फ्री स्टाइल
रियल रियल
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या....
मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या
लिक़्विड जमान्यात
प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत
ओहो....ते काय असते आणि?
आठवण बिठवण वेड्यांचा बाजार...
एक कॉल मारायचा
नाहीतर मेसेज धाडायचा
बात करनेका मामला खतम.
मनात आठवण, झुरणे बिरणे
अरेरे, हाताबाहेरच्या केसेस...
डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल
एवढेच काय ते रियल रियल
बाकी जग तो मृगजल मृगजल...
प्रेम...
खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही
कुणीतरी आपल्यावर बेहद्द प्रेम करावं
तसे आयुष्यात भेटतात हजारो लोक
त्यात आपणही कुणाचं विश्व म्हणून जगावं
कुणाच्या नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होतात का
कुणाच्या तरी आठवणी तुम्हालाही छळतात का
नसेल जाणवलं अगदीच तुम्हाला काहीही जरी
भरलेल्या डोळ्यातल्या भावना तरी कळतात का
कुणीतरी असेलच की तुमच्यासाठीही झुरणारं
तुमचे दुर्गुण माहित असूनही भरभरुन प्रेम करणारं
अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . .
तुमच्यावर जो प्रेम करतो तोच तुमच्यासाठी योग्य !
(तू मतदार माझा)
प्रेर्ना - विळखा पाहू
तू मतदार माझा
भोट, भोंगळ अजीजी
तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा
मस्तवाल नेता मी ....
घेऊन जमेस तुला
निव्वळ उगी तुंबडी भरावी
बोभाटा करावा मी एव्हढा
की लाभावी मज(समोरची) वाटणी
सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.
वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला
(बंद कळफलकामागचा वाचक)
एक वाचक कळफलकाबरोबर बघतो आहे मिपा
कसले मिपा ?
स्वत:च्या कक्षेत, जालजंजाळाच्या पार
जिथे हर एक लेखकू बसला आहे क्षुब्ध....
करत असेल का तो ही (कधीकधी)वाचकाचा विचार?
वाचत असेल का तो ही
इतरांचेही आहेर, विरोधाच्या (चष्म्या) पलीकडे?
वाचक त्याच्या वाचनदुनियेतून बाहेर येऊ शकत नाही...
मग तो त्याचे मूक प्रतिसाद पाठवतो,
ते प्रतिसाद डोक्यात (न)घेऊन
लेखक निवांतपणे मख्ख राहतो....
मिपा हरवलेला वाचक
जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो,
पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो...
वाचकांचीच पत्रेवाला नाखु
दाराआडचा बाबा
मूळ प्रेरणा (अर्थातच): दाराआडची मुलगी
एक बाबा दाराआडून बघतो आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, लग्न मंडपाच्या पार
जिथे एक मुलगी बसली आहे नटून....
करत असेल का ती ही ताटातुटीचा विचार?
जाईल का ती ही
मुलाचा हात धरून , उंबऱ्याच्या पलीकडे?
बाबा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
उभा राहतो डोळ्यातली आसवे लपवत,
याची जाणीव नसलेली मुलगी
आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते....
मुलगी हरवलेला बाबा
गळ्यातला आवंढा आवळत बघत राहतो...
बघतच राहतो....
(दाराआडची आई)
एक आई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार
जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....
करत असेल का तो तिचा काही विचार?
येत असेल का तो ही
खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे?
आईला दाराआडून बाहेर यायचं नाही...
मग ती वेताची काठी हळूच चाचपते,
ती काठी पाठीत घेऊन
मुलगा अविश्रांत कोकलत राहतो....
काठी सापडलेली आई
सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...
सुततच राहते....
-चमचमचांदन्या
(जगणं फक्त निमित्तमात्र)
मग पुढे असं होतं की ..
वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं.
फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं.
वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं
पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला..
आणि आभासी जग लागतं बागडायला
याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला..
स्वत्व लागतं आकसायला..
असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला..
चढ उतार हे निमित्तमात्र..
काॅफी ही निमित्तमात्र..
मग पुढे असं होतं की ..
शब्दांमधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधलं पाणी सुकत जातं.
ओठावरचं हसू निवत जातं...
स्पर्श होतात विसरायला..
आणि भांडणं लागतात आठवायला..
नातं लागतं विरायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
काॅफी ही निमित्तमात्र..
गर्भार सातव्या महिन्याची
जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!
मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!
क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!
आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!
- संदीप चांदणे