहिष्कार हा कश्यावरचा एकमेव उपाय आहे आणि कोणावर करायचा हे कळले तर उत्तम होईल?
19 Apr 2013 - 1:46 am | NiluMP
भारतासारखा भाषांवर प्रांतरचना असलेल्या देशात मतदान करून नेता निवडून देणे हे किती घातक आहे याचे परिणाम हे वरील उदा. होय
कृपया हे वाचावे
http://www.misalpav.com/node/24074
18 Apr 2013 - 11:59 am | नितिन थत्ते
समजा ती कोसळलेली बिल्डिंग अधिकृत असती तर?
बिल्डिंग खराब बांधकाम असलेली असणे आणि अनधिकृत असणे यात खूपच फरक आहे.
उच्चवर्गीय ज्या घरांतून राहतात (मोठ्या बिल्डरांची पांढरे पैसे घेऊन बांधलेली घरे सुद्धा अनधिकृतच असतात).
18 Apr 2013 - 1:24 pm | NiluMP
तुम्ही आम्ही सामान्य माणसे कायदा पाळतो अगदी सर्वच नाही पण बहुतेक आणि हे बिल्डर आणि तत्सम लोक कायदा वाकवून वा मोडून बिनदक्तपणे सामान्यांना लुबाडत आहेत याला जबाबदार कोण, कायदा कोण बनवितात तुम्ही की आम्ही, नाही ना.
18 Apr 2013 - 2:10 pm | नगरीनिरंजन
आम्हाला भरपूर पगार मिळतो हे आमचे कर्तृत्व. आम्ही एकापेक्षा जास्त घरं घेतो तेही आमचंच कर्तृत्व.
आम्ही दोन-दोन गाड्या घेतो ते आमचं कर्तृत्व. आमच्या उपभोगासाठी जंगलतोड, खाणकाम, धरणे बांधली जातात ते स्वाभाविकच आहे. त्यामुळे लोक विस्थापित होतात ते नैसर्गिकच आहे. ते लोक शहरात येऊन झोपडपट्ट्या बांधतात ही मात्र केवळ राजकारण्यांची चूक. त्या लोकांचा गैरफायदा घेऊन अशा अनधिकृत, निकृष्ट इमारती बांधल्या जातात तीही केवळ राजकारण्यांची चूक. अशा इमारती डोळ्यासमोर उभ्या राहात असताना आम्ही आमच्या कामात मग्न असतो, तिकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नसतो. आमच्या गरजा पूर्ण करण्यातच आमचा सगळा वेळ जातो हीसुद्धा राजकारण्यांचीच चूक.
सगळ्या समस्यांचे मूळ राजकारणी आहेत. ते कामचोर आहेत. आमची काऽऽऽही कर्तव्ये नाहीत आणि आमची काऽऽऽही चूक नाही.
18 Apr 2013 - 3:39 pm | कापूसकोन्ड्या
अगदी सत्य
मला जर एखादी इमारत बांधताना दिसली तर मी काय करणार? खेटे कुठे घालणार?
19 Apr 2013 - 1:51 am | NiluMP
लकी बिल्डिग बांधली जात असतानाचे मजलेवार फोटो तेथील एक RTI कार्यकता सर्व स्थरापर्यत पोहचवत होतो पण त्याची कोणीही दखल घेतली नाही अजून एका सर्वसामान्य माणसाने काय करावे अशी आपली इच्छा आहे.
18 Apr 2013 - 4:06 pm | तर्री
लोकसंख्या आणि कमी किमतीमधील उपलब्ध घरे ह्यामध्ये डिमांड , सप्लाय रेशो व्यस्त झाला आहे.
१.शहरात सर्वसाधारण प्राप्ती (रु.२५०००-३५००० / महिना ) असलेला नागरिक आज घर घेवू शकत नाही.
२.सरकारने म्हाडा / सिडको सारखे प्रकल्प सुरु केले पण ते नियोजनाचा आभाव व भ्रष्टाचाराचे अड्डे बनले.
३.टाउन प्लन्निग - नगर विकास मंत्रालय ( श्रीमान भास्कर जाधव ) हे काय काम करते ?
४. सिमेंट आणि पोलाद निर्मिती ला निर्बंध नाहित म्हणून पैसे वाले तरी घरे घेवू शकतात. इंदिरा गांधी यांच्या काळात सिमेंट मिळवणे हेच मोठे दिव्य असे - घर बांधणे नंतर.
५. अनधिकृत जागा , बिल्डिंगचे स्थापत्य तयार करणे , ती त्या रचनेनुसार बांधणे हया प्रत्येक स्टेज ला गांधी आडवा घालतो.
६.ही एक समस्या आहे आणि समस्ये मधून फायदा घ्यायला शिकायला हवे. ज्यांना काही गुंतवणूक करायची आहे त्यांनी केन फिन होम / गृह / एल.आय .सी आणि एच .डी .एफ.सी. हया होम फायनान्स मध्ये गुंतवणूक करा आणि भरघोस नफा कमवा.
19 Apr 2013 - 2:04 am | NiluMP
हाती आलेली सत्ता सत्कारणी लावण्यासाठी जिजाउच्या पोटी जन्म घ्यावा लागतो शिवरायांनी आपल्यासाठी महाल नाही तर स्वराज्यासाठी किल्ले बांधले.
ईच्छाशक्ती असावी लागते. राजकपूरचा श्री 420 आपण पाहिलाच असेल.
18 Apr 2013 - 10:01 pm | विलास अध्यापक
अनधिकृत बांधकाम कसे ओळ्खायचे ? बोर्ड असतो का ? पालिकेत चोउकशी केली तर समजते का ?
18 Apr 2013 - 11:41 pm | खटपट्या
अनधिक्रुत बान्धकाम सुरु असताना तीथे कोणताही माहीती फलक नसतो. अधिक्रुत बान्धकामसमोर माहीती फलक लावणे बन्धनकारक असते.
19 Apr 2013 - 2:08 am | NiluMP
साधा आणि सोपा उपाय ज्या विभागात आपण घर खरेदी ईच्छिता त्या विभागातील नामावंत बॅंंकेत जाउन आपण घेत असलेल्या घराला त्या बॅंंकेचे गृहकर्ज मिळेल का अशी विचारणा करावी.
18 Apr 2013 - 11:25 pm | मुक्त विहारि
उपाय काय?
19 Apr 2013 - 2:14 am | NiluMP
मतदान पध्दत रदद करून ईतर नवीन पध्दतीने नेता निवडून देणे.
कृपया हे वाचावे
http://www.misalpav.com/node/24074
19 Apr 2013 - 2:00 am | प्रसाद गोडबोले
कारवाई करायचीच असेल तर आधी हिरानंदानी पाडा मगच गोरगरीबांच्या चाळींना हात लावा .
फारफार रेयरली आपण राजकारण्यांशी सहमत होतो...
ह्या हिरानंदानीच्या तर @#$% %^&* )(*& ...साला हा अनधिकृत बांधकाम करतो त्याला हात लावायला कोणाच्या **त दम नाही ...अन इथे गोरगरीबांची इवली इवली घरटी पाडत आहेत ...
: प्रचंड राग :
19 Apr 2013 - 2:21 am | NiluMP
अजून एक उदा. आहे आर्दश बिल्डिंग विसरलात वाटत.