दस का बीस
तारीख : अशीच कुठलीतरी
वेळ : सकाळी पावणे नऊ/नऊ वा.
ठिकाण : गडकरी रंगायतनचे अॅडव्हान बूकिंग काऊंटर
'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाची अॅडव्हान बूकिंग सुरू व्हायची होती. सुरूवातीच्या चार-पाच ओळीत जागा मिळावी म्हणून थोडा धावत पळतच गेलो काऊंटरवर. रंगायतनच्या नियमाप्रमाणे सकाळी साडे आठला बूकिंग सुरू होते. मी तिथे पोचलो साधारण पावणे नऊ/ नऊ वाजता. काऊंटर ठेवलेला बूकिंग चार्ट पाहून आश्चर्याचा धक्का बसला, कारण 'A' पासून ते 'R' पर्यंतच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या. म्हटलं हे कसं शक्य आहे म्हणून बूकिंग घेणार्या माणसाबरोबर संवाद सुरू केला.