मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग २: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी) माहिती साठ्याची कमतरता
वस्तुतः चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी ह्या विषयाच्या सांगोपांग चर्चेस अजूनही वाव आहे. माझ्या निरीक्षणांनुसार मराठी आणि महाराष्ट्र संबंधी कोणत्याही विषयावर हिट्सचा अभ्यास केला तर मराठी माणसाचा मराठी आणि महाराष्ट्र विषयीचा जिव्हाळा कायम आहे पण अजूनही ९०-९५ टक्के शक्य श्रोता अथवा वाचकवर्ग इंग्रजीतूनच शोध घेतो मराठीत शोधत अथवा वाचतच नाही लेखन दूरची गोष्ट आहे; याच एक कारण मराठी भाषेतील ऑनलाईन मराठीत ज्ञान आणि माहिती साठ्याची कमतरता आहे.