3D प्रिंटींग - म्हणजे काय रे भाऊ?
मागे एकदा एका मेल मधून 3D प्रिंटींगच्या व्हिडियोची एक मेल आली होती. ती बघितल्यावर काहीतरी गीमीक असावे म्हणून तिकडे लक्ष दिले नव्हते. पण परवा ही बातमी वाचली आणि हबकलोच. त्यावेळी तो व्हिडियो बघून त्या 3D प्रिंटींगला सीरियसली न घेतल्याबद्दल मन खाऊ लागले आणि 3D प्रिंटींगबद्दल ज्ञान वाढविण्यासाठी त्याची माहिती घेणे चालू केले. चला तर बघूयात काय आहे हे 3D प्रिंटींग...