माझा देव
हातातल्या चावीचा जुडगा सावरत त्यातली नेहमीची चावी वेगळी केली आणि समोरच्या कुलुपाला लावली. बराचवेळा चावी फिरवूनही कुलूप काही उघडेना. शेवटी कुलुपाला धरून जोरात ओढले. कुजलेल्या बिजागरीने कुलपाची साथ सोडली आणि कुलूप हातात आले. कडीही निघून खाली पडली. आत काय असणार याचा मला पुरेपुर अंदाज होता. तरीही मनाची खात्री करून घेण्यासाठी आत डोकावून बघितले. दहा रुपयाच्या दोन नोटा एका कोप-यात पडून होत्या. दुस-या कोप-यात एक कोळी आपले जाळे मांडून बसला होता. त्या दोन नोटा बाहेर काढून मी खिशात टाकल्या आणि देव्हा-याकडे निघालो.समोरची गणेशची मुर्ती माझ्याकडे रोखून बघत होती.