कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Jun 2018 - 9:58 am

(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)

कमिटेड टू हूम
कमिटेड टू व्हॉट

पुरोगामी पुरोगामी
कितीसा पुरोगामी आहेस ?

तुझ्यासाठी
आपले कुणीच नाही

तूला तू त्यांचा आहेस असे वाटते
तेही फसवे नसते का ?

आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस

त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?

आणि तूही कुणाचाच नाहीस
हेच खरे नसते का ?

त्यागी आहेस
हे बरे आहे एका अर्थाने

आपल्या अंगच्या वस्त्रांचाही
त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे
जंगलात जाऊन कायमचा
एकांतवास अनुभवून पहाशील का ?

पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा
आणि अनुभवू देण्याचा तो
सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना
स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा
तोच तू स्विकार !

.
.
.
.
* कवितेच्या मर्यादीत ओळी वापरण्यास हरकत नाही, पण शक्यतो सुयोग्य संदर्भ अबाधीत रहावे म्हणून पूर्ण कवितेचा मिपा दुवा (https://www.misalpav.com/node/42844) सोबत जोडत जावा अशी अपेक्षा आणि विनंती आहे.

आ.न.

माहितगार

dive aagareggsgholmiss you!अनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआता मला वाटते भितीकखगकविता माझीकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीविठ्ठलमुक्तकमराठी पाककृतीव्यक्तिचित्रणगुंतवणूकचित्रपटस्थिरचित्र