दिवस....

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
13 Apr 2017 - 8:38 pm

ह्या दिवसांचं काही कळतच नाही बुवा...कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात....

कँलेंडरमधे दिसणारे दिवस दिसतात त्यापेक्षा अधिक जवळ असतात...

प्रत्येक उगवणारा दिवस मावळतोच...उद्याचा दिवस दिसेलच याचीही काही खात्री नसते.....

काही लोक दिवस मोजत असतात ... काही लोकांचे दिवस फुलत असतात......

काही गोष्टी फक्त दिवसा करतात....कोणी गेला तर त्याचेही दिवस इतर लोक करतात....

दिवसाढवळ्या गुन्हे घडले तर त्याची दखल लगेच घेतली जाते....

काही दिवस दिसतात .....काही दिवस दाखवले जातात....काही दिवस सरतात....काही तरीही उरतात....

दिवसांचे अनेक प्रकार असतात.....उन्हाळ्याचे,पावसाळ्याचे,हिवाळ्याचे,हवेहवेसे,
नकोनकोसे ,आठवणीतले आणि असे बरेच.....

काही दिवस निषिध्द असतात....काही दिवस अडचणीचे असतात.....काही दिवस विशेष असतात....

बाईला दिवस गेले तर घरदार आनंदतं....पुरुषाचे दिवस नुसतेच येतात आणि जातात..त्यानं होत काहीच नाही....उलट दिवसेंदिवस काहीच केलं नाही तर रिकामटेकडा म्हणतात....

दिवसाला वेगवेगळे रंगही असतात....काही गुलाबी तर काही काळे असतात....

काही दिवस नुसतेच जातात.....काही दिवस कंठावे लागतात....

कष्ट करुन दिवस ढकलणारे आपल्या मनातच उनाड आणि स्वच्छंदी दिवस जगतात.....

काही दिवस कायमचे स्मरणात राहतात....काही दिवस चटकन विस्मरणात जातात.....

कधी दिवस फिरतात...कधी आपल्यालाच फिरवतात .....

दिवस असेही असतात आणि तसेही......या दिवसांचं सालं काही कळतच नाही बुवा !

मुक्तकव्युत्पत्तीसमाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

कौशी's picture

14 Apr 2017 - 1:07 am | कौशी

"कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात". हे मात्र खरे.

जव्हेरगंज's picture

16 Apr 2017 - 4:09 pm | जव्हेरगंज

+१

पद्मावति's picture

16 Apr 2017 - 2:18 pm | पद्मावति

मुक्तक आवडले.

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Apr 2017 - 7:35 pm | माम्लेदारचा पन्खा

धन्यवाद !