कितीसा पुरोगामी आहेस ?
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)
कमिटेड टू हूम
कमिटेड टू व्हॉट
पुरोगामी पुरोगामी
कितीसा पुरोगामी आहेस ?
तुझ्यासाठी
आपले कुणीच नाही
तूला तू त्यांचा आहेस असे वाटते
तेही फसवे नसते का ?
आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस
त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?
आणि तूही कुणाचाच नाहीस
हेच खरे नसते का ?
त्यागी आहेस
हे बरे आहे एका अर्थाने
आपल्या अंगच्या वस्त्रांचाही
त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे
जंगलात जाऊन कायमचा
एकांतवास अनुभवून पहाशील का ?