अहमदाबाद मध्ये पुणे
पुण्यनगरी हि तेथील पुणेरी (खाष्ट ?) पाट्या साठी प्रसिद्ध आहे. हे लोण आता अहमदाबाद पर्यंत पोचले आहे असे वाटते. नुकतीच Times ऑफ इंडिया मध्ये छापलेली चार उदाहरणे उद्धृत करत आहे.
१. शहराच्या मध्यभागात भद्र म्हणून एक विस्तार आहे. पुरातत्व विभागाने त्याची रक्षित स्थानांमध्ये गणना केली आहे. तेथील एका ४०० वर्षे जुन्या गणेश मंदिराबाहेर असा फलक लावला आहे.
--मन्दिराच्य्या कोठेही शाखा नाहीत. भाविकांनी फसवणूक होऊ देऊ नये.
२. एका लस्सीच्या दुकानाबाहेर मालकांनी वाटर कुलर बसवला आहे आणि त्याच्या शेजारी असा फलक लावला आहे.