लोकल मधले लोकल्स.
असाच एक कुठलासा सोमवार होता, संध्याकाळचे ६.३० होउन गेले होते, मी पावसाचं कारण सांगुन ऑफ़ीस मधुन मोठ्या उत्साहात लवकर पळालो होतो. पण स्टेशन वर येताच पावसानी त्यावर पाणी फ़िरवलं होतं. घाटकोपर स्टेशन च्या १ नंबर फ़लाटावर प्रवांशाचे उधाण आले होते. पहील्या प्रयत्नात गाडी मिळेल ह्याची शक्यताच नव्हती. किमान ३ -४ गाड्या सोडाव्या लागणार होत्या. ते कमी झाले म्हणुन की काय वरुन वरुण राजा बरसत होता. का कुणास ठावुक पण असे वाटतं होत की सगळे डाउन वाले प्रवासी फ़क्त स्लो लाइन वरुनच प्रवास करु इच्छीत होते.
