चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-१
१९७६ मध्ये अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्राने एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. अंतराळात पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे मनुष्य घेऊन जाणारे अंतरीक्ष यान बनवण्याची ही कल्पना त्यावेळी फारच नाविन्यपूर्ण होती, नासाने या प्रकल्पाला 'स्पेस शटल' हे नांव दिले होते. अनेकांना ही कल्पना अशक्यप्राय वाटत होती मात्र पांचच वर्षात 'कोलंबिया' या स्पेस शटलने उड्डाण केले ५४ तांस पृथ्वीच्या कक्षेबाहेर भ्रमण करून नियोजित कार्यक्रमानुसार फायर इंजीनाचा वेग कमी करून हळूहळू पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आणि एखाद्या ग्लायडर प्रमाणे नियोजित तळावर सुखरूप उतरले. एक स्वप्नवत प्रवास मानवाच्या आवाक्यात आला होता.