सोलर मॅक्सिममच्या वातावरणावर होणार्‍या परीणामांबाबत

चैतन्यकुलकर्णी's picture
चैतन्यकुलकर्णी in काथ्याकूट
16 Jan 2013 - 11:25 pm
गाभा: 

सोलर मॅक्सिममच्या वातावरणावर होणार्‍या परीणामांबाबत आपल्याकडे वर्तमानपत्रे व सरकारकडून कोणतीच माहिती दिली जात नाही. वस्तुतः सध्याच्या काळात वातावरणावर परीणाम करीणारी महत्वाची बाब म्हणून समोर येत असताना सरकार जनतेला स्पष्टपणे सांगताना दिसत नाही.
मध्य-पश्चिम भारत, विषेषत: महाराष्ट्र, कर्नाटक भागात दर १० वर्षांनी दुष्काळाचे नवीन चित्र सामोरे येत असताना, सरकारने याविषयी संशोधन करून जनतेला त्याबाबत सावध करायला पाहिजे. खालील दुव्यांवर अधिक माहिती मिळेल.
Solar Variability and Terrestrial Climate

NASA Finds Long-Term Climate Warming Trend

जर दर वर्षांनी येणार्‍या दुष्काळाशी याचा संबंध असेल तर जनतेने स्वतःहून येणार्‍या दुष्काळाचे योग्य नियोजन केले पाहिजे.
तसही, सरकार हे जनतेचे जनतेसाठी आहे असे वाटू नये याची खात्री पटविणार्‍या घटनाच अधिक समोर येत आहेत.
कर्जमाफीचा खेळखंडोबा

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

17 Jan 2013 - 6:43 am | अरुण मनोहर

आपल्याकडे वर्तमानपत्रे व सरकारकडून कोणतीच माहिती दिली जात नाही.

आपल्याकडे वर्तमानपत्रे, आणि इतर मिडीया फक्त सरकारला आणि नेत्यांना दुषणे देण्यत आणि फक्त वाईट बातम्या छापण्यात रस घेतात, कारण त्यांना त्यातूनच टी आर पी मिळते.
सरकार विषयी तर बोलायलाच नको. बहुदा मिडीयापासून बचाव करण्यात सगळा वेळ जात असावा!

समाजात आणि उद्योगधंद्यांत घडणार्या सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करून, किंवा आधुनिक ज्ञानाचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी कसा करता येइल ह्याविषयी माहीती देऊन समाजाचे हित करणे ह्यात पैसा (टी आर पी) नसल्यामुळे कोणालाच रस नाही!

५० फक्त's picture

17 Jan 2013 - 8:25 am | ५० फक्त

या दोन लिंकवर जे इंग्रजीत लिहिलं आहे, त्याचं मराठीकरण करुन इथं दिलं असतं तर बरं झालं असतं. मिसळपाव वरचे धागे जेवढ्या इंटरेस्टनं वाचले जातात तेवंढं त्या लिंकवर जाउन वाचणं होणार नाही.

बाकी, या सर्वामागं ग्लोबल वॉर्मिग सारखी नुसती हवा करायची किती चाल आहे या तथाकथित पुढारलेल्या आणि जागतिक सत्तेसाठी हपापलेल्या देशांची हे समजायला १५-२० वर्षे तरी जावी लागतील.