दिवस....
ह्या दिवसांचं काही कळतच नाही बुवा...कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात....
कँलेंडरमधे दिसणारे दिवस दिसतात त्यापेक्षा अधिक जवळ असतात...
प्रत्येक उगवणारा दिवस मावळतोच...उद्याचा दिवस दिसेलच याचीही काही खात्री नसते.....
काही लोक दिवस मोजत असतात ... काही लोकांचे दिवस फुलत असतात......
काही गोष्टी फक्त दिवसा करतात....कोणी गेला तर त्याचेही दिवस इतर लोक करतात....
दिवसाढवळ्या गुन्हे घडले तर त्याची दखल लगेच घेतली जाते....
काही दिवस दिसतात .....काही दिवस दाखवले जातात....काही दिवस सरतात....काही तरीही उरतात....